मोदी सरकारला होसबाळे यांनी सुनावले; आता भागवतांनी सावरले | RSS chief Mohan Bhagwat tried to recover the side of RSS by sidelined the Dattatreya Hosabale statement on unemployment issues print politics news amy 95 | Loksatta

मोदी सरकारला होसबाळे यांनी सुनावले; आता भागवतांनी सावरले

सरकार फक्त ३० टक्केच रोजगार देऊ शकते, रोजगार देण्याजी जबाबदारी सरकारपेक्षा समाजाची अधिक – सरसंघचालक

मोदी सरकारला होसबाळे यांनी सुनावले; आता भागवतांनी सावरले
मोदी सरकारला होसबाळे यांनी सुनावले; आता भागवतांनी सावरले

राजेश्वर ठाकरे

एकूण रोजगाराच्या जास्तीत जास्त ३० टक्केच रोजगार सरकार उपलब्ध करून देऊ शकते, उर्वरित ७० टक्के रोजगार उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही समाजाची आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी संघाच्या दसरा मेळाव्यात केले.अलीकडेच संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांनी देशातील वाढत्या बेरोजगारीकडे लक्ष वेधले होते. या पार्श्वभूमीवर डॉ. भागवत यांचे प्रतिपादन केंद्र सरकारची बाजू सांभाळून घेणारे ठरते.

हेही वाचा >>> अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीची एकजूट – काँग्रेसचा शिवसेनेला पाठिंबा

नागपुरातील रेशीमबाग मैदानावर बुधवारी संघाचा विजयादशमी उत्सव पार पडला. यंदा प्रमुख पाहुणे म्हणून पद्मश्री संतोष यादव या उपस्थित होत्या. संघाच्या दसरा उत्सवाला उपस्थित राहणाऱ्या त्या प्रथम महिला आहेत. विजयादशमी कार्यक्रमातून सरसंघचालक स्वंयसेवकांना संदेश देत असतात. त्यामुळे त्याला महत्त्व असते. केंद्र सरकार युवकांना रोजगार देण्यात अपयशी ठरले, अशी टीका विरोधकांकडून सातत्याने होते.त्यातच होसबाळे यांनीही याच मुद्याकडे लक्ष वेधल्याने सरसंघचालक या मुद्यावर काय बोलतात याबाबत उत्सुकता होती. मात्र त्यांनी रोजगार उपलब्धतेची जबाबदारी ७० टक्के समाजावर टाकून मोदी सरकारची पाठराखण करण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा >>> एकनाथ शिंदे शिवसेना पक्षप्रमुख पदावर दावा करणार?

डॉ. भागवत म्हणाले, लोकांना रोजगार हवा. पण तो सरकारी नोकरीच्या स्वरुपातच हवा. तोही घराजवळच. पण असा विचार करून चालणार नाही. सरकारी आणि खासगी क्षेत्र मिळून जास्तीत जास्त ३० टक्के रोजगार निर्मिती होऊ शकते. उर्वरित रोचगारासाठी विविध क्षेत्राचे पर्याय आहेत. यासाठी उद्यमशीलता वाढायला हवी. म्हणून सरकारने कौशल्य विकास, स्टार्टअप यासारख्या योजना सुरू केल्या. सर्वांधिक रोजगार कृषी आणि सहकार क्षेत्रात आहेत. हे क्षेत्र समाजाच्या हातात आहेत. म्हणूनच समाजाने रोजगार निर्माण करायचा आहे, असे मी म्हणतो. याचा अर्थ सरकारला त्याच्या जबाबदारीतून मुक्त करीत नाही.

हेही वाचा >>> पुन्हा एकत्र काम करण्याबाबची नितीश कुमार यांची ऑफर धुडकावली – प्रशांत किशोर

करोना काळात मोठ्या संख्यने (३ कोटी) लोक स्थलांतरित झाले. त्यांचे रोजगार बुडाले. नवीन रोजगार मिळाले नाही. अशांना रोजगार देण्याचे काम आपणे केले. शासन, प्रशासन, समाजातील सधन, संपन्न व्यक्ती, उद्योजकानी पुढाकार घेतला. संघाचे कार्यकर्ते समोर आले. संघाचे देशातील पावणे तीनशे जिल्ह्यात काम सुरू केले आणि रोजगार देत आहेत, असा दावाही डॉ. भागवत यांनी केला.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीची एकजूट – काँग्रेसचा शिवसेनेला पाठिंबा

संबंधित बातम्या

राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत भूमिका घेण्यावरून विरोधी पक्षांत दुमत, जेडी(एस) ने मुर्मु यांना समर्थन देण्याची भूमिका 
धुळे मनपात सत्ताधारी भाजपची कोंडी ; समस्या सुटत नसल्याने स्वपक्षीयांचा वैताग
माजी आमदार सुरेश जेथलिया यांचे तळ्यात-मळ्यात
डॉ. राहुल पाटील : रचनात्मक कार्यातून राजकारण
काँग्रेसने थेट रावणाशी तुलना केल्यानंतर नरेंद्र मोदी पुन्हा आक्रमक; म्हणाले, “काँग्रेस नेते मला अपशब्द बोलतात, मात्र…”

व्हिडिओ

ताज्या बातम्या
अपत्य नियंत्रणाची शिफारस; समान नागरी कायद्यासाठी उत्तराखंड सरकारच्या समितीचा अहवाल
मुंबई: कडेकोट सागरी सुरक्षेचा नौदलाचा संकल्प; श्रीवर्धन-हरिहरेश्वर किनाऱ्यावरील बोटीमुळे सुरक्षेतील त्रुटी उघड
मुंबई: बेळगावसाठी नवस करायला मुख्यमंत्री का जात नाहीत?
५०० कोटी रुपयांच्या ‘आयफोन’ची तस्करी; कंपनी मालकाला अटक, २०० कोटींचे सीमाशुल्क बुडवल्याचा आरोप
‘काश्मीर फाइल्स’चा वाद; ‘इफ्फी’च्या तीन परीक्षकांचा लापिड यांना पाठिंबा