लक्ष्मण राऊत

जालना : जालना लोकसभा मतदारसंघातून आतापर्यंत पाच वेळा खासदार झालेले केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी २०२४ मध्येही आपणच उमेदवार असणार असे जाहीर केले. मात्र या मतदार संघात निवडणूक लढवणाऱ्या काँग्रेसमध्ये अजूनही सामसूमच असल्याने काँग्रेस जालन्यात उभारी घेणार की नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

wardha lok sabha seat, Dr. Sachin Pavde, maha vikas aghadi candidate amar kale, Dr. Sachin Pavde s Presence congress event, Sparks Speculation congress entry,
‘हे’ प्रसिद्ध डॉक्टर व समाजसेवी काँग्रेसमध्ये? नेमके काय झाले, वाचा…
Congress manifesto for Lok Sabha election 2024 will be announced and campaign will be done across the country regarding 25 promises
काँग्रेसचीही ‘घरघर हमी’! पंचसूत्रीतील २५ आश्वासनांबाबत देशभर प्रचार
Congress state vice president Kishore Gajbhiye filed an independent nomination form in Ramtek Lok Sabha constituency
रामटेकमध्ये काँग्रेसमध्ये बंडखोरी; गजभियेंचा वंचित कडून अर्ज
Dr Nitin Kodawte and Dr Chanda Kodawte of Congress join BJP before Lok Sabha elections
गडचिरोली : ‘वडेट्टीवार’ समर्थक नेत्यांचा भाजप प्रवेशाने काँग्रेमध्ये खळबळ

शिवसेना-भाजप युती असताना जालना लोकसभेची जागा कायम भाजपकडेच राहात आलेली असून १९९६ पासूनच्या सात निवडणुका या पक्षाने सलग जिंकलेल्या आहेत. त्यापैकी १९९६ आणि १९९८ मध्ये उत्तमसिंह पवार भाजपकडून निवडून आले होते. तर १९९९ पासूनच्या सलग पाच निवडणुका रावसाहेब दानवे यांनी जिंकलेल्या आहेत. तसे पाहिले तर १९८९ पासून झालेल्या नऊ निवडणुकांत १९९१ मधील त्यावेळचे काँग्रेसमधील उमेदवार कै. अंकुशराव टोपे यांचा अपवाद वगळता आठ वेळेस भाजप उमेदवारांचा विजय जालना लोकसभा मतदारसंघातून झालेला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीतही रावसाहेब दानवे हेच उमेदवार असतील हे स्पष्टच असून त्यांनी स्वत:च जालना येथील रेल्वेच्या एका कार्यक्रमात यापूर्वी पुढील खासदार आपणच असू असे सांगून टाकलेले आहे. जालना आणि औरंगाबाद जिल्ह्यातील प्रत्येकी तीन विधानसभा मतदारसंघांचा समावेश असलेल्या या लोकसभा मतदारसंघावरील आपला प्रभाव दानवे यांनी यापूर्वी पाच वेळेस सिद्ध करून दाखविलेला आहे.

हेही वाचा… राहुल गांधींच्या भारत जोडोपूर्वी ‘या’ पाच पदयात्रांनी घडवली राजकीय क्रांती

काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीत हा लोकसभा मतदारसंघ नेहमीच काँग्रेसकडे राहिलेला आहे. अपवाद फक्त १९९९ मधील निवडणुकीचा. कारण त्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये आघाडी झाली नव्हती आणि दोन्ही पक्षांनी स्वतंत्ररीत्या उमेदवार उभे केले होते. परंतु दानवे तीन लाख ३२ हजारांपेक्षा अधिक मते घेऊन निवडून आले. दोन वेळेस भोकरदनमधून विधानसभा सदस्य म्हणून निवडून येणाऱ्या दानवेंची ही पहिलीच लोकसभा निवडणूक होती आणि त्यांच्यासमोर सुदैवाने काँग्रेस-राष्ट्रवादीचे स्वतंत्र उमेदवार होते.

हेही वाचा… अचलपूर-परतवाड्यात पुन्हा धार्मिक विद्वेषाचे निखारे

गेल्या नऊपैकी आठ निवडणुकांत आणि त्यापैकी सलग सात निवडणुकांत भाजपसमोर पराभूत झालेला काँग्रेस पक्ष आगामी निवडणुकीत भाजपला आव्हान देऊ शकेल का, हा खरा प्रश्न आहे. २००९ मध्ये दानवे निवडून आले होते. परंतु त्यांना काँग्रेसचे कल्याण काळे यांच्याशी कडवी झुंज द्यावी लागली होती. या निवडणुकीत दानवे आणि काळे यांच्या मतांमधील अंतर साडेआठ हजारांच्या आसपास होते. त्यानंतर २०१४ आणि २०१९ च्या दोन्ही निवडणुका दानवे यांनी काँग्रेसचे उमेदवार विलास औताडे यांच्या विरुद्ध मोठ्या फरकाने जिंकल्या.

हेही वाचा…शिवसेनेच्या आक्रमक भाजपविरोधी भूमिकेमुळे ‘एमआयएम’ची कोंडी; सेनेबाबतच्या धोरणाबद्दल संभ्रम

बदलत्या राजकीय वातावरणात दानवे यांचा या लोकसभा मतदारसंघावरील प्रभाव अधिक वाढला आहे. भाजपसोबत असणाऱ्या ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षाचे आमदार असलेले पैठण आणि सिल्लोड हे दोन विधानसभा मतदारसंघ जालना लोकसभा मतदारसंघात आहे. याशिवाय जालना वगळता या लोकसभा मतदारसंघातील अन्य तीन विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत. जालना विधानसभा मतदारसंघातून चार वेळा आमदार राहिलेले अर्जुन खोतकर आता ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षात असल्याने पर्यायाने भाजपसोबत आहेत. ते आणि दानवे आता एकत्र आहेत.

हेही वाचा… Maharashtra Breaking News Live : महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या अपडेट्स, एका क्लिकवर!

मागील सात-आठ वर्षांत रावसाहेब दानवे यांचे भाजपमधील आणि जालना जिल्ह्याच्या राजकारणातील महत्त्व वाढले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि दोन वेळेस केंद्रीय राज्यमंत्रपदी वर्णी लागल्यामुळे विरोधी पक्षांतील लहान-मोठे पुढारी आणि कार्यकर्त्यांमध्ये दानवेंबद्दलचे आकर्षण वाढलेले आहे. दोन वेळेस आमदार राहिलेले विलास खरात यापूर्वीच भाजपमध्ये गेलेले आहेत आणि अलिकडेच जालना जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष भीमराव डोंगरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. विकासकामांचा मुद्दा पुढे करून त्या संदर्भातील तपशील आणि मिळालेला निधी याची माहिती देऊन दानवे विविध व्यासपीठांवरून आपले तसेच भाजपचे महत्त्व अधोरेखित करीत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत त्यांच्यासमोर कोण उमेदवार असेल किंवा त्यासाठी आतापासून कोणते प्रयत्न सुरू आहेत याबाबत काँग्रेस पक्षात सामसूम असल्याचेच सध्यातरी दिसत आहे. प्रदेश काँग्रेसकडून आलेले कार्यक्रम जिल्ह्यात होतात परंतु आगामी लोकसभा निवडणूक जिंकण्याची जिद्द मात्र त्यामधून जाणवत नसल्याचेच चित्र आहे.