संभाजीराजे छत्रपती यांच्या उमेदवारीपासूनच महाराष्ट्रात राज्यसभा निवडणुकीच्या मुद्द्यावरून राजकीय कलगीतुरा सुरू झाला होता. शिवसेनेने त्यांना अपक्ष उमेदवार म्हणून पाठिंबा नाकारल्यानंतर त्यांनी निवडणुकीतूनच माघार घेतली. त्यापाठोपाठ सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये बिनविरोध निवडणुकीसाठीची चर्चा देखील निष्फळ ठरल्याचे स्पष्ट झाले आणि उमेदवारांच्या नावांवरून तर्क-वितर्कांना सुरुवात झाली. तब्बल २४ वर्षांनंतर महाराष्ट्रात राज्यसभेसाठी निवडणूक होत आहे. पण महाराष्ट्रासोबतच देशातील इतर तीन राज्यांमध्ये देखील अशाच प्रकारे निवडणूक होत असून त्यामुळे देशभरातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. आमदारांना हॉटेल्समध्ये ठेवणे, शक्तीप्रदर्शन करणे, सातत्याने संवाद साधणे अशा गोष्टी घडताना पाहायला मिळत आहेत.

१५ राज्य आणि ५७ जागांसाठी निवडणूक!

महाराष्ट्रातील सहा जागांच्या निवडणुकांवरून मोठे राजकारण सुरू असले, तरी देशभरात एकूण ५७ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. १५ राज्यांमधून या ५७ जागा निवडल्या जाणार आहेत. या राज्यांमध्ये महाराष्ट्रासोबतच आंध्र प्रदेश, छत्तीसगड, बिहार, झारखंड, मध्य प्रदेश, ओडिशा, तामिळनाडू, तेलंगणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि कर्नाटक या राज्यांचा समावेश आहे. यापैकी महाराष्ट्र, कर्नाटक, हरियाणा आणि राजस्थान या चार राज्यांमधील राजकीय समीकरणांमुळे इथून राज्यसभेवर जाणाऱ्या उमेदवारांसाठी निवडणूक होणार आहे. उर्वरीत ११ राज्यांमधील ११ उमेदवारांची निवड बिनविरोध झाली आहे.

dual voters telangana maharashtra border
Loksabha Election 2024: महाराष्ट्र-तेलंगणा: ‘या’ १४ गावांतील लोक दोन राज्यात बजावतील मतदानाचा हक्क, नेमके प्रकरण काय?
Akola Lok Sabha, vote division in Akola,
अकोल्यात मतविभाजन कोणाला फायदेशीर ठरणार ?
Sanjay Raut believes that Mavia will win 35 seats in the state
भाजप २०० वर जाणार नाही; राज्यात मविआ ३५ जागा जिंकणार’ संजय राऊत यांचा विश्वास
During the Lok Sabha elections under all the six major parties in the Maharashtra state
सर्वपक्षीय खदखद! प्रमुख सहा पक्षांमध्ये उमेदवारीवरून नाराजीनाट्य, अनेक मतदारसंघांत बंडखोरी

चार राज्यांमध्ये नेमकं घडतंय काय?

महाराष्ट्र, कर्नाटक, हरियाणा आणि राजस्थान या चार राज्यांमधील स्थानिक राजकीय समीकरणांमुळे इथे राज्यसभा निवडणुकीसंदर्भात घडामोडी वाढल्या आहेत.

१९९८च्या राज्यसभा निवडणुकीत शेवटच्या क्षणापर्यंत उत्कंठा ताणली गेली, दोन प्रधानांमध्येच झाली होती लढत!

महाराष्ट्रात काय घडतंय?

आत्तापर्यंत महाराष्ट्रातील राज्यसभेच्या राजकीय सारीपाटाची बरीच चर्चा झाली आहे. त्यानुसार सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात आहेत. २८८ सदस्यांच्या महाराष्ट्र विधानसभेमध्ये भाजपा १०६, शिवसेना ५५, काँग्रेस ४४, राष्ट्रवादी ५३ (यापैकी नवाब मलिक आणि अनिल देशमुख हे दोन आमदार सध्या तुरुंगात आहेत) आणि अपक्ष व इतर छोट्या पक्षांचे मिळून २९ आमदार आहेत. प्रत्येक उमेदवाराला राज्यसभेवर जाण्यासाठी ४२ पसंतीच्या मतांची आवश्यकता आहे. सामान्यपणे या निवडणुका बिनविरोध करण्याचा प्रघात असताना यंदा २४ वर्षांनंतर महाराष्ट्रात राजकीय सहमती न झाल्यामुळे निवडणूक होत आहे.

पक्षीय बलाबलाच्या आकडेवारीनुसार…

आकडेमोडीनुसार काँग्रेसकडे दोन, राष्ट्रवादीकडे (मलिक आणि देशमुख वगळता) नऊ तर शिवसेनेकडे १३ अतिरिक्त मते आहेत. शिवाय चार अपक्ष आमदारही सरकारच्या बाजूने मत देण्याची शक्यता आहे. तीन पक्षांची मिळून २४ अतिरिक्त मते महाविकास आघाडीकडे असली, तरी त्यावरची १८ मते सहाव्या जागेचा निकाल फिरवू शकतात.

राज्यसभा निकालाचा कोल्हापूरच्या राजकारणावर दूरगामी परिणाम होणार; कोण कोल्हापूरकर मल्ल बाजी मारणार?

राजस्थान – सुभाष चंद्रांमुळे गणितं बदलली?

महाराष्ट्रात हे सगळं सुरू असताना तिकडे राजस्थानमध्ये राज्यसभेच्या चार जागांसाठी निवडणूक होत आहे. पण पाच उमेदवार रिंगणात आहेत. २०० सदस्यांच्या राजस्थान विधानसभेत काँग्रेसचे १०८ तर भाजपाचे ७१ आमदार आहेत. जिंकण्यासाठी ४१ मतांची गरज आहे. या गणितानुसार काँग्रेसचे दोन तर भाजपाचा एक उमेदवार राज्यसभेवर सहज जाऊ शकतो. मात्र, अतिरिक्त मतांच्या बेगमीवर कांग्रेसने राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला आणि मुकुल वासनिक यांच्यासोबतच प्रमोद तिवारी यांना देखील मैदानात उतरवले आहे. तर दुसरीकडे भाजपाने पक्षाचे अधिकृत उमेदवार घनश्याम तिवारी यांच्यासोबतच अपक्ष उमेदवार आणि माध्यम क्षेत्रातील सुपरिचित सुभाष चंद्रा यांच्यामागे देखील पाठबळ उभे केले आहे. काँग्रेसला तिसऱ्या उमेदवारासाठी १५, तर भाजपाला अपक्ष उमेदवारासाठी ११ अतिरिक्त मतांची गरज आहे.

हरियाणा – भाजपा कार्तिकेय शर्मांच्या पाठिशी!

राजस्थानप्रमाणेच हरियाणामध्ये देखील माध्यम क्षेत्रातील एका नावामुळे सूत्र फिरली आहेत. या राज्यातून २ सदस्य राज्यसभेवर जाणार आहेत. पण तीन उमेदवार रिंगणात आहेत. तर विजयासाठी ३१ मतांची आवश्यकता आहे. ९० सदस्यांच्या विधानसभेत काँग्रेसकडे ३१ तर भाजपाकडे ४० मतं आहेत. याशिवाय भाजपानं आघाडी केलेल्या जननायक जनता पक्षाकडे १० मतं आहेत. तर ७ अपक्ष आहेत. काँग्रेसच्या मतांवर अजय माकन सहज निवडून जातील. तर माजी परिवहन मंत्री कृष्णलाल पनवर यांना राज्यसभेवर पाठवण्यासाठी भाजपाकडेही पुरेशी मतं आहेत. पण उरलेली ९ मतं आणि जननायक पक्षाची ९ मतं या जोरावर भाजपानं न्यूज एक्सचे मालक कार्तिकेय शर्मांना पाठिंबा दिला आहे. इतर दोन पक्षांच्या आमदारांनीही कार्तिकेय यांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे.

राज्यसभेतील मतदानावरून ‘एमआयएम’चे शिवसेनेसाठी चक्रव्यूह

कर्नाटक – अतिरिक्त जागेसाठी द्विपक्षीय चढाओढ!

कर्नाटकमधून चार सदस्य राज्यसभेवर जाणार आहेत. पण उमेदवार मात्र सहा आहेत! २२४ सदस्यांच्या कर्नाटक विधानसभेमध्ये काँग्रेसकडे ७०, भाजपाकडे १२१ तर जदयुकडे ३२ आमदार आहेत. विजयासाठीची ४५ मतं विचारात घेता भाजपाचे दोन आणि काँग्रेसचा एक असे तीन सदस्य सहज निवडून येऊ शकतात. पण खरी चुरस चौथ्या जागेसाठी आहे. या जागेसाठी तिन्ही पक्षांनी आपापले उमेदवार उभे केले आहेत. काँग्रेसकडून जयराम रमेश यांच्यासोबत मन्सूर अली खान यांना, भाजपाकडून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि अभिनेते जग्गेश यांच्यासोबत आमदार लहेर सिंह सिरोया यांना तर जदयूने रिअल इस्टेट क्षेत्रातील डी. कुपेन्द्र रेड्डी यांना उमेदवारी दिली आहे.