राजस्थान भाजपाचे प्रमुख सी. पी. जोशी चित्तौडगड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असून, गेल्या दोन वेळा त्यांनी तो मतदारसंघ जिंकला होता, खरं तर मतदारसंघात राजपूत समाज आणि शेतकरी दोन्ही पक्षावर नाराज आहेत. भारतातील सुमारे ९० टक्के अफूची शेती राजस्थानमधील चित्तौडगड आणि प्रतापगढ जिल्हे आणि मध्य प्रदेशातील नीमच आणि मंदसौरमध्ये केली जाते. राजस्थानमधील दोन्ही अफू उत्पादक जिल्हे चित्तौडगड लोकसभा मतदारसंघांतर्गत आहेत, जिथे २६ एप्रिल रोजी मतदान होत आहे.

गेल्या वर्षी अफूला कमी भाव मिळाल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी तीन महिने आंदोलने केली होती. राजस्थानमधील सुमारे ३० टक्के अफूचे उत्पादन घेणारे शेतकरी हे राजपूत समाजाचे आहेत. २०२३ च्या विधानसभा निवडणुकीत राजपूत उमेदवाराला बाजूला केल्याचा तसेच गुजरातमधील भाजपाच्या उमेदवाराने राजपूतांबद्दल केलेल्या टिप्पण्यांमुळे मोठ्या प्रमाणात निदर्शने झाली होती. भारतीय अफीम विकास किसान समितीचे समन्वयक मांगीलाल मेघवाल म्हणतात की, शेतकऱ्यांचा संयम आता संपला आहे.

Prajwal Revanna in Trouble
‘सेक्स व्हिडिओचा तो पेनड्राईव्ह मीच दिला’, रेवण्णाच्या ड्रायव्हरचा धक्कादायक दावा; म्हणाला, “त्यांनी माझ्या बायकोला…”
Agricultural Market Committee Navi Mumbai,
पवारसमर्थक व्यापाऱ्यांची धरपकड… लोकसभेच्या लढाईच्या झळा बाजारसमितीला
What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
devendra fadnavis uddhav thackeray
“अमित शाह तुला म्हणाले दोन मोठी…”, उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचा एकेरी उल्लेख करत सांगितलं शहांच्या मातोश्री भेटीवेळी काय घडलं?
uddhav thackeray viral video
शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना बाहेर जायला सांगितलं, ठाकरेंनी हात जोडले अन्..; भाजपाने शेअर केला ‘तो’ VIDEO
Pankaja Munde Pritam Munde
आता प्रीतम मुंडेंना नाशिकमधून उमेदवारी मिळण्याची चर्चा; पंकजा मुंडेंच्या ‘त्या’ विधानामुळे तर्क-वितर्कांना उधाण!
Devendra Fadnavis
‘भाजपासाठी महाराष्ट्र अवघड?’ देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आव्हान आहेच…”
voting in gujarat (1)
भाजपाला गुजरातमधली लढाई का झाली अवघड?

काँग्रेसचे उमेदवार उदयलाल अनाजना यांनी अफूच्या शेतकऱ्यांच्या दुःखाचे व्हिडीओ पोस्ट करण्याचा मुद्दा आक्रमकपणे उचलून धरला असतानाच जोशी राजपूतांना शांत करण्याचा प्रयत्न करीत आहेत, त्यांच्या प्रचारासाठी समाजातील नेत्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. राजस्थानच्या उपमुख्यमंत्री दिया कुमारी, केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत आणि यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनासुद्धा प्रचारात उतरवले आहे. जोशीसुद्धा मोदी सरकारच्या योजनांचा प्रचार करीत असून, २०२३ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने चित्तौडगड मतदारसंघात येणाऱ्या आठ पैकी सहा जागा जिंकल्या होत्या. सी. पी. जोशी यांनी इंडियन एक्सप्रेसला एक मुलाखतही दिलीय. राज्यात पक्षाची स्थिती कशी आहे आणि त्याच्या मतदारसंघात काय प्रश्न आहे यासंदर्भात त्यांनी बेधडक उत्तरे दिली आहेत.

राजस्थान निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानात ६ टक्के घट झाली, असे का झाले तुम्हाला वाटते?

काँग्रेस आणि त्यांच्या नेत्यांवर लोकांचा विश्वास नाही. उदाहरणार्थ, राहुल गांधी यांनी कुटुंबाचा बालेकिल्ला असलेला अमेठी मतदारसंघ सोडला आणि आता वायनाडमधून (केरळमधील) निवडणूक लढवत आहेत. राजस्थानमध्येही काँग्रेसचे नेते निवडणूक लढवण्यास इच्छुक नसल्याचे सांगतात. कमी मतदानाचे कारण म्हणजे काँग्रेस समर्थक निराश होऊन मतदानासाठी बाहेर पडले नाहीत.

हेही वाचाः नगरमध्ये धनगर समाजाची मते आकर्षित करण्यावर भाजप, शरद पवार गटाचा भर

काँग्रेसचे अनेक नेते भाजपामध्ये दाखल झालेत, काहींना पक्षाने उमेदवारी दिली. यामुळे भाजपाचे जुने कार्यकर्ते नाराज झाले आहेत असे वाटते का?

काँग्रेसमध्ये नेतृत्व नसल्यामुळे लोक आमच्यात सामील होत आहेत. राहुल गांधींच्या जवळचे नेतेही आमच्या पक्षात आले आहेत, कारण त्यांना माहीत आहे की भाजपा त्यांना चांगल्या संधी देऊ शकते. प्रत्येक जण (पंतप्रधान नरेंद्र) मोदींच्या नेतृत्वाचे अनुसरण करीत असल्याने आमच्या नेत्यांमध्ये राग नाही.

भाजप दबाव आणण्यासाठी अंमलबजावणी संचालनालय (ईडी) सारख्या केंद्रीय एजन्सीचा वापर करत असल्याचा विरोधकांचा आरोप

गुजरातचे मुख्यमंत्री असताना मोदींना किती समस्यांना तोंड द्यावे लागले? (केंद्रीय गृहमंत्री) अमित शाह यांना तर तुरुंगात टाकण्यात आले. २०१४ पर्यंत काँग्रेसने कायद्याची भीती न बाळगता हुकूमशाही पद्धतीने राज्य केले. दुसरीकडे भाजपा केवळ भ्रष्ट राजकारण्यांवर कारवाई करीत आहे. हे पूर्णपणे कायद्यानुसार आहे. ते उघड होत असल्याने विरोधक घाबरले आहेत.

राजपूत, जाट समुदाय भाजपावर नाराज; यामुळे निवडणुकीत फटका बसेल असे तुम्हाला वाटते का?

भाजपासाठी गरीब, महिला, शेतकरी आणि तरुण अशा चारच जाती आहेत आणि त्या आमच्याबरोबर आहेत. आम्ही आमच्या धोरणांनी जमिनीवर केलेल्या कार्याची लोकांना जाणीव करून देतो आहे. मोदी किंवा भाजपावर असा राग नाही. बांसवाडा येथील एका सभेत पंतप्रधानांनी आरोप केला की, काँग्रेस सत्तेत आल्यास ‘घुसखोर आणि अधिक मुले असलेल्यांना संपत्ती वितरीत करेल. विरोधकांनी त्यांच्यावर जातीय ध्रुवीकरणाचा आरोप केला .

विशिष्ट समाजासाठी विशेष कायदे आणून फुटीरतावादी राजकारण करणारी काँग्रेस आहे. देशाच्या साधनसंपत्तीवर अल्पसंख्याकांचा पहिला हक्क आहे, असे ते कसे म्हणू शकतात? पंतप्रधानांनी बरोबर म्हटल्याप्रमाणे प्रत्येक नागरिकाचा त्यांच्यावर हक्क आहे. काँग्रेस विशिष्ट समाजाला विशेष अधिकार देऊ शकत नाही.

काँग्रेसने प्रादेशिक पक्षांबरोबर केलेल्या युतीमुळे बाडमेर, सीकर, बांसवाडा आणि नागौर यांसारख्या जागांवर आव्हानांना तोंड देण्याची तुमची योजना कशी आहे?

आमच्यासमोर कोणतेही आव्हान नाही. काँग्रेसने इतर पक्षांशी युती केली असली तरी आम्ही राजस्थानमधील सर्व २५ जागा जिंकू.

भाजप प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून तुम्ही दौरे करीत आहात आणि तुमच्या मतदारसंघावर लक्ष केंद्रित करू शकला नाहीत, असा दावा विरोधक करतात

माझ्या मतदारसंघातील जनतेची इच्छा होती की मी राजस्थानच्या इतर भागात जावे, जेणेकरून (मागील) भ्रष्ट काँग्रेस सरकारला राज्याच्या विधानसभा निवडणुकीत धडा शिकवता येईल. माझ्या मतदारसंघात रेल्वे, रस्ते, वीज आणि इतर पायाभूत सुविधा चांगल्या आहेत. विरोधी पक्ष याविरोधात कोणताही पुरावा देऊ शकत नाहीत. मी जमिनीशी जोडलेला कार्यकर्ता असल्याचंही त्यांनी अधोरेखित केले.