गुजरात विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. गुजरातमधील सत्ताधारी भारतीय जनता पार्टीसह काँग्रेस आणि आम आदमी पार्टीकडून जोरदार प्रचार केला जात आहे. पण गुजरातमधील उत्तर जामनगर विधानसभेची जागा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. कारण या जागेवरून भारतीय क्रिकेटर रवींद्र जडेजाची पत्नी आणि बहीण आमने-सामने आल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या जागेसाठी रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा यांना भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी देण्यात आली आहे. तर जडेजाची बहीण आणि काँग्रेस महिला आघाडीच्या प्रमुख नैनाबा जडेजा आपल्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी प्रचार करत आहेत. या जागेसाठी रवींद्र जडेजाच्या घरातील दोन महिला आमने-सामने आल्याने येथे राजकीय चुरस पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

हेही वाचा- Gujarat Election 2022: गुजरातमध्ये सात अब्जाधीश निवडणुकीच्या रिंगणात, भाजपाच्या पाच उमेदवारांचा समावेश

दरम्यान, मंगळवारी नैनाबा जडेजा यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्या वहिनीवर गंभीर आरोप केले आहेत. पत्रकार परिषदेत नैनाबा जडेजा म्हणाल्या, “मतदारांची सहानुभूती मिळविण्यासाठी रिवाबा आपल्या मुलांचा वापर करत आहे. हा बालकामगाराचा प्रकार आहे. त्यामुळे काँग्रेसने याप्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे.”

हेही वाचा- Gujarat Elections : …म्हणून भाजपाच्या तिकीटावर निवडणूक जिंकणं हार्दिक पटेलांसाठी असणार मोठं आव्हान!

“रिवाबा जडेजा ह्या राजकोट पश्चिम येथील मतदार आहेत. असं असूनही त्या उत्तर जामनगर कशी निवडणूक लढवू शकतात, असा सवाल नैनाबा यांनी पत्रकार परिषदेत विचारला आहे. तसेच आपल्या वहिनीचे अधिकृत नाव रिवा सिंग हरदेवसिंग सोलंकी असं आहे. तिच्या निवडणूक अर्जातही हेच नाव आहे. तिने रवींद्र जडेजाचं नाव कंसात लिहिलं आहे. केवळ निवडणूक जिंकण्यासाठी त्या जडेजा आडनावाचा वापर करत आहेत. लग्नाला सहा वर्षे झाली, तरीही त्यांना मतदार यादीतील आपलं नाव बदलून घेण्यास वेळ मिळाला नाही” असा आरोप नैनाबा यांनी केला.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ravindra jadejas wife rivaba and sister naynaba jamnagar north seat using children for poll campaign rmm
First published on: 23-11-2022 at 20:17 IST