राष्ट्रीय जनता दलाचे ( आरजेडी ) नेते सुधाकर सिंह पुन्हा चर्चेत आले आहेत. सुधाकर सिंह यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांची तुलना महाभारतातील पात्र शिखंडीबरोबर केली आहे. तसेच, नितीश कुमार हे रात्रीचे सुरक्षारक्षक आहेत, असंही सुधाकर सिंह यांनी म्हटलं आहे. सिंह यांच्या विधानानंतर बिहारमध्ये गदारोळ उठला आहे.

२०२२ साली बिहारमध्ये नितीश कुमार यांनी भाजपाबरोबर काडीमोड घेत सत्तेतून बाहेर पडले. त्यानंतर राष्ट्रीय जनता दलाबरोबर ( आरजेडी ) जात सत्तास्थापन केली. या सरकारमध्ये आरजेडीचे सुधाकर सिंह यांना कृषीमंत्रीपद देण्यात आलं होतं. पण, कृषी खात हे चोरांचं आहे. तर, आपण चोरांचं सरदार आहोत, असं विधान सिंह यांनी केलं. यानंतर सुधाकर सिंह यांनी कृषीमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. अशात सुधाकर सिंह यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर हल्लाबोल केल्याने चर्चेत आले आहेत.

Chief Minister Eknath Shinde
“मला रोज फोन यायचे, साहेब त्यांना काहीतरी सांगा”; शिवतारेंच्या निवडणूक लढवण्याच्या भूमिकेवर मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितला किस्सा
Loksatta chavdi happening in maharashtra politic news on maharashtra politics
चावडी: तो मी नव्हेच!
bjp claim thane loksabha marathi news, thane lok sabha bjp marathi news
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यावर भाजपचा दावा का? भाजपच्या विस्तारवादाने शिंदेसेना भयग्रस्त?
Vijay Shivtare
शिवतारे गरजले, “बारामतीमधून पवार यांची हुकूमशाही संपविण्यासाठीचे माझे धर्मयुद्ध..”

हेही वाचा : राजस्थानमधील ९० आमदारांचे राजीनामे पुन्हा खिशात; अशोक गेहलोतांची मोठी खेळी

सुधाकर सिंह म्हणाले, “नितीश कुमार शिखंडी आहेत. तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री करुन नितीश कुमारांना हटवलं पाहिजे. नितीश कुमार मुख्यमंत्री आहेत आणि परतही होतील. पण, इतिहास कर्पूरी ठाकुर, लालू प्रसाद यादव, श्रीकृष्ण सिन्हांसारख्या मुख्यमंत्र्यांना लक्षात ठेवेल. मात्र, बाकीच्या लोकांना इतिहास लक्षात ठेवणार नाही,” असा टोला नितीश कुमारांना सिंह यांनी लगावला.

हेही वाचा : “कर्नाटकमधील ‘नंदिनी’ डेअरीचं ‘अमूल’मध्ये विलीनीकरण होणार नाही”, अमित शाहांच्या विधानावर बोम्मईंचा यू-टर्न

“नितीश कुमार रात्रपाळीला असलेल्या सुरक्षारक्षकच्या ( नाईट वॉचमन ) भूमिकेत आले आणि त्यानंतर तेजस्वी यादव मुख्यमंत्री बनणार होते. पण, चार ते पाच महिने गेल्यानंतरही तेजस्वी यादव मुख्यमंत्री झाले नाहीत. यासाठी नितीश कुमार दोषी आहेत. तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री का केलं नाही? याचा जाब नितीश कुमारांना विचारला पाहिजे,” असं सुधाकर सिंह यांनी म्हटलं.