काँग्रेसच्या माजी पक्षाध्यक्ष व संसदीय पक्षाच्या प्रमुख सोनिया गांधींनी पक्षाच्या रायपूरमधील महाधिवेशनामध्ये सक्रिय राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिले. ‘भारत जोडो यात्रे’ने पक्षाला आणि देशाला निर्णायक वळण दिले आहे. माझ्या राजकीय कारकिर्दीची सांगता या यात्रेने होत असल्याचा मला मनापासून आनंद होत आहे’, असे सोनिया गांधी शनिवारी सुमारे १५ हजार कार्यकर्त्यांसमोरील छोटेखानी भाषणात म्हणाल्या.

दोन दशकांनंतर पक्षाची सूत्रे आता अन्य नेत्यांकडे जात असल्याची कबुली सोनिया गांधींनी भाषणात दिली. सोनिया गांधींच्या भाषणाआधी त्यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारी चित्रफीत दाखवण्यात आली. त्याचा उल्लेख करून सोनिया गांधी म्हणाल्या की, माझे वय झाले आहे, हे मला समजतेय. पक्षाची धुरा सांभाळण्यासाठी आता तरुण पिढी पुढे आलेली आहे. त्यांनी खरगेंच्या नेतृत्वाखाली पक्षालाही पुढे नेले पाहिजे! मी ९० च्या दशकात राजकारणात आले. या २५ वर्षांच्या काळात पक्षाने यशाचे शिखरही पाहिले आणि अपयशातून आलेली निराशाही पाहिली. २००४ आणि २००९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला विजय मिळाला. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वखाली केंद्रात सरकार स्थापन करता आले!

Kangana Ranaut Vikramaditya Singh Himachal Pradesh Mandi Loksabha Election 2024
Celebrity Fight: कंगनासमोर राजघराण्यातील वंशजाचे आव्हान; सोनिया गांधींनी केली वाट बिकट
Ramdas Athawale, raj thackeray
“महायुतीला राज ठाकरेंच्या पाठिंब्याची गरज नव्हती, मात्र…”, रामदास आठवले यांची प्रतिक्रिया; म्हणाले…
Manmohan Singh journey from economic reform face to accidental PM analysis by Neerja Chowdhury
आर्थिक सुधारणांचा शिल्पकार ते ‘अपघाती पंतप्रधान’; निवृत्तीनंतर मनमोहन सिंगांना इतिहास न्याय देईल?
there is feeling in poors and rich that Congress is alienating us said senior leader Shivraj Patil Chakurkar
“गरीब व श्रीमंतांमध्येही काँग्रेस दुरावत असल्याची भावना”, ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांचे खडे बोल

हेही वाचा – कसबा पेठ आणि चिंचवडमध्ये काय होणार?

‘भारत जोडो यात्रे’च्या कर्नाटकमधील टप्प्यात सोनिया गांधी सहभागी झाल्या होत्या. आता ‘भारत जोडो यात्रा’ने पक्षाला वेगळे वळण दिले आहे. यात्रेतील राहुल गांधींचे नेतृत्व महत्त्वाचे ठरले. सध्या काँग्रेस आणि देश दोन्ही संकटात आहेत, दोघांसमोरही गंभीर आव्हाने आहेत. त्यांच्याविरोधात लढण्यासाठी पक्षाने स्वतःला तयार केले पाहिजे. त्यासाठी पक्षातील नेत्यांनी स्वतःच्या महत्त्वाकांक्षा बाजूला ठेवल्या पाहिजेत. देशासाठी, पक्षासाठी त्याग करण्याची तयारी ठेवली पाहिजे. काँग्रेसने पूर्वीही संघर्षातून यश मिळवले आहे, भविष्यातही संघर्ष करूनच यश मिळवावे लागेल. काँग्रेस विजयी झाला तर देशही विजयी होईल, असे सोनिया गांधी म्हणाल्या.

हेही वाचा – सहकारमंत्री म्हणतात टॅबचे वितरण होईल…

कमी होत गेलेला वावर

गेल्या वर्ष-दीड वर्षांपासून सोनिया गांधींचा सार्वजनिक जीवनातील वावर कमी होत गेला आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राहुल गांधींनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर पक्ष सांभाळण्यासाठी सोनिया गांधींनी हंगामी पक्षाध्यक्ष म्हणून पक्षाची सूत्रे हाती घेतली होती. मात्र, पक्षाचा खरा कारभार राहुल गांधी हेच चालवाताना दिसत होते. पक्षातील महत्त्वाचे निर्णय सोनियांशी चर्चा करून घेतले जात असले तरी, या निर्णयप्रक्रियेमध्ये राहुल यांचा ‘हस्तक्षेप’ होता. त्यामुळे पक्षात असंतोष वाढत गेला आणि बंडखोर ‘जी-२३’ गटाने राहुल गांधींच्या नेतृत्वाला विरोध केला. या संघर्षामध्ये सोनिया गांधींनी मध्यस्थी करून वाट काढण्याचा प्रयत्न केला होता. बंडखोर गटातील नेत्यांशी झालेल्या पाच तासांच्या बैठकीनंतर पक्षाध्यक्ष पदाची निवडणूक घेण्याचा महत्त्वाचा निर्णय सोनिया गांधी यांनी घेतला. त्यांच्या आदेशानुसार पक्षाध्यक्ष पदाची निवडणूक होऊन २० वर्षांनंतर पहिल्यांदाच गांधीतर व्यक्ती, मल्लिकार्जुन खरगे पक्षाध्यक्ष झाले.

भाजपा-संघाविरोधात धडाडीने संघर्ष करा!

केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपा-संघ यांनी देशातील प्रत्येक संस्थेचे स्वातंत्र्य नष्ट केले आहे. विरोधी आवाज निर्दयपणे बंद केला गेला आहे. देशाच्या अर्थकारणाची दुरवस्था झाली आहे. दलित, आदिवासी, अल्पसंख्य, महिलांवर सातत्याने अत्याचार होत आहेत. अवघा देश द्वेषाच्या आगीमध्ये गुदमरू लागला आहे, लोक घाबरून जगत आहेत. देशातील आव्हानात्मक स्थितीविरोधात काँग्रेसने लढले पाहिजे. काँग्रेस हा फक्त राजकीय पक्ष नव्हे तर खुल्या वातावरणामध्ये समानता आणि आर्थिक संपन्नता निर्माण करण्याचे साधन आहे, असे सोनिया गांधी म्हणाल्या. भाजपा-संघाविरोधात लढण्यासाठी धडाडीने पुढे जा, लोकांना भेटा, त्यांच्याशी संवाद साधा, तरच काँग्रेसला यश येईल, अशी सूचना सोनिया गांधींनी केली.