पंजाबमधील विधानसभा निवडणुकीआधी काँग्रेसने कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या जागेवर चरणजितसिंग चन्नी यांना मुख्यमंत्रीपदी नियुक्त केले होते. चन्नी पंजाबमधील पहिले दलित मुख्यमंत्री ठरले. मात्र २०२२ साली पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत चन्नी खास कामगिरी करू शकले नाहीत. ते या निवडणुकीत दोन्ही जागांवर पराभूत झाले होते. दरम्यान जालंधर लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी संधी दिली जाईल, अशी आशा बाळगून असलेल्या चन्नी यांना चांगलाच झटका बसला आहे. दिल्लीमधील हायकमांडने चन्नी यांच्याऐवजी करमजित कौर चौधरी या काँग्रेसच्या उमेदवार असतील, असे जाहीर केले आहे.

हेही वाचा >>> काँग्रेस पक्षाची केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या विरोधात विशेषाधिकार भंगाची नोटीस

chandrapur lok-sabha-constituency-review-2024 challenge for Sudhir Mungantiwar
मतदारसंघाचा आढावा : चंद्रपूर- काँग्रेसच्या ताब्यातील मतदारसंघात सुधीर मुनगंटीवार यांची कसोटी
candidates contesting lok sabha elections meet voters
काँग्रेस, वंचितच्या उमेदवाराला मतदारांची मदत; भाजप उमेदवाराकडून मतदारांना ‘मोदींचा नमस्कार’
bal hardas nilesh sambare marathi news,
कल्याणमध्ये शिवसेनेचे बाळ हरदास, जिजाऊचे नीलेश सांबरे यांची भेट; लोकसभा निवडणुकीसाठी सहकार्याची गळ
kalyan subhash bhoir marathi news, subhash bhoir kalyan lok sabha marathi news
कल्याण लोकसभेसाठी माजी आमदार सुभाष भोईर इच्छुक, समर्थकांची जोरदार तयारी

करमजित कौर चौधरी यांना काँग्रेसने दिली संधी

विधानसभा निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागल्यामुळे काँग्रेस जालंधर लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीकडे लक्ष ठेवून आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांचे मनोबल वाढावे म्हणून कोणत्याही परिस्थितीत ही निवडणूक जिंकायचीच असा निर्धार काँग्रेसने केला आहे. या पोटनिवडणुकीची अद्याप घोषणा झालेली नाही. मात्र काँग्रेस आतापासूनच तयारीला लागली आहे. काँग्रेसने चन्नी यांना संधी नाकारत करमजित कौर चौधरी यांना उमेदवारी दिली आहे. करमजित कौर या दिवंगत खासदार चौधरी संतोखसिंग यांच्या पत्नी आहेत. संतोखसिंग यांचे भारत जोडो यात्रेदरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. त्यामुळे जालंधर लोकसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे.

हेही वाचा >>> Same-sex marriage: समलिंगी विवाहाला केंद्राचा विरोध, पण संघाचा समलैंगिकतेबद्दलचा दृष्टिकोन काळानुरूप बदलला

उमेदवारी मिळवण्यासाठी चन्नी यांच्याकडून प्रयत्न

२०२२ साली पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत चरणजितसिंह चन्नी यांनी दोन मतदारसंघांतून निवडणूक लढवली होती. मात्र या दोन्ही जागांवर त्यांचा पराभव झाला. त्यानंतर राजकीय पुनर्वसन होण्यासाठी जालंधर लोकसभा पोटनिवडणुकीत संधी दिली जाईल, अशी आशा चन्नी यांना होती. मागील काही दिवसांमध्ये त्यांनी जालंधर मतदारसंघाचे अनेक दौरेही केले होते. कार्यकर्त्यांनाही तयारीला लागण्याचा आदेशही त्यांनी दिला होता. मात्र ऐन वेळी काँग्रेसने धोका न पत्करण्याचा निर्णय घेत चन्नींऐवजी करमजित कौर चौधरी यांना संधी दिली.

हेही वाचा >>> भाजपाचे ‘मिशन ओडिशा’ सुरू; BJD चे मैत्रीपूर्ण संबंध बाजूला सारत २०२४ ची निवडणूक जिंकण्याचे लक्ष्य

निवडणूक जिंकण्यासाठी काँग्रेसने कंबर कसली

जालंधर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची अद्याप घोषणा झालेली नाही. मात्र तरीदेखील ही जागा जिंकण्यासाठी काँग्रेसने तयारी सुरू केली आहे. या मतदारसंघात काँग्रेसने डझनभर प्रभारींची नुयक्ती केली आहे. या लोकसभा मतदारसंघात २०२२ सालच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने एकूण नऊ जागांपैकी पाच जागांवर विजय मिळवला होता.

हेही वाचा >>> अमरावती: सत्तेत असूनही आमदार बच्चू कडूंची कोंडी ?

दरम्यान, ही जागा जिंकण्यासाठी आम आदमी पक्षदेखील तेवढ्याच ताकदीने मैदानात उतरणार आहे. या अटीतटीच्या लढतीत कोणाचा विजय होणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.