आगामी लोकसभा निवडणूक लक्षात घेता खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसची कन्याकुमारी ते काश्मीर अशी ‘भारत जोडो यात्रा’ सुरू आहे. या यात्रेदरम्यान राहुल गांधी देशातील स्थानिक लोकांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान केरळ राज्यातील पलक्कड येथे असताना राहुल गांधी यांनी येथील अदिवासी समाजातील लोकांची भेट घेतली. तसेच त्यांनी या समाजातील विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेतल्या. यावेळी आदिवासी समाजाकडून देशातील संसाधनांचे सर्वोत्तम संवर्धन केले जाते, असे राहुल गांधी म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> PFI विरोधातील कारवाईवर इम्तियाज जलील यांचे महत्त्वाचे विधान, म्हणाले “पुरावे नसतील तर…”

पलक्कडमध्ये असताना राहुल गांधी यांची आदिवासी समुदायातील प्रतिनिधींनी भेट घेतली. या भेटीमध्ये आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी शिकवणी वर्गांची गरज असल्याचे या प्रतिनिधींनी राहुल यांना सांगितले. तसेच या प्रतिनिधी मंडळातील एका डॉक्टर सदस्याने पारंपरिक आदिवासी उपचार पद्धतीचा ‘आयुष’मध्ये समावेश करायला हवा, अशी इच्छा व्यक्त केली. शाळा आणि महाविद्यालयांमधील आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांची गळती रोखण्यासाठी विशेष कार्यक्रम राबवायला हवा, असेदखील या प्रतिनिधी मंडळाने राहुल गांधी यांना सांगितले. उत्तरादाखल आदिवासी समाज हा देशातील नैसर्गिक साधनसंपत्तीचे सर्वोत्तम रक्षण करतो, असे म्हणत राहुल गांधी यांनी आदिवासी समाजाची स्तुती केली.

हेही वाचा >>> संजय राऊतांचा दसरा कारागृहातच; ‘या’ तारखेपर्यंत सुनावणी पुढे ढकलली

याआधी काल (२६ सप्टेंबर) पलक्कडमधील कोप्पमध्ये असताना राहुल गांधी यांनी भाजपा तसेच आरएसएसला लक्ष्य केले. भाजपा आणि आएएसकडून देशाचे विभाजन केले जात असून ते समाजात एकमेकांविरोधात द्वेष पसवरण्याचे काम करतात. ते जीएसटी, शेतकरी कायदे तसेच नोटबंदीच्या माध्यमातून सामन्य जनतेवर हल्ला करतात. जनता भाववाढीने त्रस्त आहे. मात्र याचा त्यांना काहीही त्रास होत नाही. आम्ही हा अन्याय होऊ देणार नाही, असे राहुल गांधी म्हणाले. ही यात्रा मंगळवारी मलप्पुरममध्ये दाखल झाली.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rahul gandhi meets tribal community in kerala during bharat jodo yatra prd
First published on: 27-09-2022 at 16:33 IST