West Bengal Law college Rape case: २५ जून रोजी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी दिघा इथे जगन्नाथ मंदिरात पहिल्या रथयात्रेच्या तयारीची पाहणी करण्यासाठी गेल्या होत्या. त्याच दिवशी कोलकातामधील लॉ कॉलेजमध्ये २४ वर्षीय विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार झाल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. आरजी कर मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात एका ज्युनियर डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्येच्या प्रकरणाला जेमतेम १० महिनेच झाले असताना लॉ कॉलेजमधील हे प्रकरण समोर आले. या घटनांविरोधात शहरात तीव्र निदर्शनं होत आहेत. तसंच तृणमूल काँग्रेस सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जात आहे. कोलकाता पोलिसांनी लॉ कॉलेज बलात्कार प्रकरणात तृणमूल काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेचे माजी नेते मनोजित मिश्रा यांच्यासह चार जणांना अटक करण्यात आली. त्यानंतर तृणमूल काँग्रेस पुन्हा कचाट्यात सापडली आहे.

ऑगस्ट २०२४ मध्ये आरजी कार इथे झालेल्या बलात्कार आणि हत्येनंतर पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात निदर्शने झाली. वैद्यकीय संघटनांच्या सदस्यांनी या निदर्शनांचे नेतृत्व केले. दबावाखाली आणि आंदोलन करणाऱ्या डॉक्टरांशी झालेल्या बैठकीनंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना त्यांच्या मागण्या मान्य करण्यास भाग पाडले गेले. त्यानुसार कोलकाता पोलिस आणि राज्य आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची बदली करण्याच्या मागण्यांचा समावेश होता. आरजी कारच्या घटनेच्या १० महिन्यांतच लॉ कॉलेज बलात्कार प्रकरणाने तृणमूल काँग्रेसला आणखी एक धक्का दिला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी मिश्रा हा महाविद्यालयात कंत्राटी कर्मचारी होता. तो दक्षिण कोलकाता इथल्या तृणमूल छात्र परिषदेचा माजी सरचिटणीस आहे. त्याच्याविरुद्ध यापूर्वीही पाच गुन्हे दाखल आहेत. यामध्ये खुनाचा प्रयत्न, लैंगिक अत्याचार आणि खंडणी अशा गुन्ह्यांचा समावेश आहे. यावरून त्याच्याविरुद्ध याआधीच पोलिस कारवाई का करण्यात आली नाही असा प्रश्न विरोधी पक्षांकडून उपस्थित केला जात आहे. असं असताना कॉलेज बलात्कार प्रकरण उघडकीस आल्यानंतर काही तासांतच विरोधी पक्षांकडून सत्ताधारी तृणमूलवर आगपाखड होऊ लागली. त्यानंतर पक्षाने लगोलग मुख्य आरोपीच्या संबंधांबाबत हात काढून घेतले.

तृणमूल छात्र परिषदेचे प्रदेशाध्यक्ष तृणांकूर भट्टाचार्य यांनी सांगितले की, “मिश्रा हा याआधी तृणमूल छात्र परिषदेत होता हे नाकारत नाही. गेल्या काही वर्षांपासून तृणमूल छात्र परिषदेचे संबंधित कॉलेजमध्येही कोणतेही युनिट नाही. तो संघटनात्मक सचिवांपैकी एक होता. सर्व जिल्ह्यांमध्ये या पदावर ८० ते १०० लोक आहेत. २०२२ मध्ये एक नवीन समिती स्थापन करण्यात आली आणि त्याला समितीमध्ये समाविष्ट करण्यात आलेले नाही.”

तृणमूल काँग्रेसचे नेते कुणाल घोष यांनी सांगितले की, “आम्ही या घटनेबाबत आमचा बचाव करत नाही. मात्र, भाजपा आणि माकपला या मुद्द्यावर बोलण्याचा अधिकार नाही. त्यांचे हात अशाच गुन्ह्यांनी माखलेले आहेत.”

असं असताना तृणमूल काँग्रेसच्या नेतृत्वाला असे वाटत नाही की कॉलेज बलात्कार प्रकरणात आरजी कार प्रकरणाइतकाच विरोध होईल. “आरजी कार बलात्कार आणि हत्येच्या प्रकरणात पोलिसांनी योग्यरित्या काम केले नाही आणि प्रशासनाच्या अनेक चुका होत्या. मात्र, या प्रकरणात पोलिसांनी जलदगतीने कारवाई केली आणि सर्व आरोपींना अटक केली. त्यामुळे हे आरजी कार प्रकरणासारखे नाही. या प्रकरणात मुख्य आरोपीने आमच्या पक्षाची प्रतिमा मलीन केली. आम्हाला या अडचणीवर मात करावी लागेल”, असे तृणमूल काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने म्हटले आहे. मात्र, या पार्श्वभूमीवर पक्षाचे ज्येष्ठ आमदार मदन मित्रा आणि त्यांचे लोकसभा खासदार कल्याण बॅनर्जी यांनी केलेल्या वादग्रस्त विधानांमुळे तृणमूल काँग्रेसवर मोठ्या प्रमाणात टीका झाली आहे.

कॉलेज बलात्कार प्रकरणावर प्रतिक्रिया देताना कल्याण बॅनर्जी यांनी म्हटले की, “जर एखाद्या मित्राने मैत्रिणीवर बलात्कार केला तर तुम्ही सुरक्षा कशी सुनिश्चित करू शकता? शाळांमध्ये पोलिस असतील का? या घटनेने मुलांना एक संदेश दिला आहे की जर कोणी कॉलेज बंद असताना तुम्हाला फोन केला तर जाऊ नका, त्यातून अडचणी निर्माण होतील. जर ती मुलगी तिथे गेली नसती तर ही घटना घडली नसती.” पक्षातल्या नेत्यांच्या वक्तव्यानंतर तृणमूल काँग्रेसने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तसंच त्यांच्या वक्तव्यांपासून पक्षाने स्वत:ला दूर ठेवले आहे. नेत्यांनी केलेले वक्तव्य हे त्यांचे वैयक्तिक मत होते असे पक्षाने सांगितले आहे.

ठळक मुद्दे:

  • कोलकाता लॉ कॉलेज बलात्कार प्रकरणात मोनोजीत मंगो मिश्रा प्रमुख आरोपी
  • २५ जूनच्या संध्याकाळी ही घटना घचली, पीडित मुलीने त्यानंतर तक्रार दाखल केली
  • पोलिसांनी लगेचच मोनोजीत, प्रमित मुखोपाध्याय आणि जैब अहमद यांना अटक केली

टीएमसी खासदार महुआ मोईत्रा यांनी दोन्ही नेत्यांवर टीका करत कल्याण यांनी त्यांच्यावर दुर्व्यवहार केल्याचा आरोप केला. मोईत्रा या महिलांविरोधी आहेत आणि त्यांनी ४० वर्षांचे कुटुंब तोडून ६५ वर्षांच्या वृद्धाशी लग्न केले असे त्यांनी म्हटले. टीएमसीच्या अंतर्गत सूत्रांनी सांगितले की, पक्षाच्या प्रमुख ममता बॅनर्जी वरिष्ठ नेत्यांच्या अशा विधानांमुळे नाराज आहेत. “मदन आणि इतर नेत्यांना असे बेशिस्त भाष्य करून संकट आणखी वाढवू नये असा इशारा दिला जात आहे, असे एका वरिष्ठ नेत्याने सांगितले. मात्र, आरजी कार वादावरून तृणमूल काँग्रेसवर हल्ला केल्यानंतर विरोधी पक्षांनीही ममतांवर टीका करण्यासाठी या नवीन प्रकरणाचा वापर केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लॉ कॉलेज बलात्कार प्रकरणावर भाजपाने चार सदस्यीय तथ्य शोध पथक स्थापन केले आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या निर्देशांनुसार स्थापन करण्यात आलेले हे पथक सोमवारी कोलकात्यात पोहोचले. त्यात राज्यसभा खासदार आणि त्रिपुराचे माजी मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब, माजी केंद्रीय मंत्री सत्यपाल सिंह, माजी केंद्रीय मंत्री मीनाक्षी लेखी आणि राज्यसभा खासदार मनन कुमार मिश्रा यांचा समावेश आहे. “मुख्यमंत्री ममता बॅनर्जी इतर ठिकाणी शिष्टमंडळं पाठवतात, मात्र जेव्हा विरोधी पक्ष बंगालमध्ये येतो तेव्हा त्यांना अडवलं जातं. इथे महिला सुरक्षित नाहीत, अगदी कायद्याच्या विद्यार्थिनीही नाहीत”, असा आरोप देब यांनी केला आहे.