अविनाश कवठेकर

पुणे शहरातील राजकारणाचा स्तर ढासळत असल्याची खंत भारतीय जनता पक्षाचे खासदार गिरीश बापट यांनी समाजमाध्यमातून व्यक्त केली आणि साहजिकच बापट असे का बोलले ? बापट यांना झाले तरी काय ? असे प्रश्न उपस्थित होण्यास सुरुवात झाली. मात्र काँग्रेसचे प्रभारी शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी राजकारणाचा स्तर खालावत असल्याची खंत पत्राद्वारे खासदार बापट यांच्याकडे व्यक्त केल्यानंतर बापट यांनी राजकीय परिस्थितीवर सडेतोड भाष्य केल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे काँग्रेसची खंत भाजप खासदार गिरीश बापट यांच्या मुखातून बाहेर पडल्याची चर्चा शहरातील राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

What Sharad Pawar Said About Modi?
“मोदींच्या विरोधात लोकांमध्ये रोष असल्यानेच आता भाजपा हिंदू-मुस्लिम..”, शरद पवारांचा हल्लाबोल
Amit Shah on ajit pawar
भाजपाला साथ दिल्यानंतर अजित पवारांच्या चौकशा का थांबल्या? अमित शाह म्हणाले, “आम्ही आमचं काम…”
Akhilesh Yadav
रामाची भूमिका साकारणाऱ्या अरुण गोविल यांच्या विरोधात सपाने ऐन वेळी उमेदवार बदलला, नेमकं कारण काय?
hema malini and yogi
‘काँग्रेसचे मानसिक संतुलन ढळले’; हेमा मालिनी यांच्याबाबत कथित आक्षेपार्ह विधानांनंतर भाजपची टीका

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ‘ भारत जोडो’ यात्रे दरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले. त्यावरून भारतीय जनता पक्षाने आक्रमक भूमिका घेतली. काँग्रेसच्या निषेधार्थ आंदोलन करताना भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस भवनातच धिंगाणा घातला. राहुल गांधी यांच्या प्रतिमेला काळे फासण्यात आले. शहर काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी शेगांव येथे राहुल गांधी यांच्या सभेला उपस्थित असताना हा प्रकार घडला. भाजप आणि काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी परस्परविरोधी तक्रार अर्जही पोलिसांकडे दिले. या प्रकारानंतर काँग्रेस प्रभारी शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी शहरातील राजकीय वातावरण कलुषित होत असल्याबद्दल खंत व्यक्त केली.

हेही वाचा… नागपूर जिल्हा परिषदेत निधी अडवून भाजपने केली सत्ताधारी काँग्रेसची कोंडी

भाजप युवा मोर्चाच्या पदाधिका-यांनी काँग्रेस भवनात घातलेला गोंधळ निंदनीय आणि खेदजनक आहे. शहराच्या सांस्कृतिक प्रतिमेस डागाळणाऱ्या या घटनेची भाजपचे हेडमास्तर म्हणून दखल घ्यावी आणि राजकीय विश्वात नव्याने वाढू पाहणारी विषवल्ली मुळापासून उखडण्यात सकारात्मक क्रियाशीलता दाखवावी अशी अपेक्षा अरविंदे शिंदे यांनी व्यक्त केली. शहराची राजकीय संस्कृती किती प्रगल्भ आहे, याची उदाहरणे देत भाजपमधील उतावळ्या पदधिकाऱ्यांना शाब्दिक मार द्यावा, अशी आग्रही मागणीही शिंदे यांनी केली आहे.

हेही वाचा… अभिजीत फाळके : विधायक कामातून राजकारणात

काँग्रेस शहराध्यक्षांच्या या पत्राची दखल खासदार बापट यांनी घेतली. राजकारणाशी काहीही देणेघेणे नाही असा पुण्यातील सामान्य माणूस सध्या खूप अस्वस्थ आहे. भविष्यात मतदान करू की नको, अशी त्यांची मानसिकता झाली आहे. सब घोडे बारा टक्के या नात्याने सगळेच राजकीय पक्ष वागू लागले असल्याने सामान्य माणसाने कोणाकडे पाहायचे अशा शब्दांत खासदार बापट यांनी खडे बोल सुनावले आहेत. राजकीय पक्षांनी पातळी सोडून वर्तन सुरू केले आहे. पुणेही या प्रकाराला अपवाद नाही. पुण्यासारख्या सुसंस्कृत नेतृत्व दिलेल्या शहरात असा प्रकार होऊ लागला तर सर्वच पक्षांनी आणि त्या पक्षाच्या प्रमुख नेतृत्वाने याबाबत पुनर्विचार केला पाहिजे, असे सडेतोड मतही नोंदवत बापट यांनी स्वपक्षाबरोबरच विरोधकांनाही सुनावले.

हेही वाचा… एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यांनी साताऱ्यात भाजप-शिंदे गटाच्या राजकारणाला गती

गेल्या काही महिन्यांपासून खासदार गिरीश बापट सातत्याने स्वपक्षातील पदाधिकाऱ्यांच्या वर्तनाबाबत नाराजी व्यक्त करत आहेत. विस्कळीत पाणीपुरवठ्याच्या तक्रारीवरून स्वपक्षावर टीका, नदीसुधार योजनेच्या संथ गतीने होत असलेल्या कामांबाबत महापौरांवर नाराजी, संकल्पना फलक आणि महापालिकेच्या माध्यमातून नागरिकांसाठी उभारलेल्या वास्तूंना कुटुंबियांची नावे देण्यावरून नगरसेवकांचे जाहीर कार्यक्रमात टोचलेले कान आणि पक्षाच्या कार्यक्रमाला अनुपस्थित राहिल्याने नगरसेवकांकडून मागितलेले खुलासे, या खासदार गिरीश बापट यांच्या कृतीने कार्यकर्ते सध्या संभ्रमावस्थेत आहेत.

हेही वाचा… मंत्रपठण-पूजाअर्जा करून राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षपदाचा हंसराज अहिर यांच्याकडून स्वीकार

सलग पाच वेळा नगरसेवक, त्यानंतर तीन वेळा आमदार आणि सध्या खासदार असलेले गिरीश बापट यांचा कसबा विधानसभा मतदारसंघ बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. २०१७ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाला महापालिकेच्या इतिहासात प्रथमच स्पष्ट बहुमत मिळाले. मात्र गेल्या काही वर्षांत त्यांची पक्ष संघटनेवरील पकड काहीशी कमकुवत झाली. पुण्याचे राजकीय नेतृत्व भाजपचे तत्कालीन राज्यसभा खासदार संजय काकडे की गिरीश बापट यांच्याकडे, यावरून भाजपमध्ये गटातटाचे राजकारण सुरू झाले. त्यातच विद्यमान मंत्री चंद्रकांत पाटील यांना पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघातून पक्ष नेतृत्वाने उमेदवारी दिली आणि शहराच्या राजकारणात त्यांचाही सक्रीय सहभाग वाढला. शहराचे नेतृत्व पाटील यांच्याकडे गेल्याने बापट यांची नाराजी लपून राहिली नाही. आगामी महापालिका निवडणूक गिरीश बापट यांच्याच नेतृत्वाखाली लढविली जाईल, असे चंद्रकांत पाटील सांगत असले तरी बापट यांचा आता शहरातील राजकारणात सक्रीय सहभाग राहिलेला नाही, ही वस्तुस्थिती आहे.

हेही वाचा… काँग्रेसने थेट रावणाशी तुलना केल्यानंतर नरेंद्र मोदी पुन्हा आक्रमक; म्हणाले, “काँग्रेस नेते मला अपशब्द बोलतात, मात्र…”

नगरसेवक, आमदार, पालकमंत्री, राज्य मंत्रिमंडळात मंत्री आणि आता खासदार असा राजकीय प्रवास झालेल्या बापट यांना प्रकृती फारशी साथ देत नसल्याने ते आता सक्रीय राजकारणात नाहीत. त्यांची सून स्वरदा यांना महापालिका निवडणुकीत उमेदवारी द्यावी किंवा कसब्यातून विधानसभेसाठी त्यांच्या नावाचा विचार व्हावा, अशी बापट यांची अपेक्षा आहे. खासदार म्हणून कार्यरत असताना पुण्याच्या विकासासाठी फारसे काही करणे बापट यांना जमले नाही. त्यावरून भाजपविरोधी पक्षांकडून बापट यांच्यावर टीका होत आहे. खासदार म्हणून काम करण्याची संधी पुन्हा मिळेल का, याबाबतही साशंकता आहे. पक्षसंघटनेवरील कमकुवत झालेली पकड आणि बदलत्या राजकीय परिस्थितीमुळेच बापट स्वपक्षावर सातत्याने टीका करत आहेत आणि हेच बापट यांच्या नाराजीचे मूळ कारण आहे, अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे. त्यामुळे काँग्रेसची खंत बापट यांच्या वाणीतून व्यक्त झाली,अशी चर्चा होत आहे.