वसंत मुंडे

बीड : निवडणुकीच्या आखाड्यात मी उतरणार असल्याचे माजी मंत्री प्रा. सुरेश नवले यांनी नुकतेच जाहीर केले. इमामपूर येथे कुस्तीच्या आखाड्यात त्यांनी हा राजकीय शड्डू ठोकला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात विकासाचा चेहरा मिळाला असल्याने बीड मतदारसंघातही आता विकास कामांना गती मिळेल व जिल्ह्याला वैभव मिळवून देऊ, असे आश्वासनही त्यांनी दिले.

Raju Shettys candidature filed by going in bullock cart show of strength by swabhimani shetkari sanghatana
बैलगाडीने जात राजू शेट्टी यांचा उमेदवारी अर्ज दाखल, ‘स्वाभिमानी’चे जोरदार शक्तीप्रदर्शन
latur, lok sabha election 2024, amit deshmukh, sambhaji patil nilangekar
लातूरच्या प्रचारात अमित देशमुखांची ‘ पुरीभाजी’ तर निलंगेकरांचा “निलंगा भात”
VBA Candidate List
वंचित बहुजन आघाडीकडून पाच उमेदवारांची घोषणा, पुण्यातून वसंत मोरे यांना उमेदवारी
Hatkanangale
डॉ. सुजित मिणचेकर यांच्या उमेदवारीसाठी शेकडो शिवसैनिक ‘मातोश्री’कडे रवाना; हातकणंगलेतील सेनेच्या उमेदवाराची स्पर्धा वाढली

हेही वाचा… मराठवाडा साहित्य संमेलनावर उद्धव ठाकरेंच्या पक्षाची छाप

हेही वाचा… सांगली : ग्रामपंचायत निवडणुकीने थंडीत राजकीय वातावरण तापले

बीड तालुक्यातील इमामपूर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय कार्यकर्ते बाजीराव चव्हाण यांच्या पुढाकारातून म्हसोबा यात्रा उत्सवानिमित्त कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन राज्याचे उत्पादन शुल्कमंत्री शंभुराज देसाई व माजी मंत्री प्रा. सुरेश नवले यांच्या हस्ते झाले. या वेळी आमदार शहाजीबापू पाटील, आमदार संजय शिरसाट, वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे, जिल्हाप्रमुख सचिन मुळूक, ॲड. चंद्रकांत नवले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कुस्ती स्पर्धेच्या उद्घाटनासाठी मंत्री शंभुराज देसाई व शिंदे गटाचे प्रमुख नेते हेलिकॅप्टरने आले होते. या वेळी बोलताना शंभुराज देसाई यांनी या स्पर्धांच्या उद्घाटनाला स्वतः मुख्यमंत्रीच येणार होते. मात्र, काही कारणांमुळे ते येऊ शकले नाहीत. त्यामुळे आपणाला पाठवले असून इमामपूर ग्रामपंचायतीला विकासासाठी भरीव निधी देण्याची घोषणा त्यांनी केली. शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमुळे महाराष्ट्रात कुस्तीपटूंनाही चांगले दिवस येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शहाजीबापू यांनीही आपल्या खास शैलीत ‘काय डोंगर, काय झाडी आणि काय जंगी कुस्त्या सगळं ओके…’ असे सांगत गावाने ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध काढून बाजीराव चव्हाण यांना समर्थन दिल्याबद्दल कौतुक केले.