Rajasthan Loksabha Election 2024: राजस्थानमध्ये २०२३ मध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपाने सत्ता हातात घेतली. काँग्रेसच्या ताब्यात असलेले हे राज्य भाजपाकडे गेल्यामुळे उत्तर भारतात भाजपाची ताकद आणखी वाढली आहे. कारण- भाजपाच्या दृष्टीने उत्तर भारतातील राजकारण आपल्या हातात ठेवण्यासाठी राजस्थान हे राज्य महत्त्वाचे ठरते. या ठिकाणी लोकसभेचे २५ मतदारसंघ आहेत. २०१४ व २०१९ अशा दोन्ही वेळेस एनडीए आघाडीने राजस्थानातील लोकसभेच्या सर्वच्या सर्व जागा जिंकल्या आहेत. त्यातही आता विधानसभा ताब्यात आल्यामुळे एनडीए आघाडीची ताकद अधिक वाढली आहे. या पार्श्वभूमीवर राजस्थानमध्ये डाव्या पक्षाचे अस्तित्व जवळपास नसल्यातच जमा आहे. तरीही इंडिया आघाडीकडून सीकर मतदारसंघातून डाव्या पक्षाचे उमेदवार अमरा राम यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अमरा राम हे राजस्थानमधील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे एकमेव उमेदवार आहेत. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झाला होता. ‘दी इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य करीत भाजपाच्या राजकारणावर जोरदार टीका केली आहे.

सीकर मतदारसंघातील मोठ्या समस्या कोणत्या?

What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
devendra fadnavis uddhav thackeray
“अमित शाह तुला म्हणाले दोन मोठी…”, उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचा एकेरी उल्लेख करत सांगितलं शहांच्या मातोश्री भेटीवेळी काय घडलं?
Kiran Mane on Ujjwal Nikam
“दोन पक्षांवर दरोडे पडले तेव्हा हा भामटा…”, किरण मानेंची उज्ज्वल निकम यांच्यावर टीकात्मक पोस्ट
pm modi on prajwal revanna sex tape row
प्रज्वल रेवण्णा प्रकरणावर पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच केलं भाष्य; म्हणाले…
uddhav thackeray viral video
शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना बाहेर जायला सांगितलं, ठाकरेंनी हात जोडले अन्..; भाजपाने शेअर केला ‘तो’ VIDEO
pankaja munde manoj jarange (1)
“ही गोपीनाथ मुंडेंची औलाद कधी…”, मनोज जरांगेंवरील कथित टीकेवर पंकजा मुंडेंचा खुलासा
Rohit Pawar vs Ravi Rana over amravati rally
“फक्त ३०० मिळाले? नवनीत राणांच्या सभेसाठी महिलांना पैसे दिले?”, रवी राणा म्हणाले, “हो पैसे वाटले…”
Prajwal Revanna in Trouble
‘सेक्स व्हिडिओचा तो पेनड्राईव्ह मीच दिला’, रेवण्णाच्या ड्रायव्हरचा धक्कादायक दावा; म्हणाला, “त्यांनी माझ्या बायकोला…”

दिलेली कोणतीही आश्वासने पूर्ण करण्याऐवजी भारतीय जनता पार्टीने त्याविरोधातच सगळी कामे केली आहेत. काळा पैसा परत आणणे, प्रत्येक व्यक्तीच्या खात्यात १५ लाख जमा करणे, वर्षाला दोन कोटी रोजगार देणे, तसेच २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे, अशी सगळी आश्वासने भाजपाने दिली होती; जी आता हवेत विरून गेली आहेत. शेखावती भागातून सर्वाधिक संख्येने लोक लष्करामध्ये जातात. मात्र, आता ‘अग्निवीर’ योजना लागू करण्यात आली आहे; जी अत्यंत चुकीची आहे. सीकर लोकसभा मतदारसंघामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही खूप मोठा आहे. या मतदारसंघाचे विद्यमान खासदार सुमेधानंद यांनी कधीच या संदर्भात संसदेत आवाज उठविलेला नाही. पाण्याचा प्रश्न, अग्निवीर योजना, काळे शेतकरी कायदे, शेतकऱ्यांचे १३ महिने चाललेले आंदोलन, कुस्तीपटू मुलींचे झालेले शोषण अशा कोणत्याही मुद्द्यांवर त्यांनी आजवर एक चकार शब्दही काढलेला नाही. हे सगळे आमचे मुद्दे आहेत. तसेच आम्हाला पिकांसाठी किमान आधारभूत किंमत हवी आहे. आता भाजपाचा गैरकारभार संपून, लोकांचे राज्य आले पाहिजे.

हेही वाचा : तेजस्वींचा उदय, तर नितीश कुमारांचा अस्त; बिहारच्या राजकारणात ‘मोदी फॅक्टर’ चालेल का?

कोणते मुद्दे तुमच्या बाजूने काम करतील, असे तुम्हाला वाटते?

देशाची एकात्मता आणि संविधानावर विश्वास ठेवणारे सगळे धर्मनिरपेक्षतावादी पक्ष स्वतंत्रपणे लढत होते. मात्र, भाजपाचा गैरकारभार संपविण्यासाठी ते आता इंडिया आघाडी म्हणून एकत्र आलेले आहेत, ही एक मोठी गोष्ट आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मी माझ्या विद्यार्थिदशेपासून अनेक ऐतिहासिक आंदोलनांचा भाग राहिलेलो आहे. मग ते रावळा, घरसाणा (गंगानगर) आंदोलन असो किंवा वीज दरांसाठी झालेले आंदोलन असो. मी नेहमीच पुढे होतो. जर अंबानी, अदाणी व विजय माल्ल्या यांची कर्जे माफ केली जाऊ शकतात, तर मग शेतकऱ्यांची कर्जे का माफ केली जात नाहीत? शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये मी पाच दिवस तुरुंगात घालवले आहेत. मोदींच्या १० वर्षांच्या सत्ताकाळात शेतकऱ्यांनीच त्यांना काळे कायदे मागे घेण्यास आणि जनतेची माफी मागायला भाग पाडले. ज्यांना ज्यांना कोणत्याही संकटाचा सामना करावा लागला आहे, त्यांच्या पाठीशी हा अमरा राम नेहमी उभा राहिला आहे.

२०१४ व २०१९ मध्ये काँग्रेस आणि डाव्यांची एकत्रित मते २९ टक्के आणि ३८ टक्के, अशी होती; तर भाजपची ४६ टक्के आणि ५८ टक्के, अशी होती. याबद्दल काय सांगाल?

ही भाजपाची मते नव्हती, तर ती खोटे बोलून मिळविलेली मते होती. धार्मिक ध्रुवीकरणाचे राजकारण आणि खोटी आश्वासने दिल्याने त्यांना मते मिळाली. लोकांची दिशाभूल करण्यात आली. त्यामुळे डोळे झाकून काहीतरी चांगले घडेल, या आशेने लोक त्यांच्या मागे गेले. मात्र, आता लोकांचे डोळे उघडले आहेत. नरेंद्र मोदी कुणाचेच नसून, ते स्वार्थासाठी देशालाही विकू शकतात, विरोधी पक्षांची बँक खाती गोठवू शकतात आणि वेळ आली, तर ते निवडणुका आणि आरक्षणही बंद करू शकतात. त्यामुळेच यावेळी त्यांना तेवढीच मते टिकवून ठेवता येणार नाहीत. लोकांच्या भावनांशी खेळून आणि रोजगाराचे खोटे आश्वासन देऊन, तुम्ही लोकांना वारंवार मूर्ख बनवू शकत नाही. पहिल्या वेळेला खोट्या आश्वासनांमुळे मते मिळाली; तर दुसऱ्या वेळेला राष्ट्रवादाच्या नावावर मते मिळाली. मात्र, आता ती मिळणार नाहीत.

हेही वाचा : “भाजपानं गायीचं मांस विकणाऱ्यांकडूनही…”, संजय राऊतांचा गंभीर आरोप; म्हणाले, “मी कंपन्यांची नावं सांगेन!”

तुम्ही सुमेधानंद सरस्वती यांच्याविरोधात लढत आहात. धार्मिक राजकारणाचा फायदा भाजपाला झालेला दिसतो. राम मंदिराचा मुद्दा इथल्या निवडणुकीमध्ये किती प्रभाव पाडू शकेल?

धार्मिक असण्याविषयी कुणालाही हरकत नाही. मात्र, १९८४ मध्ये भाजपाच्या लोकसभेत फक्त दोन जागा होत्या. तिथून सत्ता मिळविण्यासाठी त्यांनी धार्मिक राजकारण केले आहे, हे उघड झाले आहे. राम मंदिर हाच तो मुद्दा आहे. एकीकडे शंकराचार्यांनीही अर्धवट बांधकाम झालेल्या मंदिरामध्ये मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यावर आक्षेप घेतला होता. तरीही त्यांनी ते केले. या उद्घाटन सोहळ्याला कोण आले होते? शंकराचार्य, शेतकरी वा कामगार आलेले नव्हते; तर चित्रपटसृष्टीतील मोठे कलाकार आणि अंबानी-अदाणींसारखे उद्योगपती आले होते. त्यामुळे लोकांची दिशाभूल करणारा हा एक राजकीय अजेंडा होता. फक्त देव-देव केल्याने पोट भरत नाही. प्रत्येक जण रामाला मानतो. माझे स्वत:चे नाव अमरा राम आहे. मात्र, भारतीय जनता पार्टीला रामाची वा गाईची काहीही चिंता नाही; तर त्यांना आपल्या खुर्चीची चिंता आहे. ते स्वत:च गोमांस विकणाऱ्या कंपन्यांकडून देणग्या घेतात. त्यांचे धर्मांधतेचे राजकारण आता चालणार नाही. कारण- ते धार्मिक नसून जातीयवादी आहेत. त्यांच्या या राजकारणामुळे ते धर्मालाच कलंकित करीत आहेत. ते हिंदू, मुस्लीम, शीख व ख्रिश्चन, असा भेदभाव करून लोकांच्या मनांमध्ये दुही पेरत आहेत. आमचा लढा याविरोधातच आहे.

हेही वाचा : हेमा मालिनींकडून शेतात खुरपणी तर रवी किशन चहाच्या टपरीवर; मतांसाठी कोण काय काय करतंय?

यावेळी चारशेपार जाणार असल्याची घोषणा भाजपाने केली आहे. त्याबद्दल काय सांगाल?

दक्षिण भारतात ते कुठेच नाहीत आणि आता उत्तर भारतातूनही त्यांची हकालपट्टी होणार आहे. ते ‘चारशेपार’ म्हणत आहेत. आम्ही ‘भाजपा सरकार से बाहर’, असे म्हणत आहोत.