शिवसेनेने पहिली कायदेशीर लढाई जिंकली | Shiv Sena won its first legal battle about dussehra rally at Shivaji park print politics news amy 95 | Loksatta

शिवसेनेने पहिली कायदेशीर लढाई जिंकली

दसरा मेळावा शिवाजी पार्कवर आयोजित करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने मान्यता दिल्याने शिवसेनेने बंडानंतर शिंदे गटाच्या विरोधातील पहिली कायदेशीर लढाई जिंकली आहे.

शिवसेनेने पहिली कायदेशीर लढाई जिंकली
शिवसेनेने पहिली कायदेशीर लढाई जिंकली

दसरा मेळावा शिवाजी पार्कवर आयोजित करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने मान्यता दिल्याने शिवसेनेने बंडानंतर शिंदे गटाच्या विरोधातील पहिली कायदेशीर लढाई जिंकली आहे. न्यायालयाने दिलेल्या परवानगीमुळे शिवसेना आणि शिवाजी पार्कवरील दसरा मेळावा हे समीकरण कायम राहिले आहे.

हेही वाचा >>> भाजपचे मिशन मराठवाडा – रखडलेल्या प्रकल्पांना वेग देण्याची भाजपची योजना

शिवसेनेच्या स्थापनेनंतर लगेचच शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याची परंपरा पडली. ‘विचारांचे सोने लुटण्यासाठी शिवतीर्थावर चला, अशी शिवसेनेची तेव्हा घोषणा असायची. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे सुमारे तासभराच्या भाषणात शिवसैनिकांना आगामी वाटचालीची दिशा द्यायचे. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यातील बाळासाहेबांच्या भाषणाकडे राजकीय वर्तुळातील साऱ्यांचेच लक्ष असायचे. कारण ठाकरे कोणाची टोपी उडवतील वा कोणाला टीकेचे लक्ष्य करतील याची उत्सुकता असायची. बाळासाहेबांचे दसरा मेळाव्यातील भाषण म्हणजे शिवसैनिकांना पर्वणीच असायची.

हेही वाचा >>> सचिन पायलट यांची इच्छा पूर्ण होणार का ?

सुमारे ५० वर्षांच्या शिवसेनेच्या कार्यकाळात तीन-चार वेळाच दसरा मेळाव्यात खंड पडला. पावसाने मैदानात चिखल झाल्याने २००६ मध्ये मेळावा रद्द करावा लागला होता. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या काळातही २०१४ व २०१९ मध्ये दसरा मेळावा झाला नव्हता. दसरा मेळावा हा नेहमी सायंकाळी होतो. सुरक्षेच्या कारणावरून मागे एकदा दसरा मेळावा सकाळी घेण्यात आला होता.

हेही वाचा >>> उद्धव ठाकरेंची अवस्था ‘ माझे कुटुंब – माझी जबाबदारी’ एवढीच राहिल ; भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी खोचक टीका

बाळासाहेबांच्या पश्चात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालीही दसरा मेळाव्यात तेवढाच जोष आणि गर्दी होत असते. यंदाचा दसरा मेळावा शिवसेनेसाठी महत्त्वाचा आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर खरी शिवसेना कोणाची हा कायदेशीर वाद सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयात पुढील आठवड्यात पाच सदस्यीय खंडपीठासमोर सुनावणी सुरू होईल. यातूनच उद्धव ठाकरे यांना शक्तिप्रदर्शनाची ही संधी आहे. शिवसेना संपलेली नाही हे ठाकरे यांना दाखवून द्यायचे आहे. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात खोडा घालून शिवसेनेची खिजविण्याची शिंदे गटाची योजना होती. पण शिवार्जी पार्कवर ठाकरे यांचा मेळावा होणार आहे. शिंदे गटाला बेकीसी मैदानात मेळावा आयोजित करण्यास परवानगी मिळाली आहे.शिवसेनेचा शिवाजी पार्कवर तर शिंदे गटाचा बीकेसी मैदानात एकाच वेळी मेळावा झाल्यास शिवसेनेच्या दोन गटांमध्ये मेळाव्यात जास्त गर्दी कोणाकडे होते याची स्पर्धा असेल.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
भाजपचे मिशन मराठवाडा – रखडलेल्या प्रकल्पांना वेग देण्याची भाजपची योजना

संबंधित बातम्या

ओम राजेनिंबाळकर, राणा जगजितसिंह पाटील यांच्यात दुसऱ्या पिढीतील राजकीय संघर्षाचा इतिहास
पक्षवेध : हिंदूजननायकाच्या प्रतिमेतून मनसेचे नवनिर्माण होणार?
शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळात पुणे जिल्ह्याला किती मंत्रीपदे?
रत्नागिरी जिल्ह्यात ठाकरेंच्या शिवसैनिकांचा बंडखोर नेत्यांना झटका
पालकमंत्री गिरीश महाजनांचे अमित देशमुख यांच्याकडून कौतुक; वादळ थांबविणारे नेतृत्व म्हणत सूर जुळवून घेण्याचा प्रयत्न

व्हिडिओ

ताज्या बातम्या
मुंबई: शिवरायांच्या जन्मस्थळाबाबत भाजप आमदाराचे अज्ञान; विरोधी पक्ष आक्रमक झाल्याने दिलगिरी
मुंबई: राज्य औषध व्यवसाय परिषदेला राजकीय कुरघोडीची बाधा
दुर्धर व्याधीग्रस्त रुग्णांसाठी जिल्हास्तरावर विशेष उपचार केंद्र; रुग्णांना मानसिक आधार देण्यासाठी आरोग्य विभागाकडून प्रयत्न
मुंबई: गोवरची विशेष लसमात्रा आवश्यकच ;बालरोगतज्ज्ञांचे स्पष्टीकरण
मुंबई अग्निशमन दलात लवकरच भरती