दीपावलीच्या प्रकाश पर्वात भाजपची ‘धन्यवाद मोदीजी’ प्रचार मोहीम; ‘ लाभार्थी 'मतदार’ करण्याचा दिवाळी धमाका | publicity of Modi work through postal service on Diwali occasion by BJP | Loksatta

दीपावलीच्या प्रकाश पर्वात भाजपची ‘धन्यवाद मोदीजी’ प्रचार मोहीम; ‘ लाभार्थी ‘मतदार’ करण्याचा दिवाळी धमाका

शासकीय लाभ घेतलेल्या व्यक्ती अथवा कुटुंबाने ‘ धन्यवाद मोदीजी’ असे शब्द लिहिलेल्या पोस्टकार्डावर आपल्या भावना लिहून ते कार्ड भाजप कार्यकर्त्यांस द्यावे किंवा त्या कार्डवर तिकिट लावून ते कार्ड डाकघरात पाठवावे, अशी प्रचार योजना तयार झाली आहे.

दीपावलीच्या प्रकाश पर्वात भाजपची ‘धन्यवाद मोदीजी’ प्रचार मोहीम; ‘ लाभार्थी ‘मतदार’ करण्याचा दिवाळी धमाका
दीपावलीच्या प्रकाश पर्वात भाजपची ‘धन्यवाद मोदीजी’ प्रचार मोहीम; ‘ लाभार्थी 'मतदार’ करण्याचा दिवाळी धमाका

सुहास सरदेशमुख

शासकीय योजनांच्या लाभार्थींनी ‘भाजप’चे मतदार व्हावेत या प्रक्रियेस आता दीपावलीचे निमित्त साधून वेग दिला जाणार आहे. लाभ घेतलेल्या व्यक्ती अथवा कुटुंबाने ‘ धन्यवाद मोदीजी’ असे शब्द लिहिलेल्या पोस्टकार्डावर आपल्या भावना लिहून ते कार्ड भाजप कार्यकर्त्यांस द्यावे किंवा त्या कार्डवर तिकिट लावून ते कार्ड डाकघरात पाठवावे, अशी प्रचार योजना तयार झाली आहे. प्रत्येक जिल्हास्तरावर पंतप्रधानांचा पत्ता असलेले कार्ड वितरित करण्यात आले आहेत.

हेही वाचा… काँग्रेसचे नवे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासमोर असतील ‘ही’ पाच आव्हाने

शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी बँकांचा राजकीय साधन म्हणून सध्या जोरात उपयोग सुरू आहे. मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये कर्जमेळावे तर घेतले जात आहेतच, शिवाय विविध योजनांचा लाभ मिळालेले लाभार्थी किती याची वार्डस्तरीय तसेच मतदार यादीतील ‘पन्नानिहाय’ यादी करण्यात आली आहे. हे पोस्ट कार्ड या प्रत्येक लाभार्थीच्या घरी द्यायचे, सोबतीला दीपावलीच्या शुभेच्छा द्यायच्या आणि ‘ लाभार्थी’ ने व्यक्त केलेल्या भावनांचे पत्र पंतप्रधानापर्यंत पोहचवायचे, असे या प्रचार मोहिमेचे स्वरूप असणार आहे. गेल्या काही वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्रे विविध योजनांच्या लाभार्थीपर्यंत पद्धतशीरपणे पोहचविण्यात आले. उज्ज्वला योजना, पंतप्रधान स्वनिधी योजना, ‘मुद्रा’ योजनेतील कर्जदार, आवास योजनेतून दोन ते अडीच लाखांची सवलत मिळविणारे शहरी लाभार्थी यासह सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील लाभार्थींना पोस्टकार्ड दिले जाणार आहेत. हे सारे करताना ज्या घरात लाभ मिळणे बाकी आहे, अशा मतदारांना ते लाभ मिळावेत अशासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत, अशा सूचनाही कार्यकर्त्यांना देण्यात आल्या आहेत. जेवढे लाभार्थी अधिक तेवढे मतदार होण्याची शक्यता अधिक असल्याने ही प्रचार मोहीम ऐन दीपावलीमध्ये आखण्यात आली आहे. १५ ऑक्टोबर पासून ते २ नोव्हेंबरपर्यंत अशी पत्र पाठविली जावीत, अशी रचना भाजपने लावली आहे.

हेही वाचा… ‘भारत जोडो’ यात्रेमुळे संघाचीही भाषा बदलू लागली! – काँग्रेसचे माध्यमविभाग प्रमुख जयराम रमेश यांचे मत

हेही वाचा… Maharashtra News Live : खासदार राजन विचारेंची नवी मुंबई पोलिसांसोबत जोरदार बाचाबाची; राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर…

कार्डाच्या पाठिमागे ‘धन्यवाद मोदीजी’ – ‘अंत्योदय ते भारत उदय’ असे घोषवाक्य लिहिण्यात आले असून त्यात डिजिटल इंडिया, आयुष्यमान भारत, गरीब कल्याण योजना, स्किल इंडिया, पीक विमा योजना, स्वच्छ भारत, आवास योजना, उज्ज्वला योजना दिल्याबद्दल हे धन्यवाद देत असल्याचे चित्र मतदारांच्या मनात बिंबविण्याचा हा प्रयत्न केला जात आहे.

हेही वाचा… गांधी घराण्याचा खरगेंनाच होता पाठींबा, राहुल गांधींच्या ‘त्या’ वक्तव्याने चर्चांना उधाण

हेही वाचा… चंद्रकांत पाटील करणार अजितदादांचा ‘हिशोब’ चुकता

पीक विमा योजनेची रक्कम आता शेतकऱ्यांच्या खात्यात येणे सुरू झाले असून केंद्र सरकारच्या वतीने शेतकऱ्यांसाठीची पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा हप्ताही नुकताच खात्यात देण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या या योजनांबरोबरच राज्यात दिवाळीनिमित्त किराणाचे ‘किट’ देण्यासाठी सार्वजनिक वितरण प्रणालीतील अधिकाऱ्यांच्या बैठकावर बैठका सुरू आहेत. दरम्यान ज्यांनी नियमित कर्ज फेडले अशा राज्यातील आठ लाख २९ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात ५० हजार रुपये देण्याचा कार्यक्रमही आवर्जून घेतला जात आहे. दीपावलीपूर्वी शेतकरी आणि लाभार्थींना मतदार बनविण्याची मोहीम राज्य सरकारकडूनही आखली जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवंद्र फडणवीस, सहकार मंत्री अतुल सावे आदीच्या उपस्थितीमध्ये ५० हजार रुपयांच्या वितरणाचा कार्यक्रमही हाती गुरुवारी हाती घेण्यात आला आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 19-10-2022 at 17:45 IST
Next Story
काँग्रेसचे नवे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासमोर असतील ‘ही’ पाच आव्हाने