scorecardresearch

Premium

राज्यसभेतील मतदानावरून ‘एमआयएम’चे शिवसेनेसाठी चक्रव्यूह

अशी मदत मागणे व घेणे हे शिवसेनेच्या आक्रमक हिंदुत्वाच्या प्रतिमेला अधिक तडा देणारे असल्याने एमआयएमने जाणीवपूर्वक ही खेळी केल्याचे सांगण्यात येत आहे.

mim shivsena rajyasabha election
महाविकास आघाडीने मदत मागितल्यास विचार करू, असं ओवेसी म्हणाले आहेत. (प्रातिनिधिक छायाचित्र)

सुहास सरदेशमुख

राज्यसभेच्या निवडणुकीत एमआयएमच्या दोन सदस्यांचे मतदान हवे असल्यास तशी जाहीर मदत महाविकास आघाडीने मागावी, भाजपचा पराभव करण्यासाठी त्याबाबत जरूर विचार करू असे मजलीस- ए- इत्तेहादुल मुसलमीनचे अध्यक्ष असदोद्दीन ओवेसी यांनी म्हटले आहे. त्यांचे हे विधान शिवसेनेसाठी चक्रव्यूह असल्याचे मानले जात आहे. अशी मदत मागणे व घेणे हे शिवसेनेच्या आक्रमक हिंदुत्वाच्या प्रतिमेला अधिक तडा देणारे असल्याने एमआयएमने जाणीवपूर्वक ही खेळी केल्याचे सांगण्यात येत आहे.

Bihar-Cast-Census-and-BJP-election-victory
भाजपाला केंद्रात सत्ता मिळण्यासाठी कारणीभूत ठरत आहे ओबीसी प्रवर्ग; आकडेवारी काय दर्शवते?
narendra modi mohan bhagwat
समोरच्या बाकावरून : माहिती नको, आकडेवारी द्या..
Imtiyaz Jaleel
एमआयएम महिला विरोधी, खासदार जलील यांना अडचणीत आणण्याची भाजपची खेळी
Nitish Kumar and Sanjay Kumar Choudhary
भाजपच्या टीकेमुळे बिहारच्या राजकारणाला वळण; आपण हिंदूविरोधी नाही दाखविण्याचा नितीश कुमार यांचा प्रयत्न

‘एमआयएम’ हा पक्ष भाजपाचाच ‘ब’ चमू असल्याची टीका नेहमी केली जाते. त्यामुळे राज्यसभेत एमआयएमचे दोन सदस्य कोणत्या पक्षाला मतदान करणार याची उत्सुकता सर्वत्र आहे. ही दोन मते मिळविण्यासाठी कृषिमंत्री दादा भुसे यांनी एका सदस्याशी चर्चा केल्याचे वृत्त बाहेर आले. त्यानंतर जे काही म्हणायचे आहे ते जाहीरपणे मांडा असा आग्रह एमआयएमच्या नेत्यांनी जाहीर केली. खासदार जलील यांनीही जाहीरपणे मदत मागा, मग विचार करू असे सांगितले.

दरम्यान मंगळवारी सायंकाळपर्यंत महाविकास आघाडीकडून कोणीही संपर्क केला नव्हता असेही ओवेसी यांनी लातूर येथे जाहीर केले. दरम्यान ‘एमआयएम’ची ही खेळी शिवसेनेला अडचणीत आणणारी असल्याने महाविकास आघाडीतूनही त्यास फारसे समर्थन नसल्याचे सांगण्यात आले. दरम्यान काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मंगळवारी यशोमती ठाकूर यांनी ‘आरएसएस’ आणि ‘एमआयएम’ ‘एक दुजे के लिये’ असल्याची टीका केली. काँग्रेसच्या नेत्यांना हरविण्यासाठी एमआयएम नेहमी काम करते. नांदेडच्या निवडणुकीत अशोक चव्हाण यांना तर आरिफ नसीम खान यांचा ४०० पेक्षा कमी मतांचा पराभवही एमआयएममुळेच असल्याचा आरोपही काँग्रेसच्या वतीने करण्यात आला. त्यामुळे एमआयएमची मदत घेण्याबाबत काँग्रेसमध्येही बराच खल होईल असे मानले जात आहे.

अजित पवारांनी माजी राज्यमंत्र्यांची अक्कल काढल्याने मावळात कलगीतुरा, भाजप-राष्ट्रवादीत राजकारण तापले

भाजपला पराभूत करण्यासाठी एमआयएमने पुढाकार घेतल्याचे चित्र समोर दिसत असले तरी त्यात शिवसेनेची व काँग्रेसची कोंडी असल्यानेच एमआयएमने जाहीर मदत मागण्याची भूमिका घेतल्याचे मानले जात आहे. एमआयएमकडून भाजपला मदत करण्याची जाहीर भूमिका घेणे तसेच तटस्थ राजकीयदृष्ट्या तोट्याचे असल्याने तुम्ही जाहीर भूमिका घ्या, असे विधान करत कोंडी करण्याचा पट मांडण्यात आल्याचे चित्र दिसून येत आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Rajyasabha election mim helping mahavikas aghadi voting print politics news pmw

First published on: 08-06-2022 at 10:37 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×