संतोष मासोळे

धुळे : शहरात विकास कामे होत नसल्याची ओरड एकीकडे मनपातील सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांसह विरोधकांकडून होत असताना शहरातील विकास कामांसाठी कोणामुळे ३० कोटी रुपयांचा निधी मिळाला, यावरून एमआयएमचे आमदार फारुख शाह आणि भाजपचे खासदार डाॅ. सुभाष भामरे, भाजप महानगर अध्यक्ष अनुप अग्रवाल यांच्यात श्रेयवाद रंगला आहे. शहरातील विकास कामांना खासदार भामरे आणि अग्रवाल यांनीच खीळ घातल्याचा आरोप आमदार शाह यांनी केला आहे.

BJP needs support from MNS A look at Raj Thackeray stance on participation in the Grand Alliance
भाजपला मनसेची साथ हवी ; महायुतीतील सहभागाबद्दल राज यांच्या भूमिकेकडे लक्ष
mla ram satpute slam sushilkumar shinde over development
सोलापूरच्या पूर्वीच्या नेतृत्वाने ७५ वर्षांच्या विकासाचा हिशेब द्यावा; आमदार राम सातपुते यांचे सुशीलकुमार शिंदे यांना आव्हान
Shekap Janyat Patil
VIDEO : सुनील तटकरेंवर शेकापच्या जयंत पाटीलांची शेलक्या शब्दांत टीका
lok sabha election 2024 bjp face hurdle over maharashtra seat sharing deal with shinde shiv sena
कोंडी कायम; शिंदे, पवारांचा अधिक जागांवर दावा; ठाण्यासाठी भाजपचा आग्रह, मनसेच्या समावेशास शिवसेनेचा विरोध

भामरे आणि अग्रवाल ही जोडी वेळोवेळी शहर विकासात कसा खोडा घालत आहे, याची काही उदाहरणे शाह यांनी पत्रकारांसमोर ठेवल्याने हा वाद अधिकच वाढला आहे. ३० कोटी रुपयांच्या रस्ते कामांना भामरे आणि महापौरांसह भाजपच्या अन्य पदाधिकाऱ्यांनी स्थगिती आणल्याचा आरोप करून शाह यांनी खळबळ उडवून दिल्यावर अशी स्थगिती आपण आणली नाही. उलट अधिकचा निधी कसा मिळेल यासाठीच प्रयत्न केल्याचा दावा भाजपच्या नेत्यांनी केला. १५० कोटी रुपये खर्चाची भूमिगत गटार योजना राबविण्यासाठी शहरातील अनेक चांगले रस्तेही खोदावे लागले. पावसाळ्याआधीच अनेक भागांमध्ये जेसीबीच्या सहाय्याने रस्ते खोदण्यात आल्याने विविध वसाहती आणि मुख्य रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट झाली. भूमिगत गटार योजना ही शहरवासीयांसाठी होणारी दिर्घकाळासाठीची व्यवस्था असली, तरी ती पावसाळा संपल्यानंतरही निर्धारीत वेळेत पूर्ण होऊ न शकल्याने महापालिकेतील सत्ताधाऱ्यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. पावसाळ्यात या रस्त्यांवरून पायी चालणेही कठीण झाले होते.

हेही वाचा… अवंतिका लेकुरवाळे : समाजकारणातून राजकारणात

नगरोत्थान योजनेंतर्गत खराब रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी स्वतंत्र निधी मंजूर करून आणल्याचा दावा खासदार भामरे यांनी केला. महाविकास आघाडीच्या अडीच वर्षांच्या सत्ता काळात हा निधी उपलब्ध झाला नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून ३० कोटी रुपये उपलब्ध झाले. हा मंजूर निधी केवळ देवपूर भागातील रस्ते दुरुस्तीसाठी देण्यात आला असताना आमदार शाह यांनी हा निधी अल्पसंख्यांक भागाकडे वळविल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केला.

हेही वाचा… Maharashtra News Live : जितेंद्र आव्हाडांचा राजीनामा स्वीकारणार का?; वाचा राज्यभरातील महत्त्वपूर्ण घडामोडी एकाच क्लिकवर

नगरोत्थान योजनेंतर्गत होणाऱ्या विकास कामांसाठी निधी मिळत असला तरी प्रत्यक्ष काम करतांना ३० टक्के रकमेची तरतूद महापालिकेलाही करावी लागते. मात्र, देवपूर भागासाठी मंजूर झालेला निधी अन्य भागात खर्च करण्याच्या हालचाली शाह यांच्यामार्फत होत असल्याने महापालिकेने आपल्या हिश्याची रक्कम उपलब्ध करून देण्यास आढेवेढे घेतले. एवढेच काय, शाह यांच्या सापत्नभावाच्या कार्यपद्धतीची पुराव्यासह माहिती देऊन अशा कामांना मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती मिळविण्यात आली. त्यामुळे शाह भडकले. त्यामुळेच भामरे आणि मंडळींनी विकास कामांना खीळ घातल्याचा आरोप त्यांनी केला. शाह यांच्या आरोपांनंतर एमआयएमच्या महिला आघाडीकडून भाजप आणि खासदार भामरेंच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात आले. आपण धुळ्यात विकास कामे करत आहोत. पाकिस्तानातील रस्ते दुरुस्तीचे काम नाही करत, असे खडेबोल आमदार शाह यांनी सुनावले. आपण नगरोत्थान योजनेंतर्गत शहरातील कामांचा प्रस्ताव दिला होता. त्यानुसार ३० कोटींची विकास कामे होणार होती. परंतु, राज्य सरकारने या कामांना स्थगिती दिली. भाजपचे खासदार भामरे, महापौर, मनपा आयुक्तांनी मंत्रालयात जाऊन मंत्र्यांचे पाय धरले आणि या कामांना स्थगिती मिळविली, असा आरोप त्यांनी केला. आपण आमदार होण्याआधी नगरसेवकही होतो. त्यामुळे कुठले काम कसे करायला हवे आणि निधी कसा मिळवता येऊ शकतो, याचा अनुभव आहे. तसा भामरे यांना अनुभव नाही, अशी टीकाही शाह यांनी केली. तर ३० कोटींची कामे करून घेण्यासाठी शाह यांची टक्केवारी ठरली होती. त्यासाठी विशिष्ट ठेकेदारांना गळ घालण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करण्यात आल्याने खासदार भामरे विरुद्ध आमदार शहा यांच्यातील वाद पेटता राहिला आहे.

हेही वाचा… हिंगोलीत भारत जोडो यात्रेत राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांचाही उत्साही सहभाग; वादग्रस्त आमदार संतोष बांगर यांनाही डिवचले

भामरे आणि भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी केंद्र व राज्य सरकारकडून मंजूर करून घेतल्याचे सांगत येणाऱ्या वर्षांत या निधीतून शहरातील रस्ते आणि पिण्याचे पाणी यासंदर्भातील तक्रारी दूर होतील, असा दावा केला आहे. एमआयएम विरुद्ध भाजप यांच्यातील या जुगलबंदीच्या स्पर्धेतून शहर विकासाचे स्वप्न पूर्ण व्हावे, हीच धुळेकरांची अपेक्षा आहे. तर आमदार शाह हे साफ खोटे बोलतात. देवपूर भागातील रस्ते दुरुस्तीसाठी ३० कोटींचा निधी मंजूर झाला हे खरे असले, तरी प्रत्यक्षात या रकमेतून दुसरीकडे कामे करण्यात येणार होती. बहुतांश निधी अल्पसंख्यांक भागात खर्च करण्याचा प्रयत्न होता, असे खा. डाॅ. सुभाष भामरे यांनी सांगितले.

हेही वाचा… पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यात भाजपचा संघटनात्मक प्रभाव वाढवण्यावर चंद्रशेखर बावनकुळे यांचा भर

शहर विकासासाठी आणखी जवळपास ६० कोटी रुपये मंजूर झाले आहेत. काही निधी खर्च होत आहे. त्यातून प्रामुख्याने रस्त्यांची कामे प्रगतीपथावर आहेत. आगामी काळात शहर स्वच्छ, सुंदर दिसेलच, पण शहरवासीयांना पूर्णपणे मूलभूत नागरी सुविधा मिळतील, असे
भाजप महानगर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांनी सांगितले.