राजस्थानमध्ये यावर्षी अखेरीस विधानसभा निवडणुकांचं रणशिंग फुंकलं जाणार आहे. राजस्थानात सत्तापालट करण्यासाठी भाजपाकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. अशातच माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी ‘एकला चलो रे’ची भूमिका घेतली आहे. सचिन पालयट यांनी राजस्थानमध्ये सभांचं आयोजन केलं आहे. यामुळे पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी अद्यापही १० महिने बाकी आहेत. त्यापूर्वी सचिन पायलट हे पुढील आठवड्यापासून शेतकरी आणि युवकांना संबोधित करणार आहेत. राजस्थानमध्ये ‘भारत जोडो यात्रे’ला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. पण, राज्यातील नेतृत्वाबाबत ( मुख्यमंत्री पद ) अद्यापही निर्णय न झाल्याने दबावाचे राजकारण करण्यासाठी सचिन पायलट यांनी ‘एकला चलो रे’ ची भूमिका घेतल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.

nagpur, Anurag Thakur, Criticizes Congress, india alliance leaders no trust, no trust on rahul gandhi, rahul gandhi s leadership, bjp, lok sabha 2024, nda, election 2024,
“राहुल गांधींवर जनतेचा विश्वास नाही,” अनुराग ठाकूर यांची टीका; म्हणाले, “काँग्रेसमध्ये…”
Devrao Bhongle, Congress, BJP
भाजपचे नेते देवराव भोंगळे म्हणतात, “पराभव दिसू लागताच संभ्रमाचे राजकारण करण्याची काँग्रेसची…”
Congress Sangli
सांगलीत काँग्रेस नेत्यांची प्रतिष्ठा पणाला, जागा सुटण्याबाबत साशंकताच
Shiv Sena Shinde group and BJP will campaign for the candidate of the grand alliance in Mira Bhayandar city
वरिष्ठांनी कानउघडणी केल्यानंतर स्थानिक नेते नरमले; मिरा भाईंदर मध्ये महायुती एकत्रित काम करणार

हेही वाचा : महाराष्ट्र केसरी : मॅट विभागात महेंद्र गायकवाड आणि शिवराज राक्षे यांच्यात अंतिम लढत

मात्र, पायलट यांच्या निकटवर्तीयाने या वृत्ताचं खंडण केलं आहे. ते म्हणाले, “भारत जोडो यात्रेनंतर तरुण, शेतकरी यांच्यातील उत्साह कायम राखण्यासाठी सभांचं आयोजन करण्यात येत आहे. तर, भाजपा मोठ्या प्रमाणात प्रचार करत आहे. याकडे आम्ही दुर्लक्ष करु शकत नाही,” असंही त्यांनी सांगितलं.

हेही वाचा :  राहुल गांधींनी देशात आर्थिक संकटाचा दिला इशारा; जनतेला उद्देशून लिहिलेल्या पत्रात म्हणाले…

राजस्थानचे प्रदेशाध्यक्ष गोविंद सिंह डोटासरा संघटनात्मक कामात व्यस्त आहेत. तर, मुख्यमंत्री अशोक गेहलोत अर्थसंकल्पीय अधिवेशनाची तयारी करत आहेत. त्याचवेळी सचिन पायलट हे स्वत:ला पक्षात सक्रीय असल्याचं दाखवत आहेत. तसेच, २००३ आणि २०१३ सालच्या विधानसभा निवडणुकीत पक्षाचा सुफडासाफ झाला होता. त्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी जाट समुदायाच्या विविध नेत्यांना सचिन पायलट भेटण्याचा प्रयत्न करतील. या सभांसाठी राहुल गांधींचा सचिन पालयट यांना पाठिंबा आहे. पण, काँग्रेस पक्षाकडून कोणतीही परवानगी त्यांनी घेतली नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.