हर्षद कशाळकर

अलिबाग : रायगड जिल्हा नियोजन समितीच्या आज होणाऱ्या बैठकीवरून राजकारण तापले आहे. गणसंख्या पूर्ण नसल्याने ही बैठक रद्द करावी अशी मागणी खासदार सुनील तटकरे यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे ही मागणी करतांना त्यांनी शिवसेना, शेकाप आणि भाजप आमदारांनी गेल्या बैठकीच्या वेळी तत्कालीन पालकमंत्र्यांना दिलेली पत्र संदर्भ म्हणून जोडली आहेत. त्यामुळे शिवसेना आणि भाजप आमदारांची कोंडी होण्याची चिन्ह दिसत आहेत.

Assured support for Arun Gawli daughter for mayor Controversy over Rahul Narvekar statement
अरुण गवळीच्या कन्येला महापौरपदासाठी पाठिंब्याचे आश्वासन; राहुल नार्वेकर यांच्या वक्तव्याने वाद
eknath shinde
महायुतीच्या सर्व जागा बहुमताने निवडून येणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा, म्हणाले ‘शेतकऱ्यांना मदत…’
Why Are the Rajput community angry at the statement of Union Minister Rupala
गुजरातमध्ये भाजपच्याच नेत्यामुळे भाजप अडचणीत? केंद्रीय मंत्री रुपाला यांच्या विधानावर रजपूत समाज संतप्त का?
Nitin Gadkaris development speed is limited in his second term as MP compared to the first five years
पहिल्या पाच वर्षाच्या तुलनेत दुसऱ्यांदा खासदारकी भूषविताना गडकरींच्या विकास गतीला मर्यादा

हेही वाचा… भाजपाची गुजरातमधील ‘गौरव यात्रा’ काय आहे? नेमका उद्देश काय

जून महिन्यात २७ तारखेला जिल्हा नियोजन मंडळाची बैठक होणार होती. या बैठकीला शिवसेना, भाजप आणि शेकाप आमदारांनी आक्षेप घेतला होता. तत्कालीन पालकमंत्री आदिती तटकरे बैठक व्हावी यासाठी आग्रही होत्या. मात्र सात आमदार आणि एक खासदार यांच्या पत्राचा मान राखून ही सभा स्थगित करावी लागली. कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार वगळता इतर सर्व पक्षीय आमदार या बैठकीला गैरहजर राहिले होते. शिवसेनेचे तिन्ही आमदार बंडखोरी करून यावेळी गुवाहटी येथे होते.

हेही वाचा… “पाच वेळा युती तोडूनही नितीशकुमार सत्तेत”, बिहार दौऱ्यात अमित शाहांचं टीकास्र

यावेळी शिवसेना, भाजप आणि शेकाप आमदारांनी यावेळी आदिती तटकरे यांना दिलेल्या पत्रात, जिल्हा नियोजन समितीचा कोरम पूर्ण होत नसल्याने ही सभा स्थगित करावी असा उल्लेख केला होता. जिल्हा परिषद आणि नगरपालिकांचा कार्यकाळ संपला आहे. त्यामुळे नियोजन समितीवर त्या दोन्ही घटकातून येणाऱ्या सदस्यांची पदे रिक्त आहेत. नगरपंचायत निवडणुका झाल्या असल्या तरी त्या घटकातून नियोजन समितीवर येणाऱ्या सदस्यांची नियुक्ती झालेली नाही. त्यामुळे नियमानुसार नियोजन समितीचे गठन झाले नसल्याचा आक्षेप सातही आमदारांनी घेतला होता. बैठक घेतल्यास न्यायालयात जाण्याचा इशाराही दिला होता. त्यामुळे ही सभा स्थगित करावी लागली होती. त्यामुळे इच्छा असूनही आदिती तटकरे यांना ही बैठक घेता आली नव्हती.

हेही वाचा… राजीनामा नामंजूर करून उमेदवारी रद्द करण्याच्या २०१९ अकोला लोकसभा निवडणुकीतील खेळीचा ऋतुजा लटके यांच्यावर प्रयोग

गेले तीन महिने राजकीय अस्थिरता, राज्यातील सत्तापालट आणि पालकमंत्र्यांच्या नियुक्ती आभावी नियोजन समितीची बैठक होऊ शकली नव्हती. आज पालकमंत्री उदय सामंत यांनी ही बैठक बोलावली आहे. पण खासदार सुनील तटकरे यांनी या बैठकीवर आक्षेप घेतला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे हा आक्षेप घेतांना त्यांनी शिवसेना, भाजप आणि शेकाप आमदारांच्या पत्राचा संदर्भ दिला आहे. आजही जिल्हा नियोजन समितीचे गठन झालेले नाही. जिल्हा परिषद, नगरपालिका आणि पनवेल महानगर पालिकांच्या निवडणूका झालेल्या नाहीत. त्यामुळे त्या घटकातून नियोजन समितीवर येणारे सदस्यपद अद्यापही रिक्त आहे. मग आता ही बैठक कशी होऊ शकते असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तटकरे यांच्यां आक्रमक पावित्र्यामुळे जिल्ह्यातील शिवसेना, भाजप आणि शेकाप आमदारांची कोंडी होण्याची चिन्ह दिसत आहेत. त्यामुळे आजची सभा वादळी ठरण्याची शक्यता आहे. पालकमंत्री उदय सामंत यावर कोणता तोडगा काढतात. तटकरेंचा आक्षेप दूर करण्यासाठी कोणते प्रयत्न करतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.