बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या ‘समाधान यात्रे’वरून राजकीय रणनीतीकार आणि राजकारणी प्रशांत किशोर यांनी टीकास्त्र सोडलं आहे. नितीश कुमार यांची ‘समाधन यात्रा’ म्हणजे “लोकांना मूर्ख बनवण्याचा प्रकार” आहे, अशी टीका प्रशांत किशोर यांनी केली. समाधान यात्रेसारख्या कार्यक्रमांमध्ये आवडते मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या बैठका आयोजित केल्याने लोकांच्या समस्या सुटणार नाहीत, असा टोलाही प्रशांत किशोर यांनी लगावला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गोपालगंज जिल्ह्यातील बरौली येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना प्रशांत किशोर म्हणाले, जेडीयू नेते नितीश कुमार यांनी यापूर्वी अशा अनेक यात्रा काढल्या आहेत. परंतु त्यामुळे राज्यात कोणतेही चांगले बदल झाले नाहीत. ‘समाधान यात्रा’ ही त्यांची १४वी यात्रा आहे. पण राज्यात काहीही बदल झालेला नाही.

हेही वाचा- “भाजपामध्ये सामील व्हा, अन्यथा बुलडोझर…”; भाजपा मंत्र्याची भरसभेतून काँग्रेस नेत्यांना धमकी, VIDEO व्हायरल

ही यात्रा म्हणजे केवळ लोकांना मूर्ख बनवण्याचा प्रयत्न आहे. यात्रेदरम्यान आपले आवडते मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन लोकांचे प्रश्न सुटणार नाहीत,” असंही प्रशांत किशोर म्हणाले. राज्यात सुरू असलेल्या कल्याणकारी योजना आणि प्रलंबित कामांचं मूल्यांकन करणं, संबंधित विकास कामाची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे, हे या समाधान यात्रेचं उद्दिष्ठ्ये आहे.

हेही वाचा- मोदी यांच्यावरील माहितीपटाचे ‘बीबीसी’कडून समर्थन; ब्रिटनमधील भारतीय समुदायाकडून मात्र निषेध

बिहारमध्ये नितीश कुमार यांना काँग्रेसचा पाठिंबा आहे. असं असूनही त्यांनी काँग्रेसच्या ‘भारत जोडो यात्रे’ला हजेरी लावली नाही, अशी टीका प्रशांत किशोर यांनी केली. “देशाच्या विविध भागांतून विविध राजकीय पक्षांचे नेते काँग्रेसच्या ‘भारत जोडो यात्रे’त सहभागी होत आहेत. परंतु नितीश कुमार यांनी काँग्रेसच्या यात्रेत सहभाग घेण्यास नकार दिला,” असंही किशोर पुढे म्हणाले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prashant kishor slams bihar cm nitish kumar for samadhan yatra rmm
First published on: 21-01-2023 at 14:40 IST