जळगाव : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेंतर्गत देण्यात येणारे पैसे कोणी काहीही म्हटले असले, तरी परत घेतले जाणार नाहीत. लाडक्या बहिणींकडून ओवाळणी परत घेतली जाते का, असा प्रश्न उपस्थित करत ही योजना कायम सुरू राहणार असल्याचा निर्वाळा मंगळवारी येथे महिला सक्षमीकरण मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी दिला.

शहरातील सागर पार्क मैदानावर जिल्हा प्रशासनातर्फे मंगळवारी महिला सशक्तीकरण अभियानातंर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा प्रारंभ करण्यात आला. यानिमित्त आयोजित मेळाव्यात मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री फडणवीस आणि पवार यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना लक्ष्य केले. लाडकी बहीण योजना चांदा ते बांदापर्यंत लोकप्रिय झाल्याने विरोधकांचा वांधा झाल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. १७ ऑगस्टला लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात दोन महिन्यांचे पैसे जमा होणार म्हणजे होणारच. सर्वांचे अर्ज स्वीकारण्यात येतील. त्यामुळे काळजी करू नका, असे आवाहन केले.

Supreme Court warns state government regarding Ladaki Bahine Yojana print politics news
अन्यथा ‘लाडकी बहीण’ रद्द करू! सर्वोच्च न्यायालयाचा राज्य सरकारला इशारा
12th september rashi bhavishya राशी, राशिभविष्य, आजचे राशिभविष्य, राशीवृत्त देणार
१२ सप्टेंबर पंचांग: ‘आयुष्मान योग’ सिंह, कर्कसह ‘या’ राशींचे नशीब पालटणार? बक्कळ धनलाभ तर रखडलेली कामे पूर्ण होणार; वाचा तुमचे भविष्य
Supreme Court News
Ladki bahin yojana : “..तर ‘लाडकी बहीण योजना’ बंद करण्याचे आदेश देऊ”, महाराष्ट्र सरकारवर ‘सर्वोच्च’ ताशेरे
Advice from Chief Minister Eknath Shinde on opposition criticism of Chief Minister Majhi Ladki Bahin scheme print politics news
योजनेवर टीका करणाऱ्या सत्ताधारी आमदारांना तंबी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून कानउघाडणी
activist manoj jarange slams sharad pawar over maratha reservation
”शरद पवारांनी मराठा समाजाचे वाटोळे केले”; मनोज जरांगेंचं टीकास्र; म्हणाले, ”त्यांना जमलं नाही म्हणून…”
Malegaon Assembly Constituency|Dada Bhuse vs Bandu Bachchao
कारण राजकारण: एकेकाळच्या खंद्या समर्थकाचा भुसेंना अडथळा
Rajiv Kumar on Maharashtra Assembly Election Date Schedule in Marathi
Maharashtra Assembly Election : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीबाबत निवडणूक आयोगाच्या आयुक्तांचं मोठं विधान, म्हणाले…
It is clear from the records obtained by Indian Express that Vinod Adani has invested in the fund IPE Plus Fund 1
बुच-अदानी लागेबांधे उघड; ‘इंडियन एक्स्प्रेस’ला मिळालेल्या नोंदींमधून स्पष्ट

हेही वाचा >>>अलिबागमध्ये महायुतीत वादाची ठिणगी

विरोधकांकडून अपप्रचार’

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, विरोधकांच्या म्हणण्याकडे लक्ष न देण्याचे आवाहन केले. महिला सबलीकरण, सक्षमीकरण, सन्मान आणि त्यांना प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचे काम महायुतीचे सरकार करीत आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या साक्षीने सांगतो, लाडकी बहीण योजनेतील पैसे परत घेण्यासाठी नाहीत, तुमच्यासाठी दिले आहेत, असे पवार यांनी नमूद केले.

त्रिमूर्तींचे सरकार असेपर्यंत…

उपमुख्यमंत्री फडणवीस यांनीही विरोधकांसह स्वपक्षाच्या नेत्यांनाही खडे बोल सुनावले. निवडणूक आल्या आल्या विरोधकांकडून अपप्रचार केला जातो, असे फडणवीस म्हणाले. आमदार रवी राणा यांच्या १५०० रुपये काढून घेण्याच्या विधानाच्या पार्श्वभूमीवर, फडणवीस यांनी पक्षाचे नेते गमतीजमतीत काहीही बरळून जातात, असे सुनावले. जोपर्यंत आमचे त्रिमूर्तींचे सरकार सत्तेत आहे, तोपर्यंत लाडक्या बहिणींसाठीची ही योजना कुणीही बंद करू शकत नाही, असे फडणवीस यांनी नमूद केले.