लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

मुंबई : निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार पोलीस महासंचालक पदावरून हटविण्यात आलेल्या रश्मी शुक्ला यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे. त्यांच्या जागी संजयकुमार वर्मा यांची विधानसभा निवडणुकीपर्यंत नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.त्यामुळे शुक्ला यांचे भवितव्य नव्या सरकारच्या हातात राहणार आहे.

Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
Bullet Train Bridge Collapse in Anand Gujarat
Bullet Train Bridge Collapse : बुलेट ट्रेन प्रकल्पाचा पूल कोसळला, तीन मजूर ठार; ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकले, बचावकार्य जारी
maharashtra assembly election 2024
काँग्रेस अखेर शंभरीपार, अर्जमाघारीनंतर सर्वच पक्षांची अंतिम आकडेवारी आली समोर; वाचा काय आहे नेमकं समीकरण!
Worli Assembly Constituency Assembly Elections by Major Parties Not a candidate print politics news
प्रमुख पक्षांकडून ‘वरळी’कर उमेदवारच नाही
NCP Clock
NCP Clock Symbol : ऐन निवडणुकीत सर्वोच्च न्यायालयाकडून अजित पवारांना आदेश; पक्षचिन्हाबाबत दिला ३६ तासांचा अल्टिमेटम!
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर काँग्रेसमध्ये दोन गट? शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता?

महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेत आल्यास शुक्ला यांची पुन्हा महासंचालकपदी वर्णी लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पोलीस दलाच्या वाहनांमधून सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांना रसद पुरविली जात असल्याचा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेला आरोप, पक्षपातीपणावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची तक्रार, संगमनेरसह विविध भागांमधील राजकीय संघर्ष हाताळण्यावरून पोलिसांच्या भूमिकेवरून निर्माण झालेले प्रश्नचिन्ह आणि आयोगाच्या निरीक्षकांनी दिलेल्या अहवालानंतर निवडणूक आयोगाने सोमवारी राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना पदावरून तात्काळ हटविण्याचे आदेश दिले होते.

हेही वाचा >>>Uddhav Thackeray : “मोदींच्या अशुभ हातांनी उभा केलेला शिवरायांचा पुतळा…”, उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल

शुक्ला यांची पदावरून उचलबांगडी करण्यात आल्यावर महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडे सोपविण्यात आला होता. तसेच आयोगाच्या आदेशानुसार राज्य सरकारने तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे निवडणूक आयोगाला पाठविली होती. त्यातून आयोगाने किमान दोन वर्षांचा कार्यकाळ मिळू शकेल, या निकषाची पूर्तता करणाऱ्या संजय कुमार वर्मा यांची महासंचालकपदी नियुक्ती करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने राज्याच्या मुख्य सचिवांना दिले होते. त्यानुसार राज्य सरकारने मंगळवारी वर्मा यांची विधानसभा निवडणूक पूर्ण होईपर्यंतच्या काळासाठी महासंचालकपदी नियुक्ती केली आहे.

हेही वाचा >>>Kolhapur North Vidhan Sabha Constituency : शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता ?

मंत्रालयात चर्चा

● राज्य सरकारने शुल्का यांना दोन वर्षांसाठी महासंचालकपदी नियुक्त केले होते. मात्र आयोगाच्या आदेशानुसार आता त्यांना पदावरून हटविण्यात आल्यामुळे शुक्ला यांचे भवितव्य काय, अशी चर्चा मंत्रालयात रंगली आहे. शुल्का यांच्या भवितव्याचा निर्णय नवीन सरकारच घेईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

● नियमानुसार महासंचालकपदी पोलीस अधिकाऱ्याची नियुक्ती करताना ३० वर्षे सेवा झालेल्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांची नावे केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे पाठविली जातात. त्यातून आयोग तीन अधिकाऱ्यांची नावे राज्य सरकारला पाठविते आणि त्यातून सरकार एका अधिकाऱ्यांची महासंचालकपदी नियुक्ती करते.

● वर्मा यांना निवडणूक काळापुरते नियुक्त करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. शुक्ला यांची नियुक्ती सरकारने केली असल्याने आचारसंहिता संपल्यानंतर नवीन सरकार त्यांच्या भवितव्याचा निर्णय घेईल. विद्यामान सरकार पुन्हा सत्तेवर आल्यास शुक्ला यांना पुन्हा महासंचालकपदी विराजमान होण्याची संधी मिळू शकते असेही सूत्रांनी सांगितले.

Story img Loader