Trinamool in Hooghly Loksabha लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे. तृणमूल काँग्रेसने (टीएमसी) स्वबळावर निवडणूक लढविण्याची घोषणा केली होती. त्यानंतर त्यांनी पश्चिम बंगालमधील सर्व ४२ लोकसभा मतदारसंघांसाठी उमेदवारांच्या नावांची घोषणा केली होती. त्यात अभिनेत्री रचना बॅनर्जी यांच्या नावाचाही समावेश होता. तृणमूल काँग्रेसने रचना बॅनर्जी यांना हुगळी मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. या जागेवर सध्या भाजपा प्रतिनिधित्व करीत आहे. तृणमूलसाठी ही जागा पुन्हा मिळविणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी अभिनेत्री रचना बॅनर्जी मैदानात उतरल्या आहेत.

रचना बॅनर्जी यांचे लाखो चाहते

गुरुवारी (२८ मार्च) सकाळी त्यांनी हुगळी मतदारसंघात प्रचार रॅली घेतली. रचना बॅनर्जी हा बंगाली चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध चेहरा आहे. पश्चिम बंगालमध्ये लाखोंच्या संख्येने त्यांचे चाहते आहेत. प्रचार रॅलीदरम्यान अनेक चाहत्यांनी त्यांच्याकडे सेल्फीची मागणी केली अन् फुलांचा वर्षाव केला. त्यांची लोकप्रियता पाहता, हुगळी मतदारसंघात अटीतटीची लढत होण्याची शक्यता आहे.

Mrunmayee deshpande
अभिनेत्री मृण्मयी देशपांडेचा महिन्याचा खर्च माहितीये का? म्हणाली, “गेल्या पाच वर्षात…”
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
zee marathi new serial promo tula japanar ahe
६ किलो वजन बांधून, १४ फूट पाण्यात उडी मारली अन्…; ‘झी मराठी’च्या नव्या मालिकेचा थरारक प्रोमो पाहिलात का? अभिनेत्री म्हणाली…
anjali damania dhananjay munde
Anjali Damania: उद्या मी पुरावे मांडल्यानंतर फडणवीस, अजित पवार मुंडेंची पाठराखण करूच शकणार नाहीत – अंजली दमानिया
सोनिया गांधींच्या राष्ट्रपतींवरील टीप्पणीवरून वादंग
laxmi narayan tripathi on mamta kulkarni
ममता कुलकर्णीला महामंडलेश्वर केलं अन् तिच्यासह झाली हकालपट्टी; त्रिपाठी म्हणाल्या, “तिने इस्लाम…”
paaru fame sharayu sonawane get ukhana for husband Jayant lade
“संसार असतो दोघांचा…”, ‘पारू’ फेम अभिनेत्री शरयू सोनावणेने घेतला हटके उखाणा, म्हणाली…
sonalee kulkarni
“ती माझ्या पाया…”, ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ फेम अभिनेत्री गिरीजा प्रभू सोनाली कुलकर्णीबाबत म्हणाली…
रचना बॅनर्जी हा बंगाली चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध चेहरा आहे. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

बंगाली वाहिनीवरील ‘दीदी नंबर 1’ या रिॲलिटी टीव्ही शोच्या त्या सूत्रसंचालक आहेत. हा कार्यक्रम पश्चिम बंगालमध्ये प्रसिद्ध आहे. १९९० च्या दशकातील त्या गाजलेल्या अभिनेत्रींपैकी एक होत्या. ‘दीदी नंबर 1’ या कार्यक्रमामुळे त्यांच्या लोकप्रियतेत वाढ झाली आहे. राजकारणात प्रवेश करणार्‍या सेलिब्रिटींच्या यादीत त्यांचा समावेश झाला आहे.

‘मिस कोलकाता’ राहिलेल्या रचना यांना टीएमसीने हुगळी मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीत उतरवले आहे. गुरुवारी पार पडलेली ही रॅली पांडुआ ब्लॉकअंतर्गत येणार्‍या सिखिरा चंपटा ग्रामपंचायतीमधील पाखरी सिद्धेश्वरी माता मंदिरापासून सुरू झाली. इल्सोबा दासपूर ग्रामपंचायत हा या रॅलीचा शेवटचा टप्पा होता.

रचना बॅनर्जी यांची प्रतिक्रिया

“मी जबाबदारी स्वीकारली आहे. मी माझे १०० टक्के देईन. कालपर्यंत मी माझ्या टीव्ही शोचे शूटिंग करीत होते; पण आज मी इथे आहे आणि प्रचार करीत आहे. हे कठीण असले तरी अशक्य नाही,” असे रचना यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले. त्या म्हणाल्या, “मला मिळत असलेला प्रतिसाद बघून मी खूप आनंदी आहे. प्रत्येक जण माझे खुल्या हृदयाने स्वागत करीत आहे.”

सिखिरा चंपटा ग्रामपंचायतीच्या सुजाता मुर्मू म्हणाल्या, “मी त्यांना माझ्या गावात पाहतेय यावर माझा विश्वासच बसत नव्हता. मी त्यांना केवळ टीव्हीवर पाहिलं आहे. कालही मी त्यांना टीव्हीवर पाहिलं. आज त्या इथे आल्या आहेत. त्यामुळे मी खूप उत्साहित आहे.” स्थानिक रहिवासी माधवी पंडित म्हणाल्या, “’दीदी नंबर 1′ हा माझा आवडता कार्यक्रम आहे. रचना बॅनर्जी नेहमीच महिलांसाठी उभ्या राहिल्या आहेत. त्या त्यांच्या कार्यक्रमातून महिलांना प्रेरित करतात. त्यांनी जिंकावं अशी माझी इच्छा आहे.”

सेलिब्रिटीला तिकीट देण्यामागे गणित काय?

२०१९ च्या निवडणुकीत बसीरहाट आणि जादवपूरमध्ये वापरलेला फॉर्म्युलाच यंदा हुगळी मतदारसंघात वापरण्यात आला आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत अभिनेत्री नुसरत जहाँ आणि मिमी चक्रवर्ती यांना पक्षाने बसीरहाट आणि जादवपूरमधून उमेदवारी दिली होती. दोन्ही अभिनेत्रींनी अनेक लाखांच्या फरकाने या जागा जिंकल्या होत्या. टीएमसीने यापूर्वी लोकसभेत पाठविलेल्या इतर चित्रपट कलाकारांमध्ये देव, शताब्दी रॉय, मुनमुन सेन व दीपक अधिकारी यांच्या नावांचा समावेश आहे. हुगळी मतदारसंघ हा टीएमसीसाठी राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा आहे. कारण- यात सिंगूर विधानसभा क्षेत्राचा समावेश आहे. डाव्या आघाडीच्या कार्यकाळात याच क्षेत्रातून टीएमसी अध्यक्ष ममता बॅनर्जी यांचे राजकीय नशीब पालटणारी भूसंपादनविरोधी चळवळ सुरू झाली होती.

हुगळीच्या विद्यमान खासदार लॉकेट चॅटर्जी

हुगळीची जागा सध्या भाजपाच्या ताब्यात आहे. दिग्गज अभिनेत्री लॉकेट चॅटर्जी या जागेचे नेतृत्व करीत आहेत. रचना यांनी अनेक टॉलीवूड चित्रपटांमध्ये लॉकेट चॅटर्जी यांच्याबरोबर काम केले होते. मेयर अंचोल, परिबार, अग्नी, त्याग इत्यादी चित्रपटांमध्ये त्यांनी एकत्र काम केले आहे. “मी रचनाला बर्‍याच काळापासून ओळखते. आम्ही चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. पण, ही लढत रचना आणि लॉकेट यांच्यात नसून, ममता आणि मोदी यांच्यात आहे; जिथे मोदी जिंकतील,” असे लॉकेट चॅटर्जी म्हणाल्या.

त्या पुढे म्हणाल्या, “नुसरत आणि मिमीचे काय झाले ते आपण सर्वांनी पाहिले आहे. त्यांची कारकीर्द संपली. मी १० वर्षांपासून राजकारणात आहे. रचना यांनी आधी मैदानात उतरून काम करायला हवे होते. त्यांनी संदेशखालीला भेट द्यायला हवी होती. मला असे दिसते की, त्या सुटीचा आनंद घेण्यासाठी आल्या आहेत आणि दोन महिन्यांनंतर पुन्हा ‘दीदी नंबर 1’च्या सेटवर परत जातील.

भाजपाने २०१९ च्या निवडणुकीत राज्यातील ४२ पैकी १८ जागा जिंकल्या होत्या; तर टीएमसीने २२ जागा जिंकल्या होत्या. लॉकेट यांनी हुगळीची जागा जिंकत टीएमसीच्या रत्ना डे यांचा ७३ हजारांपेक्षा अधिक मतांनी पराभव केला होता. परंतु, २०२१ च्या विधानसभा निवडणुकीत हुगळीमधील चुचुरा विधानसभा मतदारसंघातून लॉकेट यांनी निवडूक लढवली होती. मात्र त्या निवडणुकीत टीएमसीच्या असित मजुमदार यांनी लॉकेट यांचा १८ हजार मतांनी पराभव केला होता.

हेही वाचा: मुख्यमंत्र्यांच्या मुलीवर ईडीची कारवाई; केरळमध्ये काय घडतंय?

टीएमसीने हुगळीची जागा शेवटची २००९ मध्ये जिंकली होती. त्यानंतर या जागेवर कम्युनिस्ट पक्षाने प्रतिनिधित्व केले. हुगळीच्या अनेक मतदारांचे सांगणे आहे की, आगामी निवडणुकीत भाजपा खासदार लॉकेट आणि रचना बॅनर्जी यांच्यात चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे. “दोन्ही लोकप्रिय चेहरे आहेत. लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदींचा मतदारांवरील प्रभाव फायद्याचा ठरू शकतो; तर टीएमसी रचना बॅनर्जी यांच्या लोकप्रियतेवर अवलंबून असेल,” असे भद्रेश्वर भागातील स्थानिक रहिवासी मुन्ना चौधरी म्हणाले.

Story img Loader