scorecardresearch

Premium

महिला आरक्षण विधेयकावरील मतदानाला सुनील तटकरेंची दांडी

महिला आरक्षण विधेयकावर लोकसभेत झालेल्या मतदानाच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे गैरहजर राहीले.

Sunil Tatkare Absence for voting
लोकसभेत काल महिलांना लोकसभा आणि विधानसभेत ३३ टक्के आरक्षण देणारे नारीशक्ती वंदन विधेयक मंजूर करण्यात आले.(फोटो- संग्रहित छायाचित्र)

लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

अलिबाग- महिला आरक्षण विधेयकावर लोकसभेत झालेल्या मतदानाच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे गैरहजर राहीले. त्यामुळे आता उलटसुलट चर्चांना सुरूवात झाली आहे.

Jayant Patil
“मी बेकायदेशीर? मग माझ्या सहीच्या एबी फॉर्मवर…”, जयंत पाटलांचा अजित पवार गटाला टोला
praful patel claim
‘घडय़ाळ’ अजित पवार यांनाच मिळेल; प्रफुल पटेल यांचा दावा; पूर्वीच्या निकालांचा दाखला
JP Nadda
“महिला आरक्षणाची त्वरित अंमलबजावणी करा”, काँग्रेसच्या मागणीवर जेपी नड्डा म्हणाले, “२०२९ मध्ये…”
NAVEEN PATNAIK
लोकसभा, विधानसभा निवडणुकीसाठी बीजेडी पक्षाने कसली कंबर; भाजपाला थोपवण्यासाठी खास रणनीती!

लोकसभेत काल महिलांना लोकसभा आणि विधानसभेत ३३ टक्के आरक्षण देणारे नारीशक्ती वंदन विधेयक मंजूर करण्यात आले. विधेयकाच्या बाजून ४५४ तर विरोधात केवळ २ मते पडली. एमआयएम पक्षाच्या दोन सदस्यांचा अपवाद वगळता सर्व सदस्यांनी विधेयकाच्या बाजूने कौल दिला. पण या मतदानावेळी रायगडचे खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे गैरहजर राहीले. या ऐतिहासीक विधेयकाच्या मतदानावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील बहुसंख्य खासदार आवर्जून उपस्थित होते. मात्र या महत्वाच्या विधेयकावर मतदान होत असतांना, एनडीएचे घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस गटातील खासदार तटकरे अनुपस्थित राहील्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. खासदार तटकरे यांची कन्या अदिती तटकरे ही राज्याची महिला व बालकल्याण मंत्री आहे, असे असूनही महिला आरक्षण विधेयकाच्या मतदानावेळी तटकरे अनुपस्थित राहिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

आणखी वाचा-‘गोकुळ’वरून राजकीय कुरघोड्या सुरूच

लोकसभेच्या विशेष आधिवेशनासाठी खासदार तटकरे गेले दिल्लीत उपस्थित होते. जुन्या संसद भवनाच्या शेवटच्या दिवशी, तर नवीन संसदेच्या पहिल्या दिवशी त्यांनी हजेरी लावली होती. मात्र नंतर घरच्या गणेशोत्सवासाठी ते रायगड जिल्ह्यातील सुतारवाडी येथे घरी परतले. त्यामुळे महिला आरक्षण विधेयकाच्या मंजूरीच्या वेळी अनुपस्थित होते.

संसदेच्या विशेष अधिवेशनाला दोन दिवस उपस्थित होतो. पण घरी गणेशोत्सव असल्याने लोकसभेत बुधवारी मतदानाच्या वेळी उपस्थित नव्हतो. तशी कल्पना संबधितांना दिली होती. -खासदार सुनील तटकरे

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sunil tatkare absence for voting on womens reservation bill print politics news mrj

First published on: 21-09-2023 at 12:56 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×