पुरंदर : शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रसमधील फुटीनंतर बदललेल्या राजकीय परिस्थितीमध्ये पुरंदरमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीला बंडखोरीचे ग्रहण लागण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीकडे ही जागा काँग्रेसकडे असताना राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षानेही तयारी सुरू केली आहे. तर, महायुतीमध्ये शिवसेनेचे (शिंदे) माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्याविरोधात भाजपच्या इच्छुकांनी तयारी केली आहे. त्यामुळे पुरंदर-हवेलीतील लढत तिरंगी होईल, अशी चर्चा आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघातील वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. या मतदारसंघातील उमेदवारांच्या नावाची घोषणा अद्यापही झालेली नसली तरी, महाविकास आघाडी आणि महायुतीच्या अनेक इच्छुकांनी जोमाने प्रचार सुरू केल्याचे चित्र आहे. या मतदारसंघातील लढत महाविकास आघाडीतील काँग्रेसचे विद्यमान आमदार संजय जगताप यांच्याविरोधात महायुतीमधील शिवसेनेचे (शिंदे) माजी आमदार विजय शिवतारे यांच्यात होईल, अशी शक्यता आहे. मात्र राष्ट्रवादी (शरद पवार) आणि भाजपच्या काही इच्छुकांनीही तयारी केल्याने पुरंदरमध्ये बंडखोरी होईल, अशी चर्चा सुरू झाली आहे.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Sharad Pawar On Devendra Fadnavis CM Oath Ceremony
Sharad Pawar : महायुती सरकारच्या शपथविधीला का नाही…

हेही वाचा >>>अजित पवारांकडून ‘डॅमेज कंट्रोल’चे प्रयत्न; राजेंद्र शिंगणेंच्या तुल्यबळ उमेदवाराचा शोध

महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादीचा (शरद पवार) मेळावा दहा दिवसांपूर्वी जेजुरी येथे झाला. त्यावेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी विद्यमान आमदार संजय जगताप यांचे कौतुक करत तेच संभाव्य उमेदवार असतील, असे संकेत दिले होते. मात्र त्यानंतरही, तालुक्यातील राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी सनदी अधिकारी संभाजी झेंडे यांनी निवडणूक लढविण्याची भूमिका घेतली आहे. ‘गेली निवडणूक लढविणार होतो. मात्र, पुढील निवडणुकीत संधी दिली जाईल, असा शब्द दिल्यानेच माघार घेतली होती. यावेळी मात्र लढणारच,’ अशी भूमिका झेंडे यांनी घेतली आहे. त्यामुळे त्यांचा बंडाचा झेंडा कायम राहणार का, याबाबत चर्चा सुरू झाली असून त्यांची संभाव्य बंडखोरी रोखण्याचे आव्हान राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षापुढे आहे.

हेही वाचा >>>चंद्रपूर जिल्ह्यातील नेत्यांची दिल्लीदरबारी धाव, मित्रपक्षांना जागा सोडण्यास विरोध

महायुतीकडून शिवसेनेचे (शिंदे) माजी जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांना उमेदवारी निश्चित असल्याचे समजले जात आहे. महायुतीमध्ये पुरंदर मतदारसंघ नेहमीच शिवसेनेचा राहिला आहे. त्यादृष्टीने शिवतारे यांनी बैठका आणि गावोगावच्या कार्यकर्त्यांच्या भेटीगाठीचा कार्यक्रम सुरू केला आहे. मात्र, शिवतारे यांच्यासाठी ही निवडणूक सोपी नाही. महायुतीमधील घटक पक्ष राष्ट्रवादीतील (अजित पवार) अनेक इच्छुकांना या मतदारसंघातून निवडणूक लढवायची आहे. पुरंदरमधून लढण्यास भाजपमधील काही इच्छुक आहेत. काही दिवसांपूर्वी भाजप पदाधिकाऱ्यांचा सासवड येथे मेळावा झाला होता. त्यामध्ये भाजपच्या कार्यकर्त्यालाच उमेदवारी द्यावी, अशी आग्रही मागणी करण्यात आली. भाजपकडून माजी आमदार अशोक टेकवडे, जालिंदर कामठे, बाबाराजे जाधवराव, तालुकाध्यक्ष गंगाराम जगदाळे, पंडित मोडक इच्छुक आहेत. तर, राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाकडून जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा. दिगंबर दुर्गाडे आणि जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दत्तात्रय झुरंगे इच्छुक आहेत. त्यामुळे शिवतारे यांच्यापुढे महायुतीमधील सात ते आठ इच्छुकांचे आव्हान असणार आहे.

या मतदारसंघातील निवडणूक रखडलेले नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळ, गुंजवणीचे पाणी, जनाई-शिरसाई उपसा योजना आणि जेजुरी एमआयडीसी विस्तारीकरण या मुद्द्यावर होण्याची शक्यता आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्रित काम केल्याने संजय जगताप यांना सहज विजय मिळाला होता. मात्र, यावेळी राष्ट्रवादीतील फुटीमुळे पुरंदरमधील निवडणूकही चुरशीची होण्याची चिन्हे आहेत.

Story img Loader