लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या समाजवादी पक्षाने शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे) कट्टर हिंदुत्ववादी भूमिकेवर शनिवारी सवाल उपस्थित केला. शिवसेनेची ही भूमिका कायम राहिली तर आम्ही ‘मविआ’तून बाहेर पडू, असा इशारा ‘सपा’चे प्रदेशाध्यक्ष अबु आझमी यांनी दिला.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

समाजवादी पक्षाने विधानसभेची निवडणूक ‘मविआ’मध्ये लढवली होती. ‘मविआ’च्या आमदारांनी विधानसभा सदस्यत्व शपथविधीवर बहिष्कार टाकला होता. समाजवादी पक्ष ‘मविआ’चा घटक पक्ष असताना या पक्षाच्या आमदारांनी मात्र शपथ घेतली.

हेही वाचा >>>“इंडिया आघाडी मी बनवलीय, संधी मिळाल्यास…”, ममता बॅनर्जी यांचं मोठं वक्तव्य; मित्रपक्षांच्या सावध प्रतिक्रिया

शिवसेनेचे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी ६ डिसेंबरच्या निमित्ताने ट्वीट करत बाबरी मशीद विध्वंसाच्या घटनेवर बाळासाहेब ठाकरे यांच्या टिप्पणीचा पुनरुच्चार केला होता. अबु आझमी यांनी नार्वेकर यांच्या भूमिकेवर टीका केली. राजकारणात धर्म न आणण्याची ‘मविआ’ची भूमिका होती. शिवसेना कट्टर हिंदुतत्वादी भूमिका सोडणार नसेल तर ‘मविआ’मध्ये राहण्यासंदर्भात विचार करावा लागेल, असा इशारा आझमी यांनी दिला.

‘मविआ’मध्ये विधानसभा निवडणुकीत ताळमेळ नव्हता, आमच्या अधिक जागा निवडून आल्या असत्या, असेही आझमी म्हणाले.

Story img Loader