काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. त्यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या मानहानीच्या खटल्यात सुरत कोर्टाने त्यांना दोन वर्षांची शिक्षा ठोठावल्यानंतर लोकसभा सचिवालयाने हा निर्णय घेतला आहे. २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीतील प्रचारादरम्यान ॉमोदी आडनावावर केलेल्या भाष्यानंतर त्यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल करण्यात आला होता. दरम्यान, या निर्णयानंतर काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. हेही वाचा >>> EVM Machines : शरद पवारांच्या निवासस्थानी विरोधकांची बैठक; ईव्हीएम मशीनविरोधात पुन्हा एकदा आवाज उठवणार राहुल गांधी नेहरू आडनाव का लावत नाहीत असा प्रश्न विचारला, मात्र. प्रियांका गांधी यांनी ट्वीट करत भाजपा तसेच नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. "पंतप्रधान नरेंद्र मोदी तुमच्या लोकांनी एका शहीद पंतप्रधानांच्या मुलाला देशद्रोही, मीर जाफर म्हटलेलं आहे. राहुल गांधी यांचे वडील कोण आहेत? असा प्रश्न तुमच्या एका मुख्यमंत्र्यांनी केला आहे. काश्मिरी पंडितांमध्ये एक परंपरा आहे. वडिलांच्या मृत्यूनंतर मुलगा कुटुंबाची परंपरा कायम राखतो. तुम्ही माझे पूर्ण कुटुंब तसेच काश्मिरी पंडितांचा अपमान केला असून राहुल गांधी नेहरू हे आडनाव का लावत नाहीत, असा प्रश्न विचारला आहे. मात्र तरीदेखील तुम्हाला एखाद्या न्यायाधीशाने दोन वर्षांची शिक्षा ठोठावली नाही. तसेच तुमचे लोकसभेतील सदस्यत्वही कोणी रद्द केले नाही," असे प्रियांका गांधी म्हणाल्या. हेही वाचा >>> राहुल गांधींच्या शिक्षेमागे भाजपच्या ओबीसी राजकारणाचे गणित गौतम अदाणी प्रकरणावर प्रश्न विचारताच तुम्हाला राग आला "राहुल गांधी यांनी खऱ्या देशभक्ताप्रमाणे अदाणी प्रकरणावर प्रश्न उपस्थित केले. राहुल गांधी यांनी नीरव मोदी, मेहुल चोक्सीवर प्रश्न उपस्थित केले. गौतम अदाणी प्रकरणावर प्रश्न विचारताच तुम्हाला राग आला. तुमचा मित्र गौतम अदाणी देशातील जनता आणि संसदेपेक्षा मोठा झाला आहे का?" असा सवालही प्रियंका गांधी यांनी केला. हेही वाचा >>> राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे NGO समोर मोठे आव्हान; ‘राष्ट्रीय सेवा भारती’कडून सामाजिक क्षेत्रात योगदान दिले जाणार तुम्ही काहीही करा मात्र तुमच्यासारख्या. "तुम्ही ज्या कुटुंबाला नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहात, त्या कुटुंबाने आपल्या अनेक पिढ्या लोकांचा आवाज बनण्याचे काम केले. त्या कुटुंबाने सत्याचा लढा लढलेला आहे. आमच्या शरीरात असलेल्या रक्तामध्ये एक खास बाब आहे. तुम्ही काहीही करा मात्र तुमच्यासारख्या सत्तापिपासू, भित्र्या हुकूमशहापुढे हा परिवार कधीही झुकलेला नाही," असा हल्लाबोल प्रियंका गांधी यांनी केला.