बालविवाह विरोधात आसाम सरकारने कडक भूमिका घेणं सुरू केलं आहे. मात्र तरीही राज्यात बालविवाहाची प्रकरणं कमी होताना दिसत नाहीत. परिस्थिती अशी आहे की, मागील आठवडाभरात बालविवाहाची चार हजारांहून अधिक प्रकरणांची नोंद झाली आहे. आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी स्वत: यास दुजोरा दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुख्यमंत्री हेमंत शर्मा यांनी ट्वीटद्वारे म्हटले आहे की, “आसाम सरकार राज्यात बालविवाह रोखण्यासाठी पूर्णपणे प्रयत्नशील आहे. आतापर्यंत आसाम पोलिसांनी राज्यभरात चार हचार चार प्रकरणं नोंदवली आहेत आणि येणाऱ्या काळातही पोलिसांकडून कारवाई होण्याची शक्यता आहे. या प्रकरणांवर ३ फेब्रुवारीपासून कारवाई सुरू होईल. सर्वांनी सहकार्य करावे, अशी मी अपेक्षा बाळगतो.”

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The assam government has a strong role against child marriage yet there are more than four thousand cases in the week msr
First published on: 03-02-2023 at 18:23 IST