पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांची पत्नी आणि पटियालाच्या खासदार परनीत कौर यांच्या विरोधात काँग्रेसने कारवाई करत, त्यांना पक्षातून निलंबित केले आहे. परनीत कौर यांच्यावर पक्षविरोधी काम करत, भाजपाची मदत केल्याचा आरोप आहे. याशिवाय काँग्रेसने त्यांना कारणे दाखवा नोटीसही बजवाली आहे. ज्यामध्ये तुमच्यावर निलबंनाची कारवाई का केली जाऊन नये, यावर तीन दिवसांच्या आत उत्तर देण्यास सांगितले होते. ज्यावर आता परनीत कौर यांनी काँग्रेसला उत्तर दिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काँग्रेसच्या नोटिशीला उत्तर देताना परनीत कौर म्हणाल्या, मी नेहमीच आपला भाग आणि पंजाबच्या बाजूने उभी राहिली आहे आणि त्यांचे मुद्दे उचलले आहेत. मग भलेही कोणतेही सरकार असेल. जिथपर्यंत माझ्यावरील कारवाईचा प्रश्न आहे, तर तुम्ही हवी ती कारवाई करण्यासाठी मोकळे आहात.

तारिक अन्वर यांना पाठवलेल्या पत्रामध्ये परनीत कौर यांनी सांगितले की, मुझे तुमची नोटीस मिळाली. मी हे पाहून स्तब्ध आहे की ज्या व्यक्तीने १९९९ मध्ये सोनिया गांधींच्या परदेशा नागरिक असल्याच्या मुद्द्यावर काँग्रेस सोडली होती आणि २० वर्षे २०१९ पर्यंत पक्षाबाहेर राहिले, आता ते मला कथितरित्या नियमांबाबत प्रश्न विचारत आहेत.

परनीत कौर म्हणाल्या की, पंजाबमध्ये काँग्रेस नेत्यांनी माझ्यावर आरोप केला आहे, हे तेच लोक आहेत ज्यांच्याविरोधात अनेक मुद्य्यांवर आतापर्यंत काहीच निर्णय झाला नाही. जर तुम्ही माझ्या पतीशी संपर्क साधा असाल तर ते तुम्हाला सर्व माहिती देतील. त्यांनी त्यावेळी या नेत्यांना वाचवलं कारण ते त्यांच्या आपल्या पक्षाचे होते. मला नाही वाट की तुम्ही असं कराल.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Punjab congress news mp parneet kaur replied to congress notice msr
First published on: 07-02-2023 at 17:36 IST