गुजरात एटीएसने सामाजिक कार्यकर्त्या तीस्ता सेटलवाड यांना ताब्यात घेतले आहे. तीस्ता सेटलवाड या मुंबईतील पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या असून त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. २००२ मध्ये गुजरात दंगलीनंतर स्थापन झालेल्या ‘सिटिझन्स फॉर जस्टिस अँड पीस’ या एनजीओच्या त्या संस्थापक विश्वस्त आणि सचिव आहेत. २००२ मध्ये गुजरातमधील दंगलग्रस्तांचा विषय हाती घेणार्‍या पहिल्या सामाजिक कार्यकर्त्यांपैकी त्या एक होत्या. सेटलवाड यांच्यावर गेल्या काही वर्षांत अनेक आरोप केले गेले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सेटलवाड यांनी पहिल्यांदा गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर आरोप केले होते. मार्च २००७ मध्ये, गुजरात उच्च न्यायालयासमोर विशेष फौजदारी अर्जात सेटलवाड यांनी स्वत:चे नाव सह याचिकाकर्त्या म्हणून लिहिले होते. या प्रकरणात झाकिया जाफरी या मूळ याचिकाकर्त्या होत्या. या याचिकेमध्ये त्यांनी मोदी आणि इतर ६१ राजकीय नेते तसेच प्रशासकीय अधिकारी यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्याची मागणी केली होती. २००२ च्या गुजरात दंगलीतील कथित भूमिकेसाठी नरेंद्र मोदींविरोधात सीबीआय चौकशीची मागणीही त्यांनी केली. पुढे ही याचिका न्यायालयाने फेटाळली. त्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने एसआयटीला सर्व आरोपांची प्राथमिक चौकशी करण्यास सांगितले. 

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Teesta setalwad is the first social activist who raise the issue of gujrat riot victims pkd
First published on: 26-06-2022 at 13:38 IST