सांगली : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आम्ही सुध्दा सांगलीचे वाघ आहोत असे मविआच्या प्रचार दौर्यात उध्दव ठाकरे यांना जाहीर व्यासपीठावर सांगून विशाल पाटील यांच्या विजयात सिंहाचा वाटा उचलणारे माजी मंत्री डॉ.विश्वजित कदम यांना भाजपकडून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख आव्हान देण्याच्या तयारीत आहेत. मतदार संघात एक दशकानंतर कदम आणि देशमुख या पारंपारिक प्रतिस्पर्धी गटात काँग्रेस विरूध्द भाजप अशा पक्षीय लढतीचे संकेत मिळत असले तरी या मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट कोणाच्या पारड्यात वजन टाकतो की निवडणुकीला सामोरे जातो यावर या मतदार संघाचे चित्र अवलंबून राहणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
पूर्वीचा वांगी-भिलवडी आणि मतदार संघ पुनर्रचनेनंतर पलूस-कडेगाव हा मतदार संघ तसा माजी मंत्री स्व. डॉ. पतंगराव कदम यांचा पारंपारिक मतदार संघ मानला जातो. मात्र, स्व.वसंतदादा पाटील यांच्या हयातीमध्येच या मतदार संघाचे प्रतिनिधीत्व संपतराव चव्हाण यांनी केले. मात्र, १९८५ मध्ये स्व.पतंगराव कदम यांनी अपक्ष मैदानात उतरून बाजी मारत या मतदार संघात आपले बस्तान बसविले. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये सक्रिय होत मतदार संघातील लोकांना भारती विद्यापीठाच्या माध्यमातून रोजगाराची संधी देत असतानाच मतदार संघात साखर कारखानदारीला प्रोत्साहन देत शैक्षणिक विकासालाही प्राधान्य दिले. यातून त्यांनी मतदार संघात आपला जम बसविला. तरीही स्व. संपतराव देशमुख यांनी अपक्ष मैदानात उतरून १९९५ मध्ये त्यांना पराभूत करून राज्याचे लक्ष वेधले. यावेळी त्यांना सांगलीतून कुमक मिळाली होती. त्यांच्या आकस्मिक निधनानंतर झालेल्या पोट निवडणुकीत देशमुख गटाकडून मैदानात उतरलेल्या पृथ्वीराज देशमुख यांनी कदम गटावर मात करीत आमदारकी पटकावली. यानंतर मात्र या मतदार संघावर कब्जा मिळविण्याचे देशमुख गटाचे प्रयत्न यशस्वी झाले नसले तरी थांबलेले नाहीत. यामुळे कदम गटाला या मतदार संघात एकहाती यश मिळेलच याची आजही खात्री देता येत नाही.
हेही वाचा…लोकसभेत फटका बसल्यानेच शरद पवारांवर टीकाटिप्पणी अजित पवारांनी टाळली
पतंगराव कदम यांच्या पश्चात झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये भाजपने अखेरच्या क्षणी संग्रामसिंह देशमुख यांची उमेदवारी मागे घेत विश्वजित कदमयांना पुढे चाल दिली. यानंतर गत निवडणुकीमध्ये ही जागा शिवसेनेच्या वाट्याला आली. शिवसेनेने या ठिकाणी जिल्हा प्रमुख संजय विभुते यांना उमेदवारी दिली. मात्र, ही निवडणुक चुरशीची तर झाली नाहीच, पण देशमुख गटाकून नोटाला झालेले मतदान लक्षवेधी होते.
यावेळी मात्र, या मतदार संघात देशमुख गटाकडून संग्रामसिंह देशमुख हेच भाजपचे संभाव्य उमेदवार म्हणून मोर्चेबांधणी सुरू केली आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाच्या कारकिर्दीत त्यांनी मतदारांशी थेट संपर्क राखला असून त्यांचे चुलत बंधू आणि माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांची साथ त्यांना राहील अशी चिन्हे सध्या तरी दिसत आहेत. लोकसभेवेळी पृथ्वीराज देशमुख यांनी उमेदवारीवर हक्क सांगितला होता. मात्र, त्यांना डावलून पुन्हा संजयकाका पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. यामुळे नाराजी जाहीरपणे व्यक्त करून देशमुखांनी विरोधाची भूमिका घेतली. मात्र, या संग्राम देशमुख यांनी पक्षाचा आदेश मानत भाजपसाठी काम केले. तरीही या मतदार संघात अपक्ष आणि काँग्रेसचे सहयोगी सदस्य विशाल पाटील यांना भाजपचे पाटील यांच्यापेक्षा ३६ हजार १८२ मते अधिक मिळाली. तर मविआचे चंद्रहार पाटील यांना १३ हजार ८५० मते मिळाली.
हेही वाचा…महाराष्ट्रालाही न्याय मिळावा; सुप्रिया सुळे यांची अपेक्षा
आता विधानसभेला चित्र वेगळे आहे. स्थानिक पातळीवरील उमेदवार आमनेसामने येणार असल्याने दोन्ही गटाची कसोटी यावेळी लागणार आहे. मतदार संघामध्ये कुंडलमध्ये क्रांती कारखान्याच्या माध्यमातनू लाड गट सक्रिय आहे. या गटाचा आता कडेगाव नगरपंचायतीपर्यंत विस्तार झाला असून या गटाची मर्यादित ताकद असली तरी काटाजोड लढतीमध्ये या गटाची भूमिका मतदार संघाचा निकाल बदलण्याइतपत निश्चितच राहणार आहे. पदवीधर मतदार संघ निवडणुकीमध्ये देशमुख आणि लाड यांच्यातच लढत झाली होती. अरूण लाड यांनी या निवडणुकीत विजय मिळवला. ही उर्जा आता या गटाची ताकद बनली असून नव्या पिढीचे तरूण नेतृत्व म्हणून क्रांती कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड मैदानात उतरण्यासाठी चाचपणी करत आहेत. गटाची ताकद वाढविण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. यातून त्यांची ताकद कोणाच्या पारड्यात पडते की, ताकद अजमावण्यासाठी मैदानात उतरतात यावर या निवडणुकीचे चित्र अवलंबून राहणार आहे.