राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा उत्तर प्रदेशातील मुरादाबादला पोहोचली, तेव्हा ते एकटे नव्हते, त्यांच्याबरोबर त्यांची बहीण प्रियंका गांधी वड्रादेखील खुल्या जीपमध्ये बसल्या होत्या. मुरादाबाद आणि आजूबाजूच्या परिसरातील लोकांनी राहुल-प्रियांका यांचे जंगी स्वागत केले. राहुल आणि प्रियांका गेल्या अनेक दिवसांपासून उत्तर प्रदेशात सुरू असलेल्या भारत जोडो न्याय यात्रेत पहिल्यांदाच एकत्र दिसले होते. उत्तर प्रदेशात गेल्या निवडणुकीत काँग्रेससाठी मेहनत घेतलेल्या प्रियंका गांधी यांना रस्त्यावर पाहून काँग्रेस समर्थकही चांगलेच जल्लोषात होते.

याआधी चंदौलीतच राहुल यांच्या भेटीला प्रियंका गांधी सहभागी होणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या, मात्र त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला होता. आता राहुल गांधींच्या उत्तर प्रदेश दौऱ्याला शेवटचे २ दिवस बाकी असताना प्रियांकाही त्यांना पाठिंबा देण्यासाठी आल्या आहेत. आज मुरादाबादहून निघून राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा उद्या आग्राला पोहोचणार आहे. उद्या आग्रा येथे होणाऱ्या यात्रेकडे संपूर्ण देशाचे लक्ष असेल. उद्या अखिलेश यादवही राहुल गांधींच्या लाल जीपमध्ये बसतील. प्रदीर्घ चर्चा आणि बैठकीनंतर अखेर सपाने यूपीमध्ये काँग्रेसला १७ जागा दिल्या, त्यानंतर राहुल आणि अखिलेश पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. यूपीमधील दोन मोठ्या विरोधी नेत्यांचे एकत्र येणे इंडिया आघाडीसाठी संजीवनीपेक्षा कमी नाही. काँग्रेसच्या अंतर्गत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन वर्षांपूर्वीपर्यंत पक्षाच्या यूपी कारभाराचा प्रभारी असलेले काँग्रेस नेते राहुल यांच्याबरोबर असतील, कारण ही यात्रा मुरादाबादमधून मार्गक्रमण करते आणि त्यानंतर अमरोहा, संभल, बुलंदशहर, अलिगढ, हाथरस आणि आग्रा मार्गे प्रवास करणार आहे. रविवारी फतेहपूर सिक्री येथे यात्रेचा समारोप होईल. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव हे २५ फेब्रुवारीला आग्रा येथील यात्रेत सामील होतील.

हेही वाचाः आप आणि काँग्रेस दिल्लीत भाजपाविरोधात एकत्र लढणार, पण गुजरात, आसाम अन् गोव्याचे काय?

२६ फेब्रुवारी ते १ मार्चपर्यंत यात्रा स्थगित असणार

२६ फेब्रुवारी ते १ मार्च या कालावधीत न्याय यात्रेला ब्रेक लागणार असल्याचे काँग्रेसने सांगितले. २७ ते २८ फेब्रुवारी रोजी राहुल गांधी ब्रिटनच्या केंब्रिज विद्यापीठात व्याख्यान देण्यासाठी जाणार आहेत. मात्र, २ मार्चपासून मध्य प्रदेशातून हा प्रवास पुन्हा सुरू होईल. ५ मार्च रोजी राहुल गांधी उज्जैन येथील महाकालेश्वर मंदिराला भेट देणार आहेत. या काळात ते नवी दिल्लीतील महत्त्वाच्या बैठकांनाही हजर राहतील, असे त्यात म्हटले आहे. २ मार्च रोजी दुपारी २ वाजता धौलपूर येथून हा प्रवास पुन्हा सुरू होईल. त्यानंतर यात्रा मध्य प्रदेशात जाणार आहे आणि मुरैना, ग्वाल्हेर, शिवपुरी, गुना, शाजापूर आणि उज्जैनसह राज्यातील इतर जिल्ह्यांमधून प्रवास करतील. यात्रा २६ फेब्रुवारी ते १ मार्च या पाच दिवसांसाठी स्थगित करणार येणार असून, यादरम्यान राहुल गांधी यांना त्यांच्या अल्मा माटर केंब्रिज विद्यापीठात दोन व्याख्याने देण्यासाठी यूकेला जाण्याची परवानगी मिळेल. तसेच नवी दिल्लीतील महत्त्वाच्या बैठकांना उपस्थित राहता येणार आहे.

हेही वाचाः Loksabha Election: गुजरातमधील भरुचमध्ये आप-काँग्रेसमध्ये जागावाटपावरून मतभेद; नेमके प्रकरण काय?

तृणमूल काँग्रेस (TMC) आणि नॅशनल कॉन्फरन्स (NC) यांच्याशी चर्चा झाल्याचा काँग्रेसचा दावा

उत्तर प्रदेशमधील जागावाटपाचा तिढा सुटलेला असताना महाराष्ट्र आणि बिहार यांसारख्या इतर राज्यांमध्ये जागा वाटपाचे करार अंतिम करण्यासाठी किती वेळ लागेल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण उत्तर प्रदेश करार आणि दिल्लीसाठी आम आदमी पार्टी (आप) बरोबरचा करार जाहीर झाल्यापासून विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीला एक मजबूत ताकद मिळत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. काँग्रेस गोवा आणि गुजरातसारख्या राज्यांमध्येही आपबरोबर आघाडी करण्याचा प्रयत्न करीत आहे. तसेच तृणमूल काँग्रेस (TMC) आणि नॅशनल कॉन्फरन्स (NC) यांच्याशी चर्चा झाल्याचा दावा काँग्रेसच्या वतीनं करण्यात आला आहे. लालमणी वर्मा यांना सांगितले की, टीएमसी पश्चिम बंगालमधील मतदारसंघांच्या बदल्यात आसाम आणि मेघालयमधील जागांसाठी काँग्रेसशी वाटाघाटी करीत आहे. TMC राज्यसभा खासदार डेरेक ओब्रायन यांनी म्हटले आहे की, पक्षाच्या स्थितीत कोणताही बदल झालेला नाही. ते बंगालमधील सर्व ४२ जागा लढवणार आहेत. “आम्ही आसाममधील काही जागांवर आणि मेघालयातील तुरा लोकसभा जागेवरही निवडणूक रिंगणात आहोत,” असे त्यांनी शुक्रवारी सांगितले.