दिल्लीतील कडाक्याच्या थंडीत पंतप्रधान नरेंद्र मोदींसह इतर अनेक राजकीय नेते शाल, स्वेटरमध्ये फिरत असताना काँग्रेसचे नेते राहुल गांधी भारत जोडो यात्रेत केवळ टी-शर्ट घालून फिरताना दिसले. यावरून सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली. काँग्रेस समर्थकांकडून राहुल गांधींच्या फिटनेसचं कौतुक करण्यात आलं. दुसरीकडे भाजपा समर्थकांनी मात्र राहुल गांधी खोटं बोलत असल्याचा आणि टी-शर्टच्या आतून उष्णतेसाठी ‘थर्मल’ कपडे घातल्याचा दावा केला. यावर काँग्रेसने भाजपा समर्थकांना ‘हताश भक्त’ म्हटलं. यावरून दोन्ही गटांकडून जोरदार शाब्दिक युद्ध सुरू आहे. नेमकं काय घडतंय याचा हा आढावा…

भाजपा नेत्यांकडून राहुल गांधींनी ‘थर्मल’ घातल्याचा दावा

दिल्लीतील माजी आमदार आणि भाजपा नेते मनजिंदर सिंह सिरसा यांनी एक फोटो ट्वीट केला आहे. यात तो फोटो झुम करत राहुल गांधींनी त्यांच्या टी-शर्टच्या आतून थर्मल कपडे घातल्याचा दावा केला. तसेच राहुल गांधी प्रसिद्धीसाठी असं करत आहे आणि त्यांचा खोटा प्रचार उघड झाला आहे, असा आरोप त्यांनी केला. भाजपाच्या कार्यकर्त्या प्रिती गांधी यांनी तपस्वी थर्मल कपडे घालत असल्याचं म्हणत राहुल गांधींना टोला लगावला.

Congress goa leader
‘आमच्यावर संविधान थोपवलं’, गोव्यातील काँग्रेस नेत्याचे अजब विधान; भाजपाकडून टीका
mamata banerjee
‘काँग्रेस, कम्युनिस्ट हे भाजपाचे एजंट’, ममता बॅनर्जी इंडिया आघाडीवर कडाडल्या
why Kanhaiya Kumar contesting from North East Delhi Lok Sabha seat
कन्हैया कुमारला काँग्रेसने बिहारऐवजी दिल्लीतूनच उमेदवारी का दिली?
Hemant Godse still hopeful for Nashik seat It is claimed that Chief Minister is also insistent
नाशिकच्या जागेसाठी हेमंत गोडसे अजूनही आशावादी, मुख्यमंत्रीही आग्रही असल्याचा दावा

भाजपाच्या टीकेवर काँग्रेसचं प्रत्युत्तर

भाजपाच्या टीकेवर काँग्रेसने प्रत्युत्तर दिलं आहे. काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी भक्त हताश झाल्याची टीका केली. तसेच ते आता सामूहिकपणे राहुल गांधींची मान, छाती झुम करून पाहत आहेत, असाही आरोप केला. काँग्रेसच्या सोशल मीडिया राष्ट्रीय समन्वयक रुचिरा चतुर्वेदी म्हणाल्या, “दोन रुपयांवर काम करणारे ट्रोल्स एका पांढऱ्या टी-शर्टला इतके का घाबरले आहेत?”

काँग्रेस सेवा दलाने एक कार्टून शेअर केलं आहे. त्यात राहुल गांधींच्या आजूबाजूला विविध धर्माचे लोक जमा झाले आहेत आणि ते राहुल गांधींना आलिंगन देत असल्याचं दाखवलं आहे. तसेच या लोकांच्या आलिंगनातून मिळणाऱ्या उर्जेमुळेच राहुल गांधींना थंडी वाजत नसावी असं सूचित केलं आहे. यामुळेच राहुल गांधी यांना गोठवणाऱ्या थंडीतही टी-शर्टवर यात्रेत चालणं शक्य होत असल्याचं म्हटलं.

छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल यांनीही यावर भूमिका मांडत कमी वस्त्रात थंडीत राहणं देशात पहिल्यांदा घडत नसल्याचं सांगितलं. तसेच नागा साधू, दिगंबर जैन मुनी असे अनेक लोक कपड्यांशिवाय अशा थंडीत राहतात असं नमूद केलं. राहुल गांधी जो मुद्दा मांडत आहेत त्यावर संशोधन झालं पाहिजे, अशीही मागणी बघेल यांनी केली.

काँग्रेसचे नेते सलमान खुर्शीद यांनी राहुल गांधी यांना तपस्वी म्हटलं आहे. राहुल गांधी यांनीही एका पत्रकार परिषदेत मला थंडीची भीती वाटत नाही, त्यामुळे मला थंडी जाणवत नाही, असं वक्तव्य केलं होतं.

हेही वाचा : Video : कडाक्याच्या थंडीत काँग्रेस कार्यकर्त्यांच्या दंडबैठका! राहुल गांधींवर टीशर्टवरून टीका करणाऱ्यांना उत्तर

एकूणच राहुल गांधी भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्यानंतर पहिल्या दिवसापासून ते घालत असलेला टी-शर्ट या ना त्या कारणाने चर्चेत आहे. आधी भाजपाने राहुल गांधी बर्बेरी नावाच्या ब्रँडचा ४१ हजार रुपये किंमतीचा टी-शर्ट घालत असल्याचा आरोप केला होता.