सांंगली : लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभेचे वेध लागले आहेत. जिल्हा नेतृत्व स्पर्धेतून सांगलीतील लोकसभेची निवडणूक लढवली गेली असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विविध ठिकाणी होत असलेल्या मेळाव्यात खासदार विशाल पाटील घेत असलेली भूमिका संदिग्ध दिसत असल्याने खासदार नेमके कुणाचे असा प्रश्‍न सामान्यांना पडला नसता तरच नवल म्हणावे लागेल. महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या विरोधात बंड करून त्यांनी अपक्ष निवडणूक लढवून विजय संपादन केला. खासदार झाल्यानंतर दिल्लीला जाऊन काँग्रेसचे १०० वे खासदार म्हणून सहयोगी सदस्यत्व स्वीकारले. अपक्ष खासदार म्हणून निवडून आले असले तरी आजही ते पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत. आता मात्र विधानसभेवेळी त्यांची नेमकी भूमिका काय असा प्रश्‍न सर्वाना पडला आहे.

काही दिवसांपूर्वी आटपाडीमध्ये बाजार समितीच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी ज्यांनी आम्हाला प्रेम दिले, त्यांना आमचे प्रेम राहील असे सांगत शिवसेना शिंदे गटाचे खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य उमेदवार सुहास बाबर यांना भरभरून मते मिळतील, कारण त्यांचा वारसा हा पाणीदार आमदारांचा आहे असे सांगत बाबर यांच्या भूमिकेचे समर्थन करीत आपण यावेळी त्यांच्या पाठीशी राहण्याचे संकेत दिले. तासगावमध्ये झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे संभाव्य उमेदवार रोहित पाटील यांना साथ देण्याचे वचन दिले. तर याच तालुक्यात सावर्डे येथे झालेल्या शेतकरी विकास आघाडीच्या मेळाव्यात अजितराव घोरपडे यांचा विचार करावाच लागेल असे सांगत रोहित पाटलांसमोर प्रश्‍न उपस्थित केला.

chavadi discussion with ncp leader sharad pawar about kolhapur maharashtra politics
चावडी : कोण सुक्काळीचा चाललाय तो!
10th October Rashi Bhavishya In Martahi
१० ऑक्टोबर पंचांग: गुरुची वक्री चाल तर महागौरी…
bjp want ajit pawar to contest elections separately jayant patil claim
‘अजित पवारांना स्वतंत्र लढण्याचा सल्ला’; जयंत पाटील यांचा दावा
AIMIM , Imtiaz Jaleel, constituency confusion,
इम्तियाज जलील यांच्यासह पाच उमेदवारांची एमआयएमकडून घोषणा, मतदारसंघाचा संभ्रम कायम
Nitish Kumar
नितीश कुमारांना ‘एनडीए’शी प्रामाणिक असण्याबाबत का वारंवार द्यावं लागतंय स्पष्टीकरण? ‘त्या’मागचं राजकारण काय?
TMC MP Jawhar Sircar
TMC MP Jawhar Sircar : तृणमूल काँग्रेस अन् खासदारकीचा राजीनामा देण्याचं कारण काय? जवाहर सरकार यांनी केलं मोठं भाष्य
LokPoll Survey Results in Maharashtra
LokPoll Survey: महाराष्ट्रात लोकसभेची पुनरावृत्ती होणार; मविआला १४१ ते १५४ जागा, तर महायुतीला…
maha vikas aghadi allies creating trouble for rohit pawar in Karjat Jamkhed constituency
कारण राजकारण : रोहित पवारांच्या कोंडीचे मित्रपक्षांकडूनच प्रयत्न

हेही वाचा – कारण राजकारण : पश्चिम महाराष्ट्रात कमळ फुलवणारा आमदारच अडचणीत

जतमध्ये तर आमदार विश्‍वजित कदम यांच्या गटाने म्हणजेच आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या काँग्रेसने विशाल पाटील यांच्या प्रचाराची धुरा तर सांभाळलीच पण भाजप उमेदवार संजयकाका पाटील यांची उमेदवारी पसंत नसल्याचे सांगत पक्षातून बाहेर पडून माजी आमदार विलासराव जगताप यांनी विशाल पाटलांचा प्रचार केला. विधानसभेला जगताप आणि कदम गट एकमेकासमोर उभे ठाकणार आहेत. कारण जगताप आणि कदम गटाचे पारंपरिक भांडण आहे. अशा स्थितीत खासदार कोणाची बाजू घेणार हा अनाकलनीय प्रश्‍न आहे.

पलूस-कडेगावमध्ये देशमुख गटातील पृथ्वीराज देशमुख यांची अप्रत्यक्ष मदत झाली. सांगलीत जयश्री पाटील यांनी मतदारसंघात प्रचाराची धुरा एकहाती सांभाळली. मात्र, उमेदवारीच्या संघर्षामध्ये जयश्री पाटील की पृथ्वीराज पाटील यापैकी एक निवडायचा झाला तर खासदारांची भूमिका कोणती हाही प्रश्‍न आहेच. काँग्रेसअंतर्गत सुरू असलेल्या उमेदवारीच्या शर्यतीत कोणाची बाजू घ्यायची हा यक्षप्रश्‍न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे.

हेही वाचा – Dispute in Mahayuti: ‘चोराच्या उलट्या बोंबा’, लाडकी बहीण योजनेच्या श्रेयवादावर राष्ट्रवादीच्या मंत्र्याची प्रतिक्रिया

पलूस-कडेगाव हा आमदार डॉ. कदम यांचा गड मानला जातो. विशाल पाटलांना खासदार करण्यात डॉ. कदम यांचा मोलाचा वाटा आहे. उमेदवारीसाठी पदरमोड करत डॉ. कदम यांनी दिल्लीपर्यंतची लढाई एकहाती लढली. अपक्ष म्हणून मेदानात उतरलेल्या विशाल पाटलांना हरप्रकारे मदत केली. महाविकास आघाडीत बंडखोरी केल्याने घटक पक्ष असलेल्या उबाठा शिवसेनेच्या कारवाईच्या मागणीकडे दुर्लक्ष करत पक्षाकडून कारवाई होणार नाही याची दक्षता घेतली. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे रदबदली करण्यापासून ते निवडणूक यंत्रणा हाताळण्यापर्यंतची कामगिरी केली. यामागे महाविकास आघाडीची उमेदवारी विशाल पाटलांना मिळणार नाही यासाठी ज्या राजकीय खेळी करण्यात येत होत्या, त्या नाव न घेता सर्वसामान्यांपर्यंत येण्यासाठीची व्यवस्थाही केली. डॉ. पतंगराव कदम यांच्या पश्‍चात जिल्हा नेतृत्व कदम घराण्याकडेच असावे हा हेतू तर होताच पण आदरनीय म्हणून राज्यात कार्यरत असलेल्या नेतृत्वाला म्हणजेच आमदार जयंत पाटील यांना एक प्रकारे आव्हानच होते. यात ते यशस्वी झाले असले तरी आता खासदार यांची नेमकी भूमिका काय असणार हाही महत्वाचा प्रश्‍न राहणार आहे. यावरच येत्या विधानसभा निवडणुकीचे रणमैदान ठरणार आहे. डॉ. कदम यांना काँग्रेसच्या जागा दोनवरून चार करायच्या आहेत. यामध्ये मिरज, सांगली या दोन जागांवर जास्त लक्ष राहणार आहे. जर काँग्रेसच्या जिल्ह्यातील जागा वाढल्या तरच डॉ. कदम यांना राज्य पातळीवरील नेतृत्वाच्या स्पर्धेत महत्वाचे स्थान असणार आहे.