ठाणे : भाजप विद्यमान आमदार संजय केळकर यांच्याविरोधात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील एक मोठा गट एकवटला असून बाळकुम भागातील प्रभावी राजकीय प्रस्थ असलेले माजी नगरसेवक देवराम भोईर आणि त्यांचे पुत्र संजय भोईर यांनी ठाणे शहर मतदारसंघावर दावा केल्याने भाजपची डोकेदुखी वाढली आहे. संजय भोईर यांनी ‘दादाचं काम बोलतंय’असे फलक ठाणे शहर मतदार संघात जागोजागी लावत हा मतदार संघ शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याचे दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे. भोईर यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन मतदार संघावर दावा केल्याने या जागेवरून शिवसेना आणि भाजपमध्ये संघर्ष होण्याची चिन्हे आहेत.

राज्यातील विधानसभेच्या निवडणुकांसाठी येत्या काही दिवसांत आचारसंहिता लागू होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी आणि इच्छूक उमेदवारांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. युती आणि आघाडीमधील जागा वाटप अद्याप जाहीर झालेले नसून या जागा वाटपावरून काही ठिकाणी संघर्ष होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. असाच संघर्ष ठाणे शहर विधानसभा मतदार संघात होण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. २००९ मध्ये शिवसेना एकसंघ असताना त्यांची भाजपासोबत युती होती. या निवडणुकीत ठाणे शहर विधानसभा मतदार संघातून शिवसेनेच्या तिकीटावर निवडणुक लढविलेले राजन विचारे हे विजयी झाले होते. २०१४ मध्ये मात्र शिवसेना आणि भाजपची युती तुटली आणि या दोन्ही पक्षांनी एकमेकांविरोधात ठाणे शहर मतदार संघातून उमेदवार उभे केले होते. या निवडणुकीत भाजपचे संजय केळकर हे विजयी झाले. २०१९ साली झालेल्या निवडणुकीतही केळकर यांनी विजय संपादन केला.

Will Ramdas Athawale take care of BJP or Republican workers
रामदास आठवले भाजपला सांभाळणार की रिपब्लिकन कार्यकर्त्यांना?
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
bjp leader shivray Kulkarni
भाजपचे नाव घेणाऱ्यांनी गल्लीबोळात भाजपविरोधात बैठकी…भाजप प्रवक्त्यांच्या आरोपामुळे…
Excitement in political circles over Chhagan Bhujbal claim
भुजबळांच्या दाव्यावरून राजकीय वर्तुळात खळबळ
sangli prithviraj patil
सांगलीतील काँग्रेसअंतर्गत बंडखोरीमागे षडयंत्र, पृथ्वीराज पाटील यांची बंडखोरांसह भाजपवर टीका
maharashtra assembly election 2024, gadchiroli vidhan sabha candidate, armori, bjp
भाजपपुढे लोकसभेतील पिछाडी दूर करण्याचे आव्हान, गडचिरोलीत उमेदवार बदलला, आरमोरीत अडचण
Loksatta chavadi political drama in maharashtra
चावडी: बंटी पाटील एवढे का संतापले?
loksatta readers feedback
लोकमानस: उतावीळपणा पुन्हा अंगलट!

हे ही वाचा…Maharashtra Elections 2024 : बुलढाण्यात महाविकास आघाडीत पेच

शिवसेनेतील फुटीनंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत ठाण्याच्या जागेवरून शिवसेना (शिंदे) आणि भाजप यांच्यात संघर्ष झाला होता. अखेर ही जागा पदरात पाडून घेत शिंदेच्या सेनेचे उमेदवार नरेश म्हस्के हे विजयी झाले होते. आता विधानसभा निवडणुकीत ठाण्याच्या जागेवरून पुन्हा संघर्ष होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. भाजप विद्यमान आमदार संजय केळकर यांच्याविरोधात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील एक मोठा गट एकवटला आहे. बाळकुम, कोलशेत, मानपाडा या भागात माजी नगरसेवक संजय भोईर यांचे चार नगरसेवक निवडून आले होते. या भागातील प्रभावी राजकीय प्रस्थ म्हणून ते ओळखले जातात. संजय भोईर यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन ठाणे शहर मतदार संघावर दावा केला आहे. याशिवाय, ‘दादाचं काम बोलतंय’ असे फलक ठाणे शहर मतदार संघात जागोजागी लावत हा मतदार संघ शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याचे दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे. ठाणे शहर मतदारसंघावर दावा केल्याने भाजपची डोकेदुखी वाढली आहे.

हे ही वाचा…Maharashtra Elections 2024 : चंद्रपूरमध्ये महिलांना संधी मिळणार का?

ठाणे विधानसभा मतदार संघांची जागा युतीच्या जागावाटपात शिवसेनेला मिळत होती. या मतदार संघाचे नेतृत्व शिवसेनेच्या आमदारांनी यापुर्वी केलेले आहे. लोकसभा निवडणुकीत या मतदार संघात शिवसेनेची ताकद दिसून आलेले आहे. त्यामुळे ही जागा शिवसेनेला मिळावी आणि या मतदार संघातून मला उमेदवारी मिळावी, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. परंतु यावर अंतिम निर्णय मुख्यमंत्री शिंदे हेच घेणार आहेत.- संजय भोईर , माजी नगरसेवक