scorecardresearch

नितीश कुमारांच्या समाधान यात्रेत ‘भावी पंतप्रधान’ची घोषणाबाजी; विषारी दारूने त्रस्त सारण जिल्ह्यातील लोकांमध्ये मात्र नाराजी!

कडेकोट पोलीस बंदोबस्तात मुख्यमंत्री कार्यक्रस्थळी पोहचले आणि अवघ्या अर्धा तासात निघूनही गेले.

नितीश कुमारांच्या समाधान यात्रेत ‘भावी पंतप्रधान’ची घोषणाबाजी; विषारी दारूने त्रस्त सारण जिल्ह्यातील लोकांमध्ये मात्र नाराजी!
(फोटो-पीटीआय)

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे त्यांच्या समाधान यात्रेदरम्यान सोमवारी सारण जिल्ह्यातील दरियापूर विभागातील भैरौपूर गावात पोहचले होते. विषारी दारूमुळे प्रभावित असलेल्या भागातील या गावाती एक मोठ्या मार्गावर बॅरिकेड्स लावण्यासोबतच मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोसबस्त तैनात करण्यात आलेला होता. नितीश कुमार हे या ठिकाणी एका फुटवेअर युनिटची पाहणी करण्यासाठी आले होते. त्यांच्या मागील दौऱ्यांप्रमाणे यावेळी कोणतीही सार्वजनिक रॅली किंवा जनतेशी संवाद नियोजित नव्हता. यावेळी कार्यक्रमस्थळी उपस्थित काही लोक पोलिसांशी धक्काबुक्की करतनाही दिसले. पोलिसांना या सर्वांना रोखले होते, त्यामुळे ते नाराज होते.

मुख्यमंत्री नितीश कुमार हे ५ जानेवारीपासून आपल्या समाधान यात्रेवर निघाले आहेत. नितीश कुमार हे चंपारण, सीतामढी, शिवहर, वैशाली आणि सीवान असा प्रवास करत सारण येथे पोहचले होते. त्यांच्या यात्रेचा चालू टप्पा १८ जिल्ह्यांमधून जाऊन २९ जानेवारी रोजी संपणार आहे.

मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सारण यात्रा यासाठी महत्त्वपूर्ण होती, कारण जिल्ह्यात अशातच बिहारमधील आतापर्यंतची सर्वात वाईट विषारी दारूकांडाची घटना घडली होती. दरियापूर येथून फारतर २५ ते ३० किलोमीटर अंतरावरील मशरख, अमनौर आणि इस्सुआपुर या गावांमधील अनेक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. आसापास उभा राहिलेल्या अनेकांमध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरू असल्याचे दिसले. कारण, पोलीस बंदोबस्त कडेकोट होता. दरम्यान एका वयस्कर व्यक्तीने म्हटलेच की, असं वाटतंय प्रत्येक व्यक्तीवर एक पोलीस नेमण्यात आला आहे.

नितीश कुमार यांच्यासह उपमुख्यमंत्री तेजस्वी प्रसाद यादव, अर्थमंत्री विजय कुमार चौधरी आणि अनेक मोठे अधिकारी व पोलीस जेव्हा बूट बनवण्याच्या कारखान्यावर पोहचले तेव्हा तिथे भारताचा पंतप्रधान कसा असावा, नितीश कुमार यांच्यासारखा असावा. अशी घोषणाबाजी सुरू झाली.
खरंतर नितीश कुमारांना भेटून त्यांच्यासमोर समस्या मांडण्याची अनेकांची इच्छा होती. मात्र, कार्यक्रस्थळी केवळ अगोदर ज्यांनी पास घेतलेला होता, त्यांनाच प्रवेश देण्यात आला होता. यानंतर केवेळ अर्धा तासांतच नितीश कुमार कार्यक्रमस्थळावरून निघूनही गेले. यामुळे नाराज झालेले लोक आपसात बोलत आल्या पावली परत फिरले.

विषारी दारू प्राशन केल्याने बिहारमध्ये ५३ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यातच मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी ‘जे लोक बनावट दारू पितात, त्यांचा मृत्यू होणारच’ (जो पियेगा, वो मरेगा!) असं विधान केल्याने विरोधकांनी त्यांना लक्ष्य केलं होतं. नितीश कुमार मात्र आपल्या भूमिकेवर ठाम असून ही माझी वैयक्तिक इच्छा नसून राज्यातील महिलांच्या आक्रोशाला प्रतिसाद आहे, असं सांगितलं.

याशिवाय, “दारु प्राशन केल्याने मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना कोणतीही भरपाई दिली जाणार नाही. आम्ही नेहमीच मद्यप्राशन करु नका, मृत्यू होईल असं आवाहन करत आहोत. मद्यप्राशनाच्या बाजूने बोलणारे तुमचं काही भलं करु शकत नाहीत,” असं नितीश कुमार म्हणाले होते.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-01-2023 at 20:28 IST

संबंधित बातम्या