सौरभ कुलश्रेष्ठ

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उत्तराखंड विधानसभेच्या फेब्रुवारी २०२२ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत पराभूत झालेले मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी आता चंपावत पोटनिवडणुकीत विक्रमी ५५ हजार मतांनी निवडून आले आहेत. महाराष्ट्रातील भाजपचे नेते व राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्या नियोजनाचा हातभार धामी यांच्या विजयात लागला आहे.

पुष्करसिंह धामी यांच्या तीन महिन्यांपूर्वीच्या खटिमा मतदारसंघातील पराभवाच्या पार्श्वभूमीवर चंपावत पोटनिवडणुकीत पक्षाची प्रतिष्ठा टिकवण्याची आणि धामी यांना चांगल्या मताधिक्‍याने विजयी करण्याची गरज भाजपला होती. उत्तराखंडमधील भाजपचे स्थानिक बडे नेते पुन्हा गडबड करू शकतात ही गोष्ट लक्षात ठेवत चंपावत निवडणुकीची जबाबदारी राष्ट्रीय सरचिटणीस व भाजपचे नेते विनोद तावडे यांच्यावर सोपवण्यात आली.

दिल्ली विधानसभा पोटनिवडणूक: आप विरुद्ध भाजपा रंगणार सामना

चंपावत मतदारसंघात भाजपाचे कैलासचंद्र गेहतोडी ५३२० मतांनी विजयी झाले होते. त्यांनी धामी यांच्यासाठी आमदारकीचा राजीनामा देत जागा रिकामी केली. चंपावत पोटनिवडणुकीची जबाबदारी मिळाल्यानंतर विनोद तावडे यांनी मतदानाच्या किमान ८० टक्के मते ही धामी यांना मिळावीत या दृष्टीने नियोजन केले. एकनिष्ठ कार्यकर्ते निवडणे, लोकप्रतिनिधींवर जबाबदारी, रोजच्या कार्यक्रमांची आखणी करणे आणि लोकांच्या मनाला भिडतील असे मुद्दे प्रचारात आणणे अशी आखणी तावडे यांनी केली. तसेच माझे गाव मुख्यमंत्री निवडणार अशी भावनिक घोषणा प्रचारात आणली. त्यातून पोटनिवडणुकीत झालेल्या ६२ हजार ३०६ मतदानापैकी तब्बल ५८ हजार मते पुष्करसिंह धामी यांना मिळाली. दुसऱ्या क्रमांकावरील उमेदवाराला अवघी ३२३३ मते मिळाल्याने धामी हे ५५ हजार मतांनी विजयी झाले. उत्तराखंडमध्ये भाजपच्या नेतृत्वाची आणि मुख्यमंत्री धामी यांची प्रतिष्ठा वाढवण्यात विनोद तावडे या महाराष्ट्र भाजपच्या नेत्याचा हातभार लागला.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pushkar dhami uttarakhand cm bjp leader vinod tawde help election pmw
First published on: 04-06-2022 at 11:44 IST