काँग्रेसच्या घराणेशाहीवर नाके मुरडणाऱ्या भाजपने उमेदवारांच्या दुसऱ्या यादीत घराणेशाहीची पार्श्वभूमी असलेल्या अनेकांना उमेदवारी दिली आहे. आता कुठे गेला घराणेशाहीचा विरोध, असा सवाल विरोधी नेत्यांकडून केला जात आहे. महाराष्ट्रातील २० पैकी सात उमेदवारांची पार्श्वभूमी ही घराणेशाहीची आहे. तृणमूल काँग्रेसच्या माजी खासदार महुआ मोईत्रा यांच्या समर्खकांनी भाजप उमेदवारांच्या यादीतील घराणेशाहीकडे लक्ष वेधले आहे. महाराष्ट्रातील २० उमेदवार भाजपने जाहीर केले. पण त्यापैकी सात उमेदवारांची पार्श्वभूमी घराणेशाहीची आहे. काँग्रेसच्या घधराणेशाहीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमीच टीका करीत असतात. पण भाजपने घराणेशाहीवरच भर दिला आहे.

कर्नाटकात माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्या एका मुलाची कर्नाटक भाजपच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. दुसऱ्या मुलाला लोकसभेची उमेदवारी देण्यात आली. ही घराणेशाही नाही का, असा सवाल काँग्रेससकडून केला जात आहे. महाराष्ट्रातील पंकजा मुंडे, पीयूष गोयल, सूजय विखे-पाटील, अनुप धोत्रे, भारती पवार, हिना गावित, रक्षा खडसे या उमेदवारांची पार्श्वभूमी ही घराणेशाहीची आहे. मोदी घराणेशाहीवर टीका करीत असताना राज्यात भाजपला घराणेशाहीची पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांची गरज भासली आहे.

हेही वाचा… नांदेडची जागा निवडून आणण्याचे अशोक चव्हाणांपुढे आव्हान

हेही वाचा… पंकजा मुंडे राजकीय वनवासातून बाहेर !

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिवसेना ठाकरे आणि राष्ट्रवादीचा शरद पवार गट म्हणजे घराणेशाही असलेले पक्ष अशी टीका गेल्याच आठवड्याच राज्याच्या दौऱ्यावर असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली होती. मग भाजपला राज्यात घराणेशाहीची पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांचीच का गरज भासते, असा सवाल केला जातो. अकोल्यात संजय धोत्रे यांची प्रकृती साथ देत नसल्याने त्यांच्या जागी अन्य नेतेमंडळींनी उमेदवारी मागितली होती. पण पक्षाने धोत्रे यांच्या पुत्रालाचा पसंती दिली.