रणबीर अभिनीत ‘ब्रह्मास्त्र’ सिनेमाचा हैदराबाद मधील पूर्व-प्रदर्शन कार्यक्रम वादाच्या भोवऱ्यात अडकल्याने शेवटच्या मिनिटाला रद्द करण्यात आला. या कार्यक्रमाला आयोजकांनी परवानगी घेतली असल्याचा तेलंगण पोलिसांनी दावा केला. यावेळी टॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता ज्यू एनटीआर उपस्थित राहणार होता. मात्र हा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याने मागील महिन्यात केंद्रीय मंत्री अमीत शहा यांच्या भेटीशी संबंध जोडण्यात आला.

ज्यूनियर एनटीआर हे तेलगू देसम पक्ष (टीडीपी) संस्थापक आणि माजी आंध्र प्रदेश मुख्यमंत्री एनटी रामा राव यांचे नातू आहेत. त्यांचे वडील एन हरीकृष्णा हे टीडीपी राज्य सभेचे खासदार होते. त्यांनी अलीकडेच अमीत शहा यांची भेट घेतल्याने ते चर्चेचा विषय झाले. एनटीआर ज्यूनिअर हे ब्रह्मास्त्र सिनेमाचा भाग नसले तरीही प्रचारात सक्रीय आहेत. आरआरआर दिग्दर्शक एसएस राजमौली हे देखील सिनेमाचा प्रचार करत आहेत. त्यांचे वडील आणि पटकथा लेखक केव्ही विजयेंद्र प्रसाद यांना अलीकडेच भाजपाकडून राज्यसभेचे नामांकन देण्यात आले.

ज्यूनियर एनटीआर आणि शहा यांच्यात २१ ऑगस्ट रोजी शहरातील हॉटेलमध्ये भेट झाली होती. या भेटीपूर्वी शहा यांनी नालगोंडा जिल्ह्यातील मुनूगोडे येथे भाषण दिले होते. यावेळी तेलंगण भाजपा नेते म्हणाले, “ज्यू एनटीआर हे तेलुगू सिनेमाचे रत्न असल्याने व शहा यांनी एनटीआर यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केल्याने ही भेट आयोजित करण्यात आली होती.”

या वर्षाखेरीस मुनूगोडे पोटनिवडणूक होण्याची शक्यता असून भाजपाला त्यात मोठ्या फरकाने जिंकून तेलंगणात नाव राखायचा मानस असल्याने सध्या पक्षाकडून आखणी सुरू आहे. टीआरएस पक्ष भाजपाच्या विरुद्ध असून केसीआर म्हणून लोकप्रिय असलेल्या मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी आठवडा सुरू होताना बिहारचे पक्षमित्र नीतिश कुमार यांच्याशी झालेल्या भेटीत “भाजपा-मुक्त” राज्याची हाक दिली होती.   

ब्रह्मास्त्रचा कार्यक्रम रद्द झाल्याने अनेक चाहते निराश झाले. तरीच हा कार्यक्रम लवकरच आणखी एखाद्या आलीशान हॉटेल किंवा रिसॉर्टमध्ये आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती ज्यू एनटीआर टीमच्या सदस्याने दिली आहे.