शिंदे गटाशी युतीचा विदर्भात भाजपला काहीच फायदा झाला नाही | The alliance with the Shinde group did not benefit the BJP in Vidarbha print politic news amy 95 | Loksatta

शिंदे गटाशी युतीचा विदर्भात भाजपला काहीच फायदा झाला नाही

शिंदे गटाशी युती करून सत्तेत आलेल्या भाजपला विदर्भात नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत विदर्भात काहीही फायदा झाला नसल्याचे निवडणूक निकाल दर्शवतो.

bjp election
(संग्रहित छायचित्र)/ लोकसत्ता

चंद्रशेखर बोबडे

नागपूर: शिंदे गटाशी युती करून सत्तेत आलेल्या भाजपला विदर्भात नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत विदर्भात काहीही फायदा झाला नसल्याचे निवडणूक निकाल दर्शवतो. विशेष म्हणजे एकसंघ असलेल्या शिवसेनेसोबत युती असताना भाजपने विदर्भतील दोन्ही जागा जिंकल्या होत्या. आता दोन्ही जागा गमावल्या.

हेही वाचा >>>तेलंगणातील दुसरा पक्ष राज्यात जम बसविणार का ?

नुकत्याच विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदार संघातील निवडणुका पार पडल्या.यापैकी दोन जागा विदर्भात होत्या. . एक अमरावती विभाग पदवीधर मतदार संघातील होती व दुसरी नागपूर विभाग शिक्षक मतदार संघातील होती. या दोन्ही जागा बारा वर्षापासून म्हणजे २०११ पासून भाजपकडेच होत्या. यावेळीही भाजपने वरील दोन्ही विद्यमान आमदाराना पुन्हा उमेदवारी दिली. या निवडणुकीत भाजपची शिंदे गटाशी युती होती. अमरावती विभागातील दोन खासदार व तीन आमदार शिंदे गटाकडे आहे तर नागपूर विभागात दोन आमदार व एक खासदार शिंदेसोबत आहेत. मात्र त्यांचा कोणताही राजकीय फायदा भाजपला झालेला नाही. भाजपने अमरावती पदवीधर आणि नागपूर शिक्षक या दोन्ही जागा गमावल्या .शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनाच खरी असल्याचा दावा भाजपचे सर्व नेते करीत असून त्यांच्याच सोबत युती करून पुढच्या लोकसभा व विधानसभा निवडणुका लढणार असल्याचे भाजपने यापूर्वीच जाहीर केले आहे. या पाश्वभूमीवर विदर्भात झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकांचे निकाल महत्वाचे ठरते.

हेही वाचा >>>कसब्यात बहुजनांचे प्राबल्य

शिंदे गटाने त्यांचे उमेदवार या निवडणुकीत उभे केले नसले तरी विदर्भातील दोन्ही जागांवर भाजपच्या उमेदवारांना शिंदे गटाचा पाठिंबा होता. या भागात शिंदे गटाकडे एकूण पाच आमदार व तीन खासदार आहेत. अमरावती पदवीधर मतदारसंघात येणाऱ्या सहा जिल्ह्यांपैकी बुलढाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव यांच्यासह दोन आमदार अनुक्रमे संजय गायकवाड आणि संजय रायमुलकर, यवतमाळ जिल्ह्यात दिग्रसचे आमदार संजय राठोड व यवतमाळ-वाशीमच्या खासदार भावना गवळी या शिंदे गटासोबत आहेत. यापैकी संजय राठोड हे मंत्री आहेत. त्याच प्रमाणे अमरावती जिल्ह्यात प्रहारचे बच्चू कडू आणि त्यांच्याच पक्षाचे राजकुमार पटले या दोन आमदारांचा शिंदे यांना पाठिंबा आहे.यानंतरही भाजपला अमरावती पदवीधर मतदारसंघाची सलग दोन वेळा जिंकलेली जागा गमवावी लागली. या मतदारसंघात चुरशीची लढत झाली व महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे विजयी झाले.

हेही वाचा >>>चंद्रशेखर राव यांचा राज्यात ‘किसान सरकार’चा नारा

नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघात येणाऱ्या सहा जिल्ह्यांपैकी शिंदेगटागडे एक खासदार व दोन आमदार आहेत नागपूर जिल्ह्यातील खासदार कृपाल तुमाने (रामटेक) आणि आमदार आशीष जयस्वाल (रामटेक) तसेच भंडाऱ्याचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांचा समावेश आहे. मात्र या मतदारसंघात भाजपचे नागोराव गाणार यांचा दारून पराभव झाला. यावरून शिंदेगटाशी युती भाजपसाठी विदर्भात तरी फायदेशीर ठरली नाही हे निवडणूक निकालावरून स्पष्ट होते.

दरम्यान भाजपने आम्हाला विश्वासात घेतले नाही, अन्यथा अमरावती पदवीधर मतदारसंघाचा निकाल वेगळा लागला असता, असे सेनेचे (शिंदे) बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी सांगितले.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-02-2023 at 13:44 IST
Next Story
“देशातली गरीबी कशी दूर होईल याचा विचार…” केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं महत्त्वाचं वक्तव्य