दिल्लीत गोल मार्केट परिसरातील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या (माकप) कार्यालयात कधीही सीताराम येचुरींना भेटायला गेले की पहिल्यांदा ते आस्थेने चौकशी करायचे. मग, विचारायचे, कशावर बोलायचे आहे तुला?… हिंदीतून बोलू की, इंग्रजीतून?… एकदा येचुरींची मुलाखत घेऊन खाली उतरलो तर तेही मागून आले, त्यांना एका कार्यक्रमासाठी जायचे होते. मला म्हणाले, तुला कारमधून सोडू का कुठे?… चल माझ्यासोबत!… अशी आस्था त्यांना असायची.

गेल्या दहा वर्षांत केंद्रात भाजपची सत्ता आली. राज्यसभेतही काँग्रेससह विरोधक कमकुवत होत गेले. काँग्रेसचे गुलाम नबी आझाद यांच्यासारखे नेते अगदीच निष्प्रभ ठरू लागले होते. अशावेळी खणखणीतपणे सखोल-अभ्यासू मुद्द्यांची मांडणी करणाऱ्या सदस्याची उणीव राज्यसभेत भासत होती. इथे सीताराम येचुरी असते तर त्यांनी मैदान गाजवले असते असे वाटून गेले. ‘तुम्ही राज्यसभेत हवे होतात’, असे एकदा मुलाखतीनंतर बोलणेही झाले होते. चेहऱ्यावर नेहमीचे हास्य आणून हे म्हणणे मान्य असल्याचे त्यांनी सुचित केले पण, कडव्या पक्षस्थितीमुळे जाहीरपणे मत मात्र व्यक्त केले नाही.

Parliament House
Parliament House : संसदेच्या नवीन इमारतीत कार्यालय मिळणारा ‘टीडीपी’ ठरला पहिला पक्ष; कोणत्या पक्षाला कुठे मिळालं कार्यालय?
10th October Rashi Bhavishya In Martahi
१० ऑक्टोबर पंचांग: गुरुची वक्री चाल तर महागौरी…
senior leader bhaskarrao patil khatgaonkar to leave bjp
खतगावकरांच्या काँग्रेस प्रवेशावर शिक्कामोर्तब    
LokPoll Survey Results in Maharashtra
LokPoll Survey: महाराष्ट्रात लोकसभेची पुनरावृत्ती होणार; मविआला १४१ ते १५४ जागा, तर महायुतीला…
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य पुन्हा येईल, अशी स्थिती…”; शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत
Aditi Tatkare Shrivardhan Assembly Constituency Vidhan Sabha Election 2024 in Marathi
कारण राजकारण : आदिती तटकरेंसमोर धार्मिक ध्रुवीकरण थोपविण्याचे आव्हान
ex bjp mp sanjay kaka patil meet sharad pawar
संजयकाका पाटील हे शरद पवार यांच्या भेटीला; सांगलीच्या राजकीय क्षेत्रात तर्कवितर्क
eknath shinde shiv sena to get less seat in marathwada for maharashtra polls
मराठवाड्यात शिंदे गटाला जागांचा तोटा? अनेक मतदारसंघांवर दावा सोडण्याची शक्यता

आणखी वाचा-Parliament House : संसदेच्या नवीन इमारतीत कार्यालय मिळणारा ‘टीडीपी’ ठरला पहिला पक्ष; कोणत्या पक्षाला कुठे मिळालं कार्यालय?

आता संसदेच्या आवारात विरोधी पक्षांची कोंडी झालेली नित्यनियमाने पाहायला मिळते. पूर्वी संसदेचे कामकाज जुन्या ऐतिहासिक संसदभवनात होत असे. ही गोष्ट करोनापूर्वीची. तेव्हा पहिल्या मजल्यावरील कक्षांमध्ये वेगवेगळ्या पक्षांच्या पत्रकार परिषदा होत असत. सीताराम येचुरी संसदेचे सदस्य नसले तरी अधिवेशनाच्या काळात संसदेत येत असत, पत्रकार परिषद झाली की, त्यांच्याभोवती पत्रकारांचा गराडा पडे. मग, बराचवेळ येचुरी पत्रकारांशी मनमोकळ्या गप्पा मारताना दिसत. करोनानंतर संसदेतील पत्रकार परिषदाही थांबल्या आणि येचुरींचे संसदेत येणेही थांबले! ‘माकप’च्या सदस्याला तिसऱ्यांदा संसदेचे खासदार होता येत नाही. त्यामुळे सीताराम येचुरी फक्त दोनवेळा राज्यसभेचे खासदार बनू शकले.

येचुरी ‘माकप’मधील शरद पवार होते असे म्हटले तर वावगे ठरू नये. शरद पवारांच्या मैत्रीच्या संबंधांना पक्षाची सीमा नाही तसेच येचुरींचेही होते. ‘माकप’चे महासचिव म्हणून येचुरी पक्षाच्या विचारांची चौकट सांभाळत असले तरी ते त्यांचे सहकारी प्रकाश कारात यांच्यासारखे कडवे काँग्रेसविरोधी नव्हते. देशातील राजकारण बदलले आहे, त्यानुसार राजकीय निर्णय घ्यायला हवेत असे येचुरींचे मत होते. म्हणूनच कदाचित येचुरींनी काँग्रेसचा समावेश असलेल्या विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीमध्ये सामील होण्याची तयारी दाखवली होती. काँग्रेसचा वैचारिक विरोध कायम असला तरी, भाजपविरोधात विरोधकांनी एकत्र आले पाहिजे. ही राजकीय तडजोड असेल पण, ही काळाची गरज आहे, असे येचुरींचे म्हणणे होते. पंडित नेहरूंच्या प्रस्थापितांना सोबत घेऊन राजकारण करण्याच्या भूमिकेला मार्क्सवादी विचारांचे नेते म्हणून येचुरींचा विरोध कायम होता पण, भाजपने नेहरूंची केलेली हेटाळणी येचुरींनी कधी मान्य केली नाही. नेहरूंवर टीका करण्याची ही वेळ नव्हे, असे येचुरी एकदा म्हणाले होते.

आणखी वाचा-Haryana Election : माजी मुख्यमंत्र्यांमुळे काँग्रेसची गोची? उमेदवारी अर्जाची मुदत संपेपर्यंत यादीच जाहीर नाही; काँग्रेसच्या गोटात काय चाललंय?

संसदेच्या नव्या इमारतीमध्ये मध्यवर्ती सभागृह नाही. पण, जुन्या संसदभवनाच्या मध्यवर्ती सभागृहामध्ये दोन्ही सदनांतील वेगवेगळ्या पक्षांच्या सदस्यांची मैफल जमत असे. इथे सत्ताधारी-विरोधकांची कोंडी फुटत असे. अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर इथेच अनौपचारिक गप्पा होत, दोन्ही बाजूंनी संवाद साधला जात असे. इथे भाजपचे अरुण जेटलींभोवती सदस्य गोळा होत तसेच, सीताराम येचुरींसोबतही वेगवेगळ्या पक्षांचे सदस्य असत. मध्यवर्ती सभागृहामध्ये ‘स्मोकिंग झोन’ तयार केला गेला होता. त्याचा किस्साही येचुरी रंगवून सांगत असत. ‘संसदेमध्ये खासदार एकमेकांना भेटू शकत नसतील त्या संसदेचा काय उपयोग?’, असे येचुरी म्हणत.

‘माकप’चे महासचिव सीताराम येचुरी यांच्या निधनामुळे कम्युनिस्टांमधील मध्यममार्गी नेता देशाने गमावला आहे म्हटता येईल. पन्नास वर्षांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये येचुरींनी देशातील अनेक स्थित्यंतरे अनुभवली. गेल्या दहा वर्षांतील भाजपच्या राजकरणाबाबत बोलताना अधिक संघर्ष करणे हाच पर्याय असतो, असे ते म्हणत. राजकारणाची सद्यस्थिती पाहून कोणीही निराश होईल अशी परिस्थिती असताना येचुरींचा आशावाद उत्साह निर्माण करत असे. त्यांच्या जाण्याने आशावादाचा स्रोत देशाने गमावला असे म्हणता येईल.