राहुल गांधी केरळमधील वायनाडमधून लोकसभेची निवडणूक लढवणार आहेत. ते देशपातळीवरील प्रचारसभांमध्ये व्यग्र आहेत. दुसरीकडे त्यांच्या मतदारसंघामध्ये मात्र एकाच समस्येवरून राजकारण पेटले आहे. ती समस्या म्हणजे वन्य प्राण्यांनी मांडलेला उच्छाद! वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामध्ये वायनाडमधील अनेकांचा मृत्यू झाला आहे, त्यामुळे या निवडणुकीत हा एक महत्त्वाचा मुद्दा ठरला आहे.

वायनाडमधील शेतकरी हैराण

वायनाड हा डोंगराळ जिल्हा आहे. त्यामुळे इथला निसर्ग फारच सुंदर आहे. तसेच वन्यजीवांची विविधताही इथे मोठ्या प्रमाणावर आहे. या जिल्ह्याने केरळमधील जवळपास ३६.४८ टक्के वन्य जमीन व्यापली आहे. मात्र, इथे हत्ती आणि इतर वन्य प्राण्यांनी मांडलेला उच्छाद ही एक मोठी समस्या होऊन बसली आहे. या मुद्द्यावरूनच या मतदारसंघातील राजकारण तापले आहे.

Ajit pawar, NCP, assembly election 2024, survey, 288 constituencies
२८८ मतदारसंघांचे सर्वेक्षण केल्यानंतरच जागांवर दावा, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विधान
Hathras stampede Bhole Baba has divided major parties in Uttar pradesh
हाथरस चेंगराचेंगरी प्रकरणी ‘भोले बाबा’वर आरोप का नाही? काँग्रेस-बसपा आक्रमक; भाजपा-सपाचा सावध पवित्रा
Shiv Sena s chandrakant Raghuvanshi, chandrakant Raghuvanshi, chandrakant raghuvanshi wanted Candidacy for Dhule City, Maharashtra assembly election 2024, Dhule,
चंद्रकांत रघुवंशी यांची धुळ्यातून लढण्याची तयारी, स्थानिक इच्छुकांमध्ये चलबिचल
Poor quality of 15 road works in Pimpri Chief Minister Eknath Shinde confession
पिंपरीतील १५ रस्त्यांच्या कामांचा दर्जा निकृष्ट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कबुली
france, President Emmanuel Macron, National Assembly, lower house of parliament
विश्लेषण : फ्रान्समध्ये डाव्यांची मुसंडी, उजव्यांची घसरगुंडी… मतदारांचा अनपेक्षित कौल अस्थैर्य वाढवणारा?
iran election iran to hold runoff election between reformist masoud pezeshkian and hard liner saeed jalili
इराणमध्ये अध्यक्षपदासाठी फेरमतदान; सुधारणावादी मसूद पेझेश्कियाँ आघाडीवर, पण बहुमताची हुलकावणी
kp patil
आमदार आबीटकरांमुळेच ‘बिद्री’ची चौकशी; के. पी. पाटील यांचा थेट आरोप
grief of the families of Naxalites Extortion for education and family of Naxalites is suffering
गडचिरोली : नक्षलवाद्यांच्या कुटुंबीयांची व्यथा! एकीकडे शिक्षणासाठी खंडणी तर दुसरीकडे…

वायनाड मतदारसंघातील वडक्कनाडचे रहिवासी गोपालन यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, “संध्याकाळी ७ वाजल्यानंतर इथे घराबाहेर पडणे फारच धोक्याचे झाले आहे. रात्री आणीबाणीची परिस्थिती असल्याशिवाय लोक घराबाहेर पडत नाहीत. गावाबाहेर काम करणारे लोक सायंकाळ व्हायच्या आतच घरी येण्याचा प्रयत्न करतात. हत्तींच्या भीतीमुळे लहान मुलेही संध्याकाळी शिकवणीला जाऊ शकत नाहीत. इथे हत्तींचा हल्ला होण्याची भीती फार मोठी आहे.”

हेही वाचा : हेमा मालिनी, अरुण गोविल राजपूत समाजाच्या रोषाला कसं सामोरं जाणार?

विशेषत: गावातील शेतकऱ्यांना हत्तींनी मांडलेल्या उच्छादाचा प्रचंड त्रास झालेला आहे. याबाबत बोलताना स्थानिक शेतकरी टी. संतोष म्हणाले की, “आमच्या भागात चांगली शेती केली जाते. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून मी एकही पीक चांगल्या प्रकारे घेऊ शकलेलो नाही. गेल्या आठवड्यातही फणस खाण्यासाठी माझ्या घराजवळ एक जंगली हत्ती आला होता. फणस खाऊन झाल्यावर त्याने उभ्या पिकांचीही नासधूस केली. हत्तींबरोबरच हरणांचे कळप आणि जंगली डुक्करंदेखील उच्छाद मांडतात. या प्राण्यांसाठी जंगलात खाण्यासाठी चारा नसल्याने ते शेजारच्या गावांमध्ये येत आहेत. वाघांच्या भीतीमुळे आम्ही गायदेखील पाळू शकत नाही.”

नाराज असलेले उन्नी हे देखील शेतकरी आहेत. ते म्हणाले की, “वायनाडमध्ये वन्य प्राण्यांचा उच्छाद कमी करण्यासाठी राहुल गांधींनी काय केले, असा प्रश्न प्रत्येक जण विचारतो आहे. त्यांनी संसदेत तरी हा प्रश्न कधी उपस्थित केला का? लोक इतर अनेक कारणांसाठी त्यांना यावेळीही मते देतील. मात्र, या समस्येचे काय? यावर ते कधी उपाय काढणार आहेत?”

यावेळी राहुल गांधी यांच्या विरोधात वायनाडमध्ये माकपच्या ॲन्नी राजा लढत देणार आहेत. राजा यांच्या समवेतच राहुल गांधी यांची लढत केरळमधील भाजपाचे विभागप्रमुख के. सुरेंद्रन यांच्याशीही असणार आहे. गेल्या पाच वर्षांपासून राहुल गांधी मतदारसंघात फिरकत नसल्याचा आरोप दोन्ही विरोधकांनी केला आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर बोचरी टीका करताना केरळ भाजपाचे प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, “राहुल गांधी यांच्यापेक्षा तर इथे जंगली हत्तींनी अधिकवेळा भेट दिली आहे.”

वन्य प्राण्यांच्या हल्ल्यावरुन राजकारण

वायनाडमध्ये हत्तींनी धुमाकूळ घातल्याने नागरिक त्रस्त आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये वन्य प्राणी आणि माणसांमधला हा संघर्ष दिवसेंदिवस वाढला आहे. केरळमधील इतरही अनेक मतदारसंघांमध्ये हाच मुद्दा मुख्य आहे. गेल्या काही वर्षांमध्ये हत्तींच्या उच्छादामुळे इथे अनेक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. ही समस्या वाढतच चालली असून एलडीएफ, काँग्रेस आणि भाजपाने आजवर एकमेकांवर आरोप करण्यातच धन्यता मानली आहे.

गेल्या आठवड्यात वायनाडमध्ये दोन दिवस प्रचारासाठी आलेल्या राहुल गांधींनी म्हटले की, “वन्य प्राणी आणि माणसांमधील संघर्ष ही वायनाडची प्रमुख समस्या आहे. ही समस्या सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. राज्य आणि केंद्र सरकारकडे मी अनेकदा ही समस्या मांडली आहे. ही समस्या सोडवण्यासाठी मी माझ्या पातळीवर आणखी दबाव निर्माण करेन. दिल्लीत आणि केरळमध्येही आम्ही सत्तेत येणार आहोत. हा विषय लवकरच मार्गी लागेल.”

माकपच्या वायनाड जिल्हा सचिव पी. गार्गी यांनी राहुल गांधींवर टीका करताना म्हटले आहे की, “आजवर राहुल या विषयावर गप्प राहिले आहेत. केरळमधील लोक हत्ती आणि वाघांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडत असतानाही त्यांनी वन्यजीव संरक्षण कायद्यात सुधारणा करण्यासाठी काहीही प्रयत्न केलेले नाहीत. प्राण्यांचा उच्छाद रोखण्यासाठी त्यांनी एकतरी प्रकल्प इथे राबवला आहे का?”

या विषयाची वाढती दाहकता पाहता केरळ राज्य सरकारने वन्यजीव संरक्षण कायद्यामध्ये सुधारणा करण्याची विनंती करणारा ठराव नुकताच संमत केला आहे. कायद्यामधील या सुधारणांमधून मानवी जीविताला धोका निर्माण करणाऱ्या वन्य प्राण्यांची हत्या करण्याची मुभा देण्यात यावी, असे या ठरावामध्ये सांगण्यात आले आहे. आपल्या प्रचारसभांमध्ये याच मुद्द्यांवरून एलडीएफ भाजपाला घेरताना दिसत आहे. केंद्रातील भाजपा सरकार वन्यजीव संरक्षण कायद्यामध्ये सुधारणा का करत नाही, असा प्रश्न त्यांच्याकडून उपस्थित केला जातो आहे. दुसरीकडे, भाजपा या मुद्द्यावरून काँग्रेसवरच टीका करते आहे. वायनाडचे लोक वन्य प्राण्यांच्या उच्छादावर कायमस्वरूपी उपाय मागत असताना काँग्रेसचा जाहीरनामा या विरोधात असल्याची टीका ते करत आहेत.

केरळ प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष आणि वायनाडचे आमदार टी. सिद्दीकी यांनी म्हटले आहे की, “वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांबाबत भाजपा फारच निर्दयीपणे वागली आहे. या मुद्द्यावरून वायनाडमध्ये रोष असतानाही ॲन्नी राजा आणि के. सुंदरन यांनी कधीही हस्तक्षेप केलेला नाही. पीडितांच्या कुटुंबीयांना राहुल गांधींनी भेट देऊन आवश्यक ते सहकार्य केले आहे. मात्र, मुख्यमंत्री पीनाराई विजयन एकदाही पीडितांच्या भेटीला गेलेले नाहीत.”

हेही वाचा : राजपूत, जाट समुदाय भाजपावर नाराज आहेत का? राजस्थान भाजपा प्रमुख सांगतात…

गेल्या दहा वर्षांमध्ये वायनाड जिल्ह्यात हत्तींच्या हल्ल्यात ४१, तर वाघांच्या हल्ल्यात सात जणांचा मृत्यू झाला आहे. वायनाडच्या भूप्रदेशामध्येदेखील खूपच विविधता आहे. इथल्या जमिनीची विविधता इतकी आहे की, काही ठिकाणी ती समुद्रसपाटीपासून ३५४ फूट आहे, तर काही ठिकाणी ७,३५० फूटदेखील आहे. कर्नाटकातील नागरहोल व्याघ्रप्रकल्प, बंदीपूर राष्ट्रीय उद्यान आणि बीआर व्याघ्रप्रकल्प तसेच तमिळनाडूमधील मदुमालती व्याघ्रप्रकल्प आणि सत्यमंगलम जंगल या जिल्ह्यातील जंगलाशी जोडून आहे.

संपूर्ण केरळचा विचार करता, प्रामुख्याने हत्ती, वाघ, गवा आणि रानडुक्करांच्या हल्ल्याच्या घटना वाढत चालल्या आहेत. वायनाड व्यतिरिक्त कन्नूर, पलक्कड आणि इडुक्की या जिल्ह्यांतही ही समस्या मोठी आहे. केरळ सरकारच्या आकडेवारीनुसार, राज्यात २०२२-२३ या कालावधीत ८,८७३ वन्य प्राण्यांचे हल्ले झाले. त्यापैकी ४,१९३ वन्य हत्तींचे; १,५२४ रानडुकरांचे, १९३ वाघांचे, २४४ बिबट्यांचे आणि ३२ गव्यांचे होते. या हल्ल्यांमुळे झालेल्या ९८ मृत्यूंपैकी २७ मृत्यू हत्तींच्या हल्ल्यामुळे झाले.