scorecardresearch

MyGov वेबसाईटवरील केरळ, तामिळनाडूच्या चुकीच्या स्पेलिंगवरुन शशी थरूर संतापले, म्हणाले, “हिंदी राष्ट्रवादींनी…”

काँग्रेसचे नेते खासदार शशी थरूर यांनी केंद्र सरकारकडून चालविणाऱ्या जाणाऱ्या MyGov.in या वेबसाईटवरील एक चूक लक्षात आणून हिंदी राष्ट्रवादींवर टीका केली.

shashi tharur
काँग्रेस नेते व खासदार शशि थरूर

काँग्रेसचे नेते आणि केरळमधील तिरुवनंतपुरमचे खासदार शशि थरूर हे इंग्रजी भाषेच्या ज्ञानाबद्दल परिचित आहेत. ट्विटरवर त्यांनी अनेकदा आपल्या इंग्रजी शब्दकोषाची झलक दाखवलेली आहे. अनेकदा त्यांनी ट्विट केलेले काही शब्द ट्रेंडही होतात. यावेळी शशि थरूर यांनी भारतीय राज्यांच्या नावावरुन केंद्र सरकारला टोमणा मारला आहे. केंद्र सरकारद्वारा चालविण्यात येणाऱ्या MyGov.in या वेबसाईटवर केरळ आणि तामिळनाडू राज्याची स्पेलिंग चुकलेली होती. यावरुन शशि थरूर यांनी ट्विट करत दक्षिणेतील राज्यांची योग्य स्पेलिंग लिहिण्याचा सल्ला केंद्राला दिला आहे.

शशि थरूर यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, “MyGov.in या हिंदी राष्ट्रवादी वेबसाईटने जर आमच्या राज्यांची योग्य स्पेलिंग शिकण्याची मेहनत घेतली तर आम्ही सर्व दक्षिण भारतवासी त्यांचे आभारी राहू” यासोबत शशि थरूर सदर चुकीच्या स्पेलिंगचा स्क्रिनशॉट देखील पोस्ट केलेला आहे. यामध्ये केरळची स्पेलिंग Kerela आणि तामिळनाडूची स्पेलिंग Tamil Taidu अशी केलेली दिसत आहे. २०१४ साली केंद्र सरकारने सामान्य नागरिकांचा प्रशासनात सहभाग वाढविण्यासाठी MyGov ही वेबसाईट लाँच केली होती.

हे वाचा >> “दादी को गोली मार दी…”, भर बर्फवृष्टीत राहुल गांधींनी सांगितला डोळ्यात पाणी आणणारा इंदिरा गांधींच्या हत्येचा प्रसंग

MyGovIndia चा थरूर यांना रिप्लाय

शशि थरूर यांच्या या ट्विटला नेटीझन्सचा चांगलाचा प्रतिसाद मिळालेला दिसतोय. आतापर्यंत १३ लाख लोकांनी हे ट्विट पाहिले आहे. तर १८ हजार लोकांनी ते लाईक केलेले आहे. दोन हजारांहून अधिक लोकांनी ट्विटखाली कमेंट करुन आपली प्रतिक्रिया नोंदविली आहे. विशेष म्हणजे त्यांच्या या ट्विटच्याखाली MyGovIndia च्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन रिप्लाय देण्यात आला आहे. “ही टायपिंग चूक असून कालच ती सुधारण्याता आले आहे. धन्यवाद”, असा रिप्लाय देऊन सदर स्पेलिंग एडिट झाल्याचे माय गो साईट.

२०२४ च्या निवडणुकीत भाजपाला ५० जागांचे नुकसान

कोझिकोड येथे केरळ साहित्य संमेलनात १५ जानेवारी २०२३ रोजी थरूर सहभागी झाले होते. यावेळी बोलत असताना ते म्हणाले की, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला अनेक राज्यात यश मिळाले. हरियाणा, गुजरात आणि राजस्थानमध्ये जवळपास सर्वच जागा त्यांना मिळाल्या होत्या. बंगालमध्ये देखील १८ जागा मिळाल्या. मात्र आता २०२४ च्या निवडणुकीत असे निर्भेळ यश मिळवणे कठीण होईल. देशभरात जवळपास भाजपाला ५० जागांचे नुकसान होईल. मागच्या लोकसभा निवडणुकीवेळी पुलवामा हल्ला आणि बालाकोट येथे केलेला एअर स्ट्राईक यामुळे एक लाट निर्माण झाली. ज्यामध्ये भाजपाचा विजय आणखी सोपा झाला.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-01-2023 at 15:48 IST