पंढरपूर : सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस ( शरद पवार ) पक्षाचा एकही आमदार नसताना लोकसभेची जागा जिंकली. आणि आता विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाला आव्हान देत पुन्हा बालेकिल्ला काबीज करण्याचा प्रयत्न शरद पवार गटाचा आहे. तर एकेकाळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा बालेकिल्ला मोडून काढून जिल्ह्यातील ११ जागांपैकी ५ ठिकाणी तर एका अपक्षाचा पाठिंबा मिळवत भाजपाने राष्ट्रवादी कॉंग्रेस ( शरद पवार ) पक्षाचा कणा मोडला होता. यंदा जिल्ह्यातून राष्ट्रवादी कॉंग्रेस ( शरद पवार ) आणि भाजपा ५ जागांवर निवडणूक लढत आहेत. भाजपाने विद्यामान ५ आमदारांना उमेदवारी दिली आहे. मात्र पंढरपूर, माळशिरस या ठिकाणी चुरशीची तर सोलापूर दक्षिणमध्ये अटीतटीची लढत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपाला बालेकिल्ला शाबूत ठेवण्यासाठी तर शरद पवार गटाला पुन्हा वर्चस्व मिळवण्यासाठी ही निवडणूक चुरशीची ठरणार असे चित्र आहे.
सोलापुरात बालेकिल्ला राखण्यासाठी भाजप राष्ट्रवादीत चुरस
भाजपाला बालेकिल्ला शाबूत ठेवण्यासाठी तर शरद पवार गटाला पुन्हा वर्चस्व मिळवण्यासाठी ही निवडणूक चुरशीची ठरणार असे चित्र आहे.
Written by मंदार लोहकरे
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 02-11-2024 at 04:36 IST
© The Indian Express (P) Ltd
© The Indian Express (P) Ltd
TOPICSभारतीय जनता पार्टीBJPमराठी बातम्याMarathi Newsमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Maharashtra Vidhan Sabha Election 2024विधानसभा निवडणूक २०२४Assembly Election 2024
मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Solapur vidhan sabha constituency bjp vs ncp sharad pawar faction print politics news css