पुणे : विधान परिषदेच्या पुणे पदवीधरमतदारसंंघातभाजपच्याउमेदवारडाॅ. स्मिता जाधव यांचा पराभव झाल्याने वर्मी घाव बसलेल्याभाजपने आता नगरसेवकआणि प्रमुख पदाधिकाऱ्यांचेनिवडणुकीतीलकामाचे‘रिपोर्टकार्ड’तयार केले आहेत. त्या आधारे पक्षांतर्गत बदलाच्या हालचाली सुरू झाल्याने पुण्यातील भाजपमध्ये अस्वस्थता पसरली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश देऊनही मतदार नोंदणी आणि मतदान कमी झालेल्या प्रभागांतील नगरसेवकांना आता आगामी काळात महापालिकेतील महत्त्वाच्या पदांपासून दूर राहावे लागण्याची शक्यता आहे.

पदवीधरमतदार संघात भाजपच्या उमेदवार डॉ. स्मिता जाधव यांचा पराभव करून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्याहर्षदा देशमुख-जाधव या विजयी झाल्या. ही जागा भाजपनेप्रतिष्ठेचीकेलीहोती.जास्तीतजास्तमतदारनोंदणीआणिमतदानासाठीभाजपच्या वरिष्ठ नेत्यांनीपुण्यावरलक्ष केंद्रित केले होते.पुण्याततुलनेनेमतदार नोंदणी कमी झाल्याने पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील नगरसेवकांनामतदारनोंदणीसाठी सक्ती करण्यातआली.पुण्यात प्रत्येक नगरसेवकाला १५००, तर पिंपरी-चिंचवडमधील नगरसेवकालाप्रत्येकी५००मतदारनोंदविण्याचे लक्ष्य देण्यातआलेहोते. तरीही अपेक्षित मतदारनोंंदणीझालीनसल्याचे स्पष्ट झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसयांनी या प्रकाराची दखल घेतली. संबंधित नगरसेवकांचीकानउघाडणीकरूनभविष्यातपदेदेताना‘रिपोर्टकार्ड’पाहण्याचा इशारा दिला.

पदवीधरमतदार संघात अपेक्षित यश न मिळाल्यानेभाजपने आता नगरसेवकांचे‘रिपोर्टकार्ड’तयार केले आहे.तसेच प्रमुख पदाधिकाऱ्यांच्याहीकामाचाआढावाघेण्यात आला आहे. मुख्यमंत्री फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण; तसेच पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी याबाबतचा आढावा घेतल्याने पुण्यातील भाजपमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

‘कारणे दाखवा’नोटिसीला उत्तर काय द्यायचे?

पुणे महापालिकेतभाजपचेनिवडूनआलेले११९आणि सात स्वीकृत असे१२६नगरसेवकआहेत.त्यापैकीसुमारे१००नगरसेवकांनी शुभ्रारंभाच्या प्रचारसभेला दांडी मारल्याने त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याबाबतच्या नोटिसा पाठविण्यात आल्या. त्या नगरसेवकांना अनुपस्थित राहण्यासाठी कोणते कारण द्यायचे, असा प्रश्न पडला आहे. काही प्रमुख पदाधिकारी आणि नगरसेवकांनी तोंडी कारणे सांगितली आहेत. मात्र, त्यावर वरिष्ठ नेत्यांचे समाधान झाले नसल्याने आता संबधितांना लेखी उत्तर द्यावे लागणार असल्याचे सांगण्यात आले.

मूळ‘राष्ट्रवादी’तीलनगरसेवकांमुळेशिस्तीला बाधा?

भाजपने२०१७च्यामहापालिकानिवडणुकीत सत्ता मिळविण्यासाठी अन्य पक्षांतील प्रभावी स्थानिक नेत्यांनापक्षात प्रवेश दिला.पक्षवाढीसाठी ही गोष्ट आवश्यक होती.त्यामुळेभाजपसत्तेवरआली.नुकत्याचझालेल्यानिवडणुकीपूर्वीहीभाजपने अन्य पक्षांतील स्थानिक नेत्यांची भरती केली.निवडणुकीच्याप्रचाराच्याशुभारंभाला अनुपस्थित राहिलेल्या १०० नगरसेवकांमध्येमूळ तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसमधूनयेऊन आता भाजपवासीझालेले नगरसेवक हे जास्तआहेत.त्यांच्यामुळेभाजपच्याशिस्तीला बाधा आल्याची चर्चा राजकीय वर्तुळातआहे.

………