कर्नाटकमध्ये २०२३ साली विधानसभा निवडणुका पार पडणार आहे. त्यापूर्वी काँग्रेसच्या ‘भारत जोडो यात्रे’ने नुकताच कर्नाटकातून प्रवास केला आहे. त्याचा फायदा काँग्रेसला होता का? हे विधानसभा निवडणुकीत दिसणारच आहे. त्यातच कर्नाटकचे काँग्रेसचे नेते, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी २०२३ च्या निवडणुकीसाठी सुरक्षित मतदारसंघाची निवड केली आहे. सिद्धरामय्या यांनी कोलार मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढण्याचे संकेत दिले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सिद्धरामय्या यांनी रविवारी कोलारला भेट दिली. ते म्हणाले, “कोलारचे विद्यमान आमदार के. श्रीनिवास गौडा ही जागा सोडून, त्यांना निवडणूक लढण्याची परवानगी देतील. तसेच, पक्षाचे ज्येष्ठ नेते के.एच.मुनियप्पा यांनी त्यांच्या उमेदवारीचं स्वागत केलं आहे.”

हेही वाचा : गुजरातमध्ये पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचा झंझावाती प्रचार, विरोधक टीका करत म्हणाले, “देवाच्या भरवश्यावर राज्य सोडून…”

“कोणत्याही मतदारसंघातून लढल्यास संमती देणार असल्याचं आश्वासन पक्षाने दिलं आहे. पण, कार्यकर्त्यांकडून म्हैसूरमधील वरुणा आणि कोलार सारख्या मतदारसंघातून निवडणूक लढण्याची मागणी केली होती,” असेही सिद्धरामय्या यांनी म्हटलं. दरम्यान, राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान केल्याबद्दल जनता दल ( सेक्युलर ) पक्षातून श्रीनिवास गौडा यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. तर, सध्या सिद्धरामय्या बोलकोट जिल्ह्यातील बदामी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात.

सिद्धारामय्या यांनी कोलार मतदारसंघाची निवड केल्यावर जनता दलाचे नेते कुमारस्वामी यांनी भाष्य केलं आहे. “सिद्धरामय्या हे कुरुबा समाजाचे प्रतिनिधित्व करतात. जातीय समीकरणे पाहू सिद्धरामय्या यांनी मतदारसंघाची निवड केली आहे. वरुण आणि बदामी या मतदारसंघाची निवडही याच आधारे केल्याचं,” कुमारस्वामी यांनी सांगितलं.

हेही वाचा : हरियाणात राजपुतांच्या मतांसाठी भाजपाची मोर्चेबांधणी, राजनाथ सिंहांकडून पृथ्वीराज चौहाणांच्या पुतळ्याचं अनावरण

दरम्यान, सिद्धरामय्या यांनी कोलारमधून निवडणूक लढल्यास त्यांचे पुत्र यतींद्र वरुण मतदारसंघातून लढतील. सिद्धरामय्या यांचा कोलार मतदारसंघातून विजय होईल, असा विश्वास पक्षाला आहे. कुरुबा, अल्पसंख्याक, वोक्कालिगस समाजीताल मते सिद्धरामय्या यांना मतदान करतील, अशी आशा आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Siddaramaiah hints at picking kolar seat for 2023 karnataka polls ssa
First published on: 14-11-2022 at 20:52 IST