लोकसत्ता वार्ताहर

यवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)चे प्रदेश उपाध्यक्ष संदीप बाजोरीया यांनी दोन दिवसांपूर्वी अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेणार नाही, असे जाहीर करून येथील काँग्रेसची झोप उडविली होती. मात्र पक्षनेते शरद पवार यांच्या सुचनेनंतर त्यांनी निवडणुकीतून माघार घेत असल्याचे जाहीर केले. संदीप बाजोरीया यांच्या निर्णयाने यवतमाळात महाविकास आघाडीला दिलासा मिळाला आहे.

Sada Sarvankar
Sada Sarvankar : “मला निवडणूक लढवावीच लागेल”, सदा सरवणकर हतबल; म्हणाले, “राज ठाकरेंनी माझी…”
12 December Rashi Bhavishya In Marathi
दुसरा गुरुवार, १२ डिसेंबर पंचांग: महालक्ष्मीच्या कृपेने मेषला…
thane assembly constituency sanjay kelkars strength with candidature of ubt rajan vichare for maharashtra vidhan sabha election 2024
Thane Vidhan Sabha Constituency : राजन विचारेंच्या उमेदवारीने ठाण्यात संजय केळकर यांना बळ
Nawab Malik big claims about maharashtra Election
Nawab Malik: शरद पवार आणि एकनाथ शिंदे संपर्कात?, ‘निवडणुकीनंतर काहीही होऊ शकतं’, नवाब मलिक यांचा दावा
In Akola vanchit Bahujan Aghadi Zeeshan Hussain application withdrawn from election
वंचितला मोठा धक्का…अधिकृत उमेदवाराची माघार…आता काँग्रेसला…
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Palghar MLA Shrinivas Vanga return
Shrinivas Vanga: ‘आधी रडले, ठाकरेंना देव म्हणाले’, घरी परतल्यावर आमदार श्रीनिवास वनगांचे सूर बदलले; म्हणाले, “एकनाथ शिंदे…”

संदीप बाजोरीया यांनी तीन महिन्यांपूर्वी पक्षनेते शरद पवार यांच्याकडून यवतमाळची जागा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाला सुटावी म्हणून शब्द घेत काम सुरू केले होते. आपण तुतारी चिन्हावरच लढणार असा प्रचारही मतदारसंघात केला. यवतमाळच्या विद्यमान आमदारांविरोधात वातावरण निर्मिती करून प्रचारात आघाडी घेतली. मात्र ही जागा काँग्रेसला सुटल्याने त्यांचा हिरमोड झाला. काँग्रेसने दगाबाजी करून उमेदवारी मिळविल्याने आता कोणत्याही परिस्थितीत यवतमाळातून माघार घेणार नसल्याचे बाजोरीया यांनी जाहीर केले होते. बाजोरीया यांचे उपद्रवमूल्य काँग्रेसला माहिती असल्याने त्यांनी कोणत्याही परिस्थितीत उमेदवारी मागे घ्यावी, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू झाले. मात्र स्थानिक पातळीवर बाजोरीया यांची समजूत काढण्यासाठी कोणीही पुढे आले नाही. पक्षनेते शरद पवार हेच बाजोरीया यांना उमेदवारी मागे घेण्यास सूचवू शकतात, हे गृहीत धरून काँग्रेस नेत्यांनी व्यूहरचना आखली.

आणखी वाचा-Thane Vidhan Sabha Constituency : राजन विचारेंच्या उमेदवारीने ठाण्यात संजय केळकर यांना बळ

अखेर पक्ष कार्यालयातून शरद पवार यांचा उमेदवारी मागे घेण्यासाठी निरोप आल्याचे सांगत संदीप बाजोरीया यांनी उमेदवारी मागे घेत असल्याचे जाहीर केले. आज सोमवारी त्यांच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली. महाविकास आघाडीच्या विजयासाठी आपण निवडणुकीतून माघार घेत आहो, असे बाजोरीया म्हणाले. आपल्याकडे पक्षाचा एबी फॉर्म असतानासुद्धा आपण तो अर्जासोबत जोडला नाही. तो जोडला असता तर तुतारी चिन्हावरच आपण येथून लढलो असतो. मात्र उमेदवारी मागे घ्यावी म्हणून पक्ष कार्यालयातून पक्षनेते शरद पवार यांचा निरोप आल्याने आपण जड अंत:करणाने हा निर्णय घेतला, असे बाजोरीया म्हणाले.

आणखी वाचा-निवडणुकीपूर्वी बदली झालेल्या रश्मी शुक्ला कोण आहेत? विरोधकांनी त्यांच्या बदलीची मागणी का केली होती?

माझी उमेदवारी महायुतीच्या उमेदवाराला पूरक असल्याचा आरोप होत होता. मात्र आपण कायम महाविकास आघाडीसोबत असून, भाजपच्या स्थानिक आमदाराविरोधात मतदारसंघात विरोधी वातावरण तयार केले आहे. काँग्रेसने ही संधी कॅश करावी, असे बाजोरीया म्हणाले. आपल्याला उध्वस्त करणारे राज्यसभेचे एक माजी खासदार आणि एक माजी आमदार काँग्रेस उमेदवारासोबत असल्याने आपण यवतमाळात काँग्रेसच्या उमदेवाराचा प्रचार करणार नाही. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार)चे पुसद, कारंजा येथील उमेदवारांच्या प्रचारात सहभागी होणार आहे. दिग्रस विधानसभा मतदारसंघात काँग्रेस उमेदवाराचा प्रचार करणार असल्याचे बाजोरीया यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला काँग्रेसचे निरीक्षक तेलंगणाचे खासदार डॉ. रवी मल्लू, माजी खासदार हरिभाऊ राठोड, अशोक बोबडे उपस्थित होते.

Story img Loader