राजस्थानमध्ये २०२३ मध्ये विधानसभा निवडणुका आहेत. यापार्श्वभूमीवर भाजपाकडून ‘जनआक्रोश’ यात्रा काढण्यात आली आहे. गुरुवारपासून यात्रेला सुरुवात झाली आहे. या यात्रेद्वारे तळागाळातील मतदारांपर्यंत पोहोचण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. दरम्यान, या यात्रेच्या निमित्ताने भाजपाचे राज्यसभेचे खासदार आणि राजस्थान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष अरुण सिंग यांनी ‘द इंडियन एक्सप्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे.

हेही वाचा – काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपामध्ये आलेल्या जयवीर शेरगील यांना मिळाली राष्ट्रीय प्रवक्तेपदाची जबाबदारी!

Akola Lok Sabha, vote division in Akola,
अकोल्यात मतविभाजन कोणाला फायदेशीर ठरणार ?
Jayant Chowdhury told the workers the reason
भाजपाशी हातमिळवणी करण्याचं जयंत चौधरींनी कार्यकर्त्यांना सांगितलं कारण; म्हणाले, “भारतरत्न हा…”
rashmi barve
रश्मी बर्वे यांचे जात प्रमाणपत्र रद्द; निर्णयाविरोधात तातडीने सुनावणीस न्यायालयाचा नकार
Big problem for Congress in Ramtek candidates caste certificate invalid
रामटेकमध्ये काँग्रेसला मोठा धक्का, उमेदवाराचे जात प्रमाणपत्र अवैध

यावेळी बोलताना अरुण सिंग यांनी गहलोत-पायलट यांच्यातील वादावरून काँग्रेसला खोचक टोला लगावला आहे. ”काँग्रेसप्रमाणे आमचे नेते एकमेकांवर टीका करत नाहीत. आमच्या पक्षात कोणीही सहकाऱ्यांना ‘गद्दार’ म्हणत नाहीत. काँग्रेसमध्ये सध्या अंतर्गत कलह सुरू आहे. मात्र, भाजपात एकजुटता आहे”, असे ते म्हणाले.

हेही वाचा – काँग्रेसने थेट रावणाशी तुलना केल्यानंतर नरेंद्र मोदी पुन्हा आक्रमक; म्हणाले, “काँग्रेस नेते मला अपशब्द बोलतात, मात्र…”

‘जनआक्रोश’ यात्रेच्या माध्यमातून राजस्थानमधील दोन कोटी जनतेपर्यंत पोहचण्याचा आमचा प्रयत्न आहे. आज राजस्थानमध्ये शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. महिलांवरील अत्याचारांमध्येही वाढ होताना दिसून येत आहे. राज्यात कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. भ्रष्टाचारही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचून त्यांचा आवाज बनण्याचा आमचा प्रयत्न आहे. या उद्देशानेच ‘जनआक्रोश’ यात्रेचे आयोजन करण्यात आले, अशी प्रतिक्रिया अरुण सिंग यांनी दिली.

हेही वाचा – सुडाचं राजकारण करू नका म्हणत अखिलेश यादवांचा इशारा, म्हणाले “योगी आदित्यनाथ यांची फाईल माझ्याकडे आली होती पण…”

दरम्यान, ही यात्रा सुरू असताना वसुंधरा राजे या देवदर्शनसाठी गेल्या आहेत, त्यांच्या या यात्रेतील सहभागाबाबत विचारले असता, भाजपामध्ये कोणत्याही प्रकारची अंतर्गत फूट नाही. वसुंधरा राजे या जननेत्या आहेत. त्यामुळे त्या जिथे जातील लोकं त्यांच्या भोवती गोळा होतात. आम्ही गेलो तरी लोकं आमच्या भोवती गोळा होतात, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.