Sharad Pawar : महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक २० नोव्हेंबर रोजी होणार आहे. तर २३ नोव्हेंबरला मतमोजणी पार पडणार आहे. या मतमोजणीत काय निकाल लागतो? याकडे देशाचं लक्ष लागलं आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार ( Sharad Pawar ) यांनी महायुतीच्या योजनांचा त्यांना निवडणुकीत फायदा होईल असं म्हटलं आहे. मात्र त्याचबरोबर त्यांनी एक महत्त्वाचं विधान केलं आहे.

काय म्हणाले शरद पवार?

२० नोव्हेंबरला मतदान पार पडणार आहे. त्या अनुषंगाने शरद पवार ( Sharad Pawar ) यांनी नांदेड या ठिकाणी सभा घेतली. या सभेत त्यांनी महाराष्ट्रात परिवर्तन होईल यासंबंधीचं भाष्य केलं. त्यानंतर इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार यांनी महाविकास आघाडी आणि महायुती यांच्याबाबत मतं मांडली.

Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
Eknath Shinde
Eknath Shinde : तुम्ही गृहखातं, विधानसभा अध्यक्षपद मागितलं…
Rietesh Deshmukh
Riteish Deshmukh : “झापूक झुपूक वारं आलंय, गुलिगत धोका आहे”, धाकट्या बंधूसाठी थोरला बंधू प्रचाराच्या मैदानात!
Nawab Malik big claims about maharashtra Election
Nawab Malik: शरद पवार आणि एकनाथ शिंदे संपर्कात?, ‘निवडणुकीनंतर काहीही होऊ शकतं’, नवाब मलिक यांचा दावा
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”
Raj Thackeray in Borivali
Raj Thackeray in Borivali : राज ठाकरेंना भर सभेत आला कॉल, मुंबईतील एक सभा अचानक रद्द; नेमकं काय झालं?
Sharad Pawar On Dhananjay Munde
Sharad Pawar : “राष्ट्रवादी पक्ष फोडणाऱ्यांमध्ये तीन लोक प्रामुख्याने होते”, शरद पवारांचा रोख कुणाकडे? चर्चांना उधाण

लोकसभेच्या पार्श्वभूमीवर विधानसभेकडे कसं पाहता?

सध्याच्या घडीला विधानसभा निवडणूक होणार आहे. मात्र लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुम्ही महाराष्ट्रातल्या या निवडणुकीकडे कसं पाहता? हे विचारलं तेव्हा शरद पवार म्हणाले, “लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींनी ४०० पार जाण्याचं लक्ष्य ठेवलं होतं. मात्र संविधान बदलण्याची भाषा झाली. त्यामुळे त्यांना फटका बसला. तसंच जो कामगार किंवा मागासवर्ग आहे त्याने मोदींना नाकारलं ही एक बाब घडली. दुसरी गोष्ट ही घडली की मोदींचा अल्पसंख्याकांकडे पाहण्याचा दृष्टीकोन. त्यामुळेही हा फटका बसला आहे हे दिसून येतं. निकाल लागल्यानंतर मोदींना पंतप्रधान होण्यासाठी नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांचा पाठिंबा घ्यावा लागला. कारण भाजपाला स्पष्ट बहुमत मिळालं नाही. लोक मोदींवर नाराज झाले हेच या निकालाने दाखवून दिलं. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातही भाजपा आणि महायुतीला फटका बसला. त्यामुळेच आम्ही ३० जागा जिंकू शकतो. लोकसभा निवडणुकीची ही पार्श्वभूमी मला दिसते.” असं शरद पवार ( Sharad Pawar ) यांनी म्हटलं आहे.

हे पण वाचा- “मी काय म्हातारा झालोय का? इथं एक म्हातारं…”, शरद पवारांचा मिश्किल सवाल

लाडकी बहीण आणि इतर योजनांचा सरकारला फायदा होईल असं वाटतंय, पण..

लोकसभेचाच ट्रेंड कायम राहिल असं वाटतं का? हा प्रश्न विचारला असता शरद पवार म्हणाले, “मी आत्ताच याबाबत काही थेट सांगू सकत नाही. महायुती सरकारने सगळी ताकद पणाला लावली आहे. लाडकी बहीण योजना महायुतीने आणली आहे. या योजनेच्या अंतर्गत महिलांना १५०० रुपये देण्यात आले आहेत. यामुळे काहीसा परिणाम निवडणुकीवर होईल असं वाटतं आहे. हे असलं तरीही मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी प्रवास करत होतो. त्यावेळी १५-२० महिलांशी मी संवाद साधला. त्यावेळी मी त्यांना विचारलं की लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाल्यावर तुम्ही खुश आहात का? तर त्यांनी मला सांगितलं की आम्हाला पैसे मिळालेले नाहीत. तसंच हे सरकार एका हाताने पैसे देतं आणि दुसऱ्या हाताने काढून घेतं. कारण सध्याच्या घडीला सगळ्या वस्तू महाग झाल्या आहेत. मला वाटतं त्या महिला जे बोलल्या ती जनभावना आहे. बेरोजगार तरुणांनाही पैसे दिले जात आहेत. तसंच शेतकऱ्यांमधल्या काही जणांनाही पैसे मिळत आहेत. मात्र मी तुम्हाला म्हटलं ती जनभावना आहे.” असं शरद पवार ( Sharad Pawar ) म्हणाले.

लोकांना परिवर्तन हवं आहे, आमची सत्ता येईल

विरोधी पक्षाचं काय? असं विचारलं असता शरद पवार ( Sharad Pawar ) म्हणाले, लोकांना परिवर्तन हवं आहे. त्यामुळे मला वाटतं की आम्हाला संपूर्ण बहुमत मिळेल. दुसरी बाब ही आहे की आमच्या महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे आणि आमची कामगिरी काही मतदारसंघात नक्कीच चांगली असेल याची मला खात्री वाटते आहे. १०-११ जागांचा अपवाद सोडला तर बाकी सगळ्या मतदारसंघांमध्ये आम्ही चांगलं काम करत आहोत. त्यामुळे आमची सत्ता येईल असं वाटतं असं शरद पवार ( Sharad Pawar ) म्हणाले.

महाविकास आघाडीने मुख्यमंत्री कोण ते अद्याप ठरवलेलं नाही

यानंतर शरद पवार यांना विचारण्यात आलं की महाविकास आघाडीचं सरकार आलं तर मुख्यमंत्री कोण असेल? त्यावर शरद पवार म्हणाले, “आम्ही कुठलाही एक चेहरा ठरवलेला नाही. निवडणुकीतनंतर कुणाला जास्त जागा मिळतात ते आम्ही पाहू आणि त्यानंतर आम्ही ठरवू.” असं उत्तर शरद पवार ( Sharad Pawar ) यांनी दिलं आहे.