scorecardresearch

अखिलेश यादव यांच्याकडून मध्य प्रदेशमध्ये पूर्ण ताकदीने प्रचार, काँग्रेसला २५ जागांवर फटका बसणार?

आगामी वर्षाच्या एप्रिल-मे महिन्यात लोकसभेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीच्या आधी देशात मध्य प्रदेशसह एकूण पाच राज्यांत विधानसभेची निवडणूक होत आहे.

akhilesh yadav
अखिलेश यादव (संग्रहित फोटो)

मध्य प्रदेशमध्ये १७ नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडले. उत्तर प्रदेशमध्ये वर्चस्व असलेल्या समाजवादी पार्टीनेही (सपा) या निवडणुकीत आपले उमेदवार उभे केले आहेत. विशेष म्हणजे काँग्रेस पक्षाशी जागावाटपावरील चर्चा निष्फळ ठरल्यानंतर सपाच्या नेत्यांनी येथे आक्रमकपणे प्रचार केला. याच कारणामुळे सपाच्या या राजकीय खेळीचा काँग्रेसला फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

काँग्रेस-सपा यांच्यात जागावाटपावरून वाद

मध्य प्रदेशची निवडणूक लढविण्याचे ठरवल्यानंतर समाजवादी पार्टीचे नेते काँग्रेस पक्षाकडे युतीचा प्रस्ताव घेऊन गेले होते. मात्र काँग्रेसने या प्रस्तावाला अपेक्षित प्रतिसाद दिला नाही. या दोन्ही पक्षांत जागावाटपाची चर्चा निष्फळ ठरली. समाजवादी पार्टीचे मध्य प्रदेशमध्ये वर्चस्व नाही. त्यामुळे थेट उमेदवार उभे करण्याऐवजी आम्हाला पाठिंबा द्यावा, अशी भूमिका तेव्हा काँग्रेसने घेतली होती. त्यानंतर विरोधकांच्या इंडिया या आघाडीचा भाग असलेल्या या दोन्ही पक्षांत चांगलाच वाद रंगला होता. त्यानंतर समाजवादी पार्टीचे सर्वेसर्वा अखिलेश यादव यांनी मध्य प्रदेशमध्ये आक्रमकपणे प्रचार केला.

priyanka gandhi
छत्तीसगडमध्ये काँग्रेस पुन्हा सत्तेत आल्यास जातनिहाय जनगणना : प्रियंका
chandrashekhar-bavankule
उमेदवारीसाठी भाजप प्रदेशाध्यक्षांच्या प्रस्तावाने नाशिकमधील इच्छुकांमध्ये धाकधूक
chandrashekhar bawankule chavadi
चावडी : बातमी फुटली कशी याची चौकशी ?
PM narendra modi rajasthan meeting
काँग्रेसवर शहरी नक्षल्यांचा ताबा!; पंतप्रधानांची घणाघाती टीका; मध्य प्रदेश, राजस्थानात प्रचाराला धार

लोकसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून प्रचार

आगामी वर्षाच्या एप्रिल-मे महिन्यात लोकसभेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीच्या आधी देशात मध्य प्रदेशसह एकूण पाच राज्यांत विधानसभेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीत सर्वोत्तम कामगिरी करून लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसशी वाटाघाटीदरम्यान जास्त जागा मिळाव्यात यासाठी समाजवादी पार्टी मध्य प्रदेशमध्ये पूर्ण तकादीने प्रचार केला.

डिंपल यादव यांच्याकडूनही प्रचार

अखिलेश यादव यांनी मध्य प्रदेशमध्ये पूर्ण ताकदीने प्रचार केला. याबाबत मध्य प्रदेशच्या स्थानिक नेत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. २०१८ सालच्या तुलनेत अखिलेश यादव यावेळी अधिक आक्रमकपणे प्रचार केला, असे या नेत्यांचे मत आहे. अखिलेश यादव यांनी २० मतदारसंघात २४ सभांना संबोधित केले आहे. तसेच अन्य तीन ठिकाणी रथयात्रेच्या माध्यमातून आपल्या उमेदवारांसाठी प्रचार केला. तसेच यावेळी अखिलेश यादव यांच्या पत्नी तथा मैनपुरी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डिंपल यादव यादेखील मध्य प्रदेशमध्ये प्रचारासाठी मैदानात उतरल्या होत्या. महिला मतदारांना आकर्षित करता यावे म्हणून समाजवादी पार्टीने त्यांना प्रचारासाठी मैदानात उतरवले होते. त्या पहिल्यांदाच उत्तर प्रदेश सोडून अन्य राज्याच्या निवडणुकीत प्रचार केला. विशेष म्हणजे अखिलेश यादव आणि डिंपल यादव यांनी मध्य प्रदेशमध्ये अनेक मंदिरांमध्ये जोडीने देवदर्शन केले.

अखिलेश यादव यांनी त्यांचे काका आणि समाजवादी पार्टीचे सरचिटणीस शिवपाल सिंह यादव तसेच चुलत भाऊ धर्मेंद्र यादव यांनादेखील मध्य प्रदेशमध्ये प्रचार करण्यास सांगितले होते.

सपाने दिले ७२ जागांवर उमेदवार

अखिलेश यादव यांच्या या रणनीतीबद्दल समाजवादी पार्टीचे मध्य प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष रामायण सिंह पटेल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार अखिलेश यादव यांच्या या प्रचारामुळे काँग्रेसला कमीत कमी २५ जागांवर फटका बसू शकतो. या निवडणुकीत आमचे स्थानिक संघटन अधिक मजबूत आहे. याच कारणामुळे आम्ही २०१८ सालच्या तुलनेत अधिक उमेदवार उभे करण्याची तयारी केली होती, असेही पटेल यांनी सांगितले. २०१८ साली समाजवादी पार्टीने ५२ जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. २०२३ सालच्या या निवडणुकीत समाजवादी पार्टीने एकूण ७२ जागांवर उमेदवार दिले आहेत.

जागावाटप करण्यासाठी बळ मिळणार

अखिलेश यादव यांच्या या आक्रमक प्रचारावर समाजवादी पार्टीच्या आणखी एका नेत्याने प्रतिक्रिया दिली. “लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने पुन्हा एकदा जागावाटप तसेच युती करण्यास नकार दिल्यास आम्ही एकट्याने ती निवडणूक लढू. त्यासाठी पक्षाचे संघटन बळकट असणे गरजेचे आहे. मध्ये प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत आम्हाला काही जागा मिळाल्यास किंवा या निवडणुकीच्या माध्यमातून आम्हाला आमची ताकद दाखवता आल्यास लोकसभा निवडणुकीत काँग्रेशसी जागावापट करण्यासाठी आमची शक्ती वाढेल,” असे या नेत्याने म्हटले.

निकाल काय लागणार?

दरम्यान, आता अखिलेश यादव यांनी मध्य प्रदेशच्या निवडणुकीत पूर्ण ताकदीने प्रचार केल्यामुळे समाजवादी पार्टीचा किती जागांवर विजय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. काँग्रेस आणि समाजवादी पार्टी या दोन्ही पक्षांनी येथे स्वतंत्रपणे निवडणूक लढवली.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sp leader akhilesh yadav dimple yadav campaign in madhya pradesh assembly election 2023 may harm congress prd

First published on: 20-11-2023 at 20:12 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×